Mangal Nano Tractor Rajkot | अरे वा ! आता नॅनो ट्रॅक्टर झाला लॉन्च, शेतीतील सर्व कामे करणार, दिवसाला फक्त 3 लिटर डिझेल, किंमत फक्त 61 हजार रुपये, पहा व्हिडीओ व खरेदी करा !

Mangal Nano Tractor Rajkot :- शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्वाची माहिती आज जाणून घेणार आहोत. शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करत असून शेतकऱ्यांसाठी आता विविध ट्रॅक्टर तसेच अवजारे/यंत्र विकसित करण्यात आलेली आहे. आज अशा ट्रॅक्टर विषयी माहिती जाणून घेणार आहोत

जे शेतातील सर्व कामे करतो आणि ट्रॅक्टरची किंमत खूपच कमी आहे. तर या ट्रॅक्टरची किंमत काय ? कोणते ट्रॅक्टर आहे ? कोण कोणते कामे करतो ? ही संपूर्ण माहिती जाणून घेणं खूपच गरजेचं आहे. शेती करत असताना अनेक तंत्रज्ञानाची गरज भासत असते.

Mangal Nano Tractor Rajkot

मात्र तंत्रज्ञानाच्या किमती मोठ्या असल्याने सर्व शेतकरी हे यंत्र खरेदी करू शकत नाही. परंतु ट्रॅक्टर किंवा अन्य काही साधने असे आहेत जे शेतकरी खरेदी करू शकता. आता उदा: द्यायचे झाल्यास गुजरातमधील एका शेतकऱ्याने खास पॉवर फुल ट्रॅक्टर विकसित केला असून मंगल नॅनो ट्रॅक्टर राजकोट असे ट्रॅक्टरला नाव देण्यात आले आहे.

हा एक छोटासा ट्रॅक्टर असून शेतकऱ्यांना शेती करताना याचा उपयोग होत आहे. आणि याला शेतकरी भाडे तत्वावर देखील देऊन चांगले पैसे कमवू शकतात. याबाबत अधिक माहिती लेखात पाहणार आहोत. हा ट्रॅक्टर विकसित केला त्या शेतकऱ्यांनी याबाबत बोलताना माहिती दिली आहे की हा ट्रॅक्टर मजबूत आहेत.

मंगल नॅनो ट्रॅक्टर राजकोट

त्याचबरोबर ट्रॅक्टरने शेती करताना काही अडचण निर्माण झाल्यास शेतकरी स्वतः देखील ती अडचण दूर करू शकतात. ट्रॅक्टरसाठी डिझेल इंजन बसवण्यात आलेले आहेत. ट्रॅक्टरची एक खास वैशिष्ट्य म्हणजे चाक ही रबरची बसवले असून ती लोखंडी चाके आहेत.

शेतकऱ्यांना टायरमध्ये हवा भरायचा देखील टेन्शन नाही, यामुळे याची पंचर काढण्याचे देखील टेन्शन नाही. आता त्यामुळे शेतकरी कुठे हे हा ट्रॅक्टर फिरवू शकता. ट्रॅक्टरला डिझेल किती लागते त्यात थोडक्यात माहिती पाहूया.सर्वातप्रथम या ट्रॅक्टरमध्ये एक बॉक्स देखील देण्यात आलेला आहे.

यामध्ये तुम्ही मोबाईल त्याचबरोबर पाणी बॉटल किंवा अन्य काही गोष्टी ठेवू शकतात. या ट्रॅक्टरचे खासियत/ वैशिष्ट्य जर जाणून घेतली तर ट्रॅक्टर दिवसभर चालवला तर याला फक्त अडीच लिटर डिझेल लागते. या ट्रॅक्टरला चार लिटर डिझेलची टाकी असून टाकी फुल केली तर दोन दिवस शेतकरी हा ट्रॅक्टर चालू शकतो.

मंगल नॅनो ट्रॅक्टर व्हिडीओ

फ्री मध्ये स्पेअर पार्ट मिळणार

कोणत्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल भारत Cultivator Veraval, Shapar, Rajkot :- 9909910462 वर संपर्क करून ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर सहा महिन्यात त्याला

काय प्रॉब्लेम आला तर त्यांच्याकडून फ्री मध्ये स्पेअर पार्ट मिळणार आहे. या ट्रॅक्टरची किंमत किती आहे, तर शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टरची किंमत खूपच कमी आहे. जर याचा विचार आपण केला तर अगदी सहजरीत्या कोणताही शेतकरी आला खरेदी करू शकतो.

तुमच्या शेतातील कामे व्यवस्थितपणे करू शकतात. या ट्रॅक्टरची किंमत फक्त 61 हजार रुपये असून तुम्हाला खरेदी करण्यासाठी वर देण्यात आलेल्या नंबर वरती संपर्क साधू शकता. आणि या ट्रॅक्टरचा Demo व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही वर पाहू शकता.

📑 हे पण वाचा :- अरे वा ! आता शेतातील औषध फवारणी एकरी होणार 15 ते 20 मिनिटांत, शेतकरी पुत्राने विकसित केले हे नवे यंत्र ! होणार मोठा फायदा वाचा डिटेल्स !

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !