Mahila Shakti Yojana Maharashtra :- आजच्या या लेखांमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रात आता नवीन योजना सुरू झालेली आहेत, अर्थातच महाराष्ट्र शेती सदन योजना या अंतर्गत या पात्र असलेल्या महिलांना दरमहा 500 रुपये एवढी रक्कम महिलांना
खात्यात जमा करण्यात येणार आहेत. परंतु नेमकी यासाठी कोण पात्र आहेत ?, या माध्यमातून पाहणार आहोत, तसेच वस्त्र निवारा व इतर 8 सुविधांसाठी आता या ‘महाराष्ट्र शक्ती सदन योजना’ दिला जाणार आहे.
Mahila Shakti Yojana Maharashtra
या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूयात, राज्यातील वंचित संकटग्रस्त महिलांसाठी केंद्र पुरस्कृत ‘उज्वला’ आणि ‘स्वाधार’ योजनेचे अंमलबजावणी सन 2016 पासून करण्यात येत आहे. आता शासन निर्णय केंद्र पुरस्कृत स्वतः योजनेअंतर्गत राज्यातील निराधार निराश्रीत,
नैसर्गिक आपत्तीत, कुटुंबिक हिंसाचारांमध्ये बेघर झालेल्या महिला व त्यांच्या बालकांना अन्न, वस्त्र, निवार, व वैद्यकीय मदत कायदेविषयक संपुदेशन तसेच हेल्पलाइन द्वारे मार्गदर्शन संपूदेशन उपलब्ध शासनाकडून आता करण्यात येणार आहे.
महिला शक्ती योजना लाभार्थ्यांचे निकष
१) निराधार / निराश्रित महिला (विधवा महिला, कुटूंबाने दुर्लक्षित केलेल्या सामाजिक व आर्थिक पाठबळाशिवाय राहणाऱ्या महिला, नैसर्गिक आपत्तीमध्ये बेघर झालेल्या महिला, कुटुंबाने आधार काढून घेतलेल्या निराधार महिला).
२) कौटुंबिक हिंसाचारात बळी पडलेल्या बेघर महिला.
३) अनैतिक व्यापारातून सुटका केलेल्या महिला व मुली.
४) लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला व मुली. संस्थेतील प्रवेशितांबरोबर त्यांच्या कोणत्याही वयोगटातील अविवाहित मुली आणि १२ वर्षापर्यंतच्या मुलांना सदनामध्ये राहण्याची परवानगी असेल. दिर्घकालीन निवासाच्या व्यवस्थेची आवश्यकता असलेल्या प्रवेशित महिलांना शक्ती
सदनामध्ये जास्तीत जास्त ३ वर्षापर्यंत राहता येईल. प्रकरणपरत्वे पिडित महिलेस ३ वर्षाचा कालावधी संपल्यावर शक्ती सदनामध्ये राहण्याची परवानगी संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी देऊ शकतील.
तथापि, ५५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना शक्ती सदनामध्ये जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी राहता येईल. त्यानंतर त्यांना वृद्धाश्रम वा तत्सम संस्थांमध्ये हलविणे आवश्यक असेल.
महिला शक्ती सदन योजनाच्या कोणत्या 8 सुविधा ? व अर्ज आणि शासःन निर्णय येथे क्लिक करून पहा
Mahila Shakti Kendra Scheme
योजनेचे लाभ :- (१) अन्न, वस्त्र व निवारा लाभार्थी महिला व मुलींना “शक्ती सदना” मध्ये अन्न, वस्त्र व निवारा मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. लाभार्थी महिला तसेच त्यांच्या सोबत असलेल्या मुलींना व १२ वर्षाखालील मुलांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविण्यात येतील.
२) कायदेशीर सेवा – शक्ती सदनामधील लाभार्थी महिलेला आवश्यक कायदेशीर सहाय्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत दिले जाईल. असे सहाय्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलबध नसल्यास योजना राबविणारी स्वयंसेवी संस्था योग्य पर्यायी कायदेशीर सहाय्याची व्यवस्था करेल.
पोस्ट ऑफिसची नवीन योजना; आता या सर्व सेवांचा लाभ Whatsapp वर मोफत, तुम्हाला मिळेल का हा लाभ ?
(३) वैद्यकिय सुविधा सदनामध्ये प्रवेशित महिलांना प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेकडून सदनातील पिडित महिला/मुली/मुलांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी
तसेच आपात्कालीन परिस्थितीमध्ये उपचारांसाठी अर्धवेळ वैद्यकीय व्यवसायीची नियुक्ती करण्यात येईल. सदर वैद्यकीय व्यवसायी आठवड्यातून किमान एकदा सदनास भेट देईल. त्याचबरोबर प्रवेशितांना आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालय / आरोग्य व कल्याण केंद्र / CHC / PHC मार्फत आरोग्य तपासणी व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील.
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा