Majhi Kanya Bhagyashree Yojana :- आजच्या या लेखांमध्ये महत्त्वपूर्ण योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. शिंदे सरकारकडून या योजनेसाठी आता मोठा निधी दिला जाणार आहे.
आणि यासोबत ज्या पालकांना एक मुलगी आहे, अशा पालकांना सोबत 50 हजार रुपये मिळणार आहे. ही योजना नेमकी कोणती ?, तुम्हाला एक मुलगी किंवा दोन मुली असेल
तरी ही तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचा नेमकी पात्रता काय आहे ही संपूर्ण माहिती थोडक्यात पाहूयात.
Majhi Kanya Bhagyashree Yojana
पालकांनी त्यांच्या पाल्यांना चांगली शिक्षण देण्यासाठी तसेच समाजाचा मुलीबद्दल नकारात्मक असणारा दृष्टिकोन बदलण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहे.
आणि यासोबतच आता शासनाकडून माझी कन्या भाग्यश्री योजना ज्या योजनेचे देखील हेच उद्दिष्ट आहे. आणि यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना
माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज तुम्हाला भरून द्यावा लागतो. आणि अर्ज ग्रामीण तसेच नागरी बालविकास प्रकल्प, अधिकारी बालकल्याण, जिल्हा परिषद महिला व बाल
विकास अधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय महिला उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिला जातो.
माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?, इथे क्लिक करून पहा
दोन मुलींसाठी योजना
सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराने अर्ज करत असताना मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत किंवा महानगरपालिकांकडे मुलींचे नावांची नोंदणी केलेलं असणं
आवश्यक आहे. आणि यासोबत जर पाहिला तर माझी कन्या भाग्यश्री योजनाचा लाभ हा कोणाला मिळणार आहे ? आणि कसा मिळणार आहे हे पाहुयात.
Majhi kanya bhagyashree yojana mahiti
मुलीच्या जन्मनंतर आई वडील यांनी कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया करून घेतलेले असावे. तर अशा पाल्यांना म्हणजेच मुलींच्या बँक खात्यावर रुपये पन्नास हजार शासनाकडून दिली जाते.
दोन मुलींच्या जन्मनंतर आई वडील त्यांनी कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया करून घेतल्या असेल. मुलींच्या बँक खात्यावर प्रत्येकी 25-25 हजार रुपये असे 50 हजार रुपये जमा केले जातात.
मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र
ज्या पालकांना 2 मुली आहेत सदर योजनेत पात्र आहे. तिसऱ्या आपत्य जन्म घातल्यास आधीच्या मुलींना सदर योजनेचा लाभ मिळवता येत नाही. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आवश्यक आहे.
आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घ्यायची आहे, ती खाली देण्यात आलेल्या माहिती वर संपूर्ण या संबंधित सविस्तर माहिती मिळणार आहे.
📢 शेतीला लोखंडी तार कुंपण अनुदान योजना, जिल्हा परिषद अनुदान योजना 2023 :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा