MSRTC Bus Android Ticket Booking | MSRTC बसचे तिकीट ऑनलाईन कसे काढावे ? | आता फोन पे, गूगल पे वरून काढा ST बस चे तिकीट ! वाचा डिटेल्स !

MSRTC Bus Android Ticket Booking :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून महत्त्व महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व सामान्य आणि गरिबांची लाल परी म्हणून एसटी महामंडळाची ओळख आहे. आणि आपण कधी ना कधी एसटी अर्थातच महामंडळ व सेवा चा

लाभ घेतला असेल किंवा त्यातून प्रवास केला असेल. एसटी मधून प्रवास करायचा असेल तर तुम्हाला तिकीट काढावे लागते, तिकीट काढण्यासाठी तुमच्याकडे पैसे असणे गरजेचे आहे, किंवा खुले पैसे असावे लागतात. परंतु आता महामंडळाने मोठं अपडेट केले आहे.

MSRTC Bus Android Ticket Booking

आता Android E tickets या मशीनच्या माध्यमातून फोन पे, गूगल पे, किंवा यूपीआय, कार्ड च्या माध्यमातून करता येणार आहे. महामंडळाने हा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर आता ईएसटी बसचे तिकीट फोन पे, गुगल पे, मधून कसे काढायचे हे आज या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

एसटीच्या ईटीआयएम मशीनद्वारे खूप वेळा होणारे तांत्रिक बिगाड सुट्या पैशावरून प्रवास आणि वाहकांमध्ये वाद विवाद हे कमी होणार आहे. आणि एसटी म्हणजे महामंडळाकडून अमरावती विभागात 8 आगारांमध्ये 1058 अँड्रॉइड टिकीट मशीन दिली गेली आहे. या मशीनमुळे वाहक ही स्मार्ट झाली दिसून येत आहे.

MSRTC Android E Tickets

खिशात रोख रक्कम नसली तरी एसटीतील प्रवास आता करणे शक्य होणार आहे. आता एसटीतील प्रवाशांना मोबाईलचा वापर करून गुगल पे, फोन पे, यूपीआय, कार्ड पेमेंटचा वापर करून डिजिटल तिकीट काढण्याचे सुविधा देण्यात आली आहे.

आता अमरावतीच्या या 8 आगारामध्ये 1058 ई तिकीट मशीन देण्यात आलेले आहेत. या माध्यमातून आता नागरिकांना या अँड्रॉइड ई तिकीट मशीन मधून डिजिटल तिकीट काढता येणार आहे. आता अमरावती विभागामधील कोणत्या आगारांला किती तिकीट दिले आहेत ? हे आपण पाहूया.

📑 हे पण वाचा :- 100 शेळ्या 5 बोकड पालन योजना सुरु पहा माहिती एका क्लीकवर व करा ऑनलाईन अर्ज

एसटी बस अँड्रॉइड ई टिकीट

अमरावती आगारांला 167, बडनेरा 111, चांदुर बाजार 113, चांदुर रेल्वे 109, दर्यापूर 148, मोर्शी 104, परतवाडा 163, वरुड 143, अशा एकूण अँड्रॉइड ई तिकीट मशीन 1058 नवीन अमरावती आगारात देण्यात आल्या आहे. अशा प्रकारे नागरिकांचे अँड्रॉइड ई टिकीटच्या माध्यमातून तिकीट काढले जाणार आहे.

येत्या आठवड्यात प्रवाशांना आपल्या मोबाईल मधून गुगल पे, फोन पे, कार्ड पेमेंटच्या माध्यमातून मशीनवर प्रवासाचे भाडे भरता येणार आहे. डिवाइस मधून खुले पैसे दिल्यास डिजिटल तिकीट काढता येणार आहे. अशी माहिती निलेश बेलसरे विभाग नियंत्रक यांनी दिली आहे. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घ्यायचे असल्यास आपले वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद……

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !