Most Important Fror Crops | सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकावर कोणते परिणाम होतात ?

Most Important Fror Crops: नमस्कार शेतकरी बंधूनो आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाचे भरपूर उत्पन्न हवे असते. परन्तु अपल्याय जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपल्या त्या पिकाची वेळोवेळी आवश्यक ती काळजी घ्यावी लागते. म्हणजे जर शेतात तण झलेले असेल त्याची कोळपणी किंवा त्यावर तण नाशकांची फवारणी करावी लागते.

तसेच पिकांवर वेगवेगळ्या प्रकारची रोग हे येत असतात. त्या साठी अपल्याय वेगवेगळ्या प्रकारची अवषधे फवारणी कारवि लागते. तसेच याच प्रमाणे आपल्या पिकांना सूक्ष्म अन्न द्रव्य लागत असतात.

Most Important Fror Crops

आपल्याला हे वेळीच लक्ष द्यावे लागते आपण जर आपल्या पिकाला वेळीच सूक्ष्म अन्नद्रव्य दिले तर नक्कीच आपल्या उत्पन्नात व आपले पीक हे दोन्ही मधून आपल्याला चांगली वाढ घडून आल्याचे दिसेल. तर या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची हे .आपण आज या लेखात जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

नत्र हे पिकासाठी आवश्यक आहे

नत्र हे वनस्पतीच्या वाढ व विकासाकरता सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे. नत्र हे प्रकाश संश्‍लेषणमध्ये सामील असलेल्या सर्व प्रथिने, एंजाइम चयापचय प्रक्रियेचा भाग आहे. पिकाच्या जलद वाढीमध्ये नत्राची खूप आवश्यकता असते.

नत्राची कमतरता पिकांमध्ये असल्यास पुढील पैकी लक्षणे आढळून येतात

१)पिकाचे जमिनीलगतचे म्हणजे परिपक्व पाने पिवळी होतात.
२) मुळाची वाढ खुंटते त्याबरोबर झाडाची वाढ खुंटते.

उपाय : नत्रयुक्त खताचा वापर करावा

स्फुरद :

 नत्राप्रमाणेच स्फुरद प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. स्फुरद सौरऊर्जेचे रासायनिक उर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करते.

स्फुरदाची कमतरता असल्यास वनस्पती पुढील लक्षणे जाणवतात
१) पिकांची पाने गर्द हिरवी जांभळी आढळून येतात.
२) मुळाची वाढ मंदावते.
उपाय : आवश्यकतेनुसार स्फुरदयुक्त खते उदाहरणार्थ एस. एस. पी द्यावे.

पालाश :

पालाश पिकांना प्रकाश संश्लेषण, प्रथिने संश्लेषण, फळाची योग्य वाढ, रोगप्रतिकारक शक्ती वाढवने इत्यादी प्रक्रियांमध्ये उपयोगी आहे. पालाश पिकास पाण्याचा ताण सहन करण्यास मदत करते.

पालाशची कमतरता असल्यास पुढील लक्षणे आढळतात

१)पानाच्या कडा तांबडसर आढळून येणे.
२)पानांवर तांबडे व पिवळे ठिपके आढळणे.
उपाय : योग्य मात्रेमध्ये पालाशयुक्त खते उदाहरणार्थ म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

गंधक :

गळीत धान्य पिकांसाठी गंधक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. गंधक वनस्पतीमध्ये वाढीसाठी आवश्यक असणारी एंझाईम तयार करण्यास मदत करतो.

गंधकाची कमतरता असल्यास पिकांमध्ये पुढील लक्षणे आढळतात

१) संपूर्ण वनस्पतीमध्ये पिवळे फिकट गुलाबी, हिरव्या रंगाचे पाने दिसून येतात.
२) नवीन येणारी पाने व कोवळी पालवी पिवळसर दिसू लागते.

उपाय : ३० ते ४० किलो प्रति हेक्‍टरी द्यावे जिप्सम टाकावे.

लोह :

पिकांमध्ये प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत आवश्यक असते.

कमतरतेची लक्षणे
१) नवीन येणाऱ्या पानांच्या शिरा पिवळ्या दिसू लागतात.
२) झाडांची वाढ खुंटलेली दिसते.

उपाय : ०.५ टक्के फेरस अमोनिअम सल्फेटची फवारणी करावी.

बोरॉन :

बोरॉन वनस्पती मध्ये खूप महत्त्वपूर्ण कार्य करतात जसे की परागकण उगवण, पेशीविभाजन, प्रथिने, कर्बोदके, कॅल्शिअम व पाण्याच्या चयापचय क्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

कमतरतेची लक्षणे १) नवीन पालवीचा रंग देठाच्या बाजूला फिक्कट पिवळसर दिसू लागतो.
2) नवीन पालवी देठाच्या बाजूला जळू लागते.
३) नवीन पाने जळतात.

उपाय : प्रति हेक्‍टरी दोन ते तीन किलो बोरॅक्‍स जमिनीतून द्यावा.

तांबे :

तांबे वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्‍लेषण यासाठी महत्त्वपूर्ण घटक आहे.

कमतरतेची लक्षणे : पिकाच्या शेंड्याची खोडाची वाढ खुंटून लगेच पाने गळून पडतात.

उपाय: ०.४ टक्के मोरचूद द्रावण फवारावे.

मॅगनीज :

वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण मध्ये फार महत्वाचा घटक आहे.

कमतरतेची लक्षणे: १) पिकांमधील पानांच्या शिरा हिरव्या राहतात व क्रमाक्रमाने शिरांमधील भाग पिवळा व नंतर पांढरा करडा दिसून येतो.
२) पानांची वाढ कमी दिसते.

मॉलिब्डेनम :

वनस्पतीमध्ये आवश्‍यक अमायनो ऍसिड तयार करण्यास मदत करते.

कमतरतेची लक्षणे: १)पाने फिकट पिवळी , फिकट हिरवी दिसून येतात.                                                                    २)पानांच्या खालच्या भागातून रेझीनयुक्त पदार्थ स्त्रवतो.

जस्त :

वनस्पतीमध्ये उपयुक्त एन्झाईम तयार करण्यासाठी जास्त उपयोगी आहे.

कमतरतेची लक्षणे: पानांच्या आकारमान कमी आढळून येते शिरांमधील भागांमध्ये तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात व शेवटी पिवळी पडतात.

उपाय: ०.५ टक्के फेरस अमोनिअम सल्फेटची फवारणी (Most Important Fror Crops) करावी.

सिलिकॉन

वनस्पतींमध्ये पेशी भिंती मजबूत करण्यासाठी, वनस्पतीचे आरोग्य, उत्पादकता वाढवणे, दुष्काळामध्ये ताण सहन करणे इत्यादी कार्य करत असते.

मुख्य अन्नद्रव्या सोबत सुक्ष्म अन्नद्रव्याची पिकाला तेवढीच आवश्यकता असते.चांगल्या उत्पादनासाठी सुक्ष्म अन्नद्रव्याचा पिकात अवश्य वापर करावा.


📢 पोकरा शेळी पालन योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment