Msp for Kharif Crops 2022-23 | 2022 करिता हमी भाव जाहीर पहा कोणत्या पिकाला किती हमी भाव ?

Msp for Kharif Crops 2022-23 :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखा मध्ये 2022-23 करिता शेतमालाचे हमी भाव जाहीर केंद्र सरकारने जाहीर केले. जाणून घेऊया शेतमालाचे हमी भाव संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरील वेबसाईट ला भेट द्या.

 
शेतकरी ग्रुप जॉईन करा

Msp for Kharif Crops 2022-23

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक  मंत्रिमंडळ समितीने. (सीसीईए) विपणन हंगाम 2022-23 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.

उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी आणि खालील तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे. पिकांच्या विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विपणन हंगाम 2022-23 साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ केली आहे.

हेही वाचा; कापसाचे Top 10 बियाणे जाणून घ्या संपूर्ण माहिती 

खरीप 2022 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत  

(₹ प्रति क्विंटल)

पीक  

 

एमएसपी 2014-15

एमएसपी 2021-22 एमएसपी 2022-23 2022-23 उत्पादनाची किंमत* एमएसपीमध्ये वाढ (संपूर्ण) खर्चापेक्षा परतावा (टक्के मध्ये)
भात (सामान्य) 1360 1940 2040 1360 100 50
भात (ग्रेड A)^ 1400 1960 2060 100
ज्वारी (हायब्रीड) १५३० २७३८ 2970 1977 232 50
ज्वारी (मालदांडी)^ १५५० २७५८ 2990 232
बाजरी १२५० 2250 2350 १२६८ 100 ८५
रागी १५५० ३३७७ 3578 २३८५ २०१ 50
मका 1310 १८७० 1962 1308 ९२ 50
तूर (अरहर) ४३५० ६३०० ६६०० ४१३१ 300 60
मूग ४६०० ७२७५ 7755 ५१६७ ४८० 50
उडीद ४३५० ६३०० ६६०० ४१५५ 300 ५९
भुईमूग 4000 ५५५० ५८५० ३८७३ 300 ५१
सुर्यफुलाचे बीज ३७५० 6015 ६४०० 4113 ३८५ ५६
सोयाबीन (पिवळे) २५६० ३९५० ४३०० 2805 ३५० ५३
तिळ ४६०० ७३०७ ७८३० ५२२० ५२३ 50
नायजरसीड ३६०० ६९३० ७२८७ ४८५८ 357 50
कापूस (मध्यम स्टेपल) ३७५० ५७२६ ६०८० 4053 354 50
कापूस (लांब स्टेपल)^ 4050 ६०२५ ६३८० 355

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 

Msp Price Kharip 2022

यात ज्या खर्चाचा संदर्भ देण्यात आला असून त्यात मानवी मजुरी, बैलांची मजुरी /यंत्र मजुरी, भाडेतत्वावर घेतलेल्या जमिनीचे  भाडे. बियाणे, खते अवजारे यावरील खर्च, सिंचन शुल्क.

आणि शेत बांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप संच चालवण्यासाठी डिझेल/वीज इ. विविध खर्च आणि कौटुंबिक श्रमाचे  मूल्य. यासाठीचे सर्व देय खर्च समाविष्ट असतात.

धान (वर्ग अ) ज्वारी (मालदांडी) आणि कापूस (लांब धाग्याचा ) या साठी खर्चाची माहिती  स्वतंत्रपणे संकलित केलेली नाही. विपणन हंगाम 2022-23 साठी खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये  वाढ.

हेही वाचा; 80% ठिबक,तुषार अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

शेतमालाचे हमी भाव 2022 

ही  केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणांच्या अनुषंगाने करण्यात आली आहे, यामध्ये  शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय अधिभारीत सरासरी उत्पादन खर्चापेक्षा किमान 50 टक्के किमान आधारभूत किंमत  निश्चित करण्याची घोषणा करण्यात आली होती.

 बाजरी, तूर, उडीद सूर्यफूलाच्या बिया , सोयाबीन आणि भुईमूग यांच्या किमान आधारभूत किंमतीवरील  परतावा. अनुक्रमे 85%, 60%, 59%, 56%, 53% आणि 51% या अखिल भारतीय अधिभारित सरासरी उत्पादन खर्चापेक्षा 50% पेक्षा जास्त आहे, हे उल्लेखनीय आहे.

तेलबिया, कडधान्ये आणि भरड धान्ये  यांची किमान आधारभूत. किंमत एकसारखी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ठोस प्रयत्न केले जात आहेत. शेतकर्‍यांना या पिकांखाली मोठे क्षेत्र आणण्यासाठी.

हेही वाचा; कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

New Msp Price List 2022

सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, मागणी-पुरवठ्यातील असमतोल दार  करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.

2021-22 च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशात अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी म्हणजे 314.51 दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे. हे उत्पादन, 2020-21 मधील अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा 3.77 दशलक्ष टन अधिक असेल.

2021-22 मधील अंदाजित उत्पादन मागील पाच वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) अन्नधान्याच्या सरासरी उत्पादनापेक्षाही 23.80 दशलक्ष टनांनी जास्त आहे.

Msp for Kharif Crops 2022-23

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे करा अर्ज 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment