Mudra Loan Mahiti in Marathi :- आज या लेखामध्ये मुद्रा लोन योजना माहिती मराठी जाणून घेऊया. मुद्रा लोन योजना तुम्ही अनेक वेळा माहिती वाचली असेल. परंतु यात सविस्तर अशी माहिती आज जाणून घेऊया,
की मुद्रा लोन योजना काय आहे ? यामध्ये कोणाला कर्ज दिलं जातं ? किती कर्ज मिळते ? आणि यासाठी अर्ज कसा करावा लागतो ? याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती पाहूयात.
मुद्रा लोन योजना अंतर्गत स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या या योजनेतून 10 लाख रुपये पर्यंत कर्ज दिल्या जाते. तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता.
मुद्रा कर्जाची वैशिष्ट्ये
कर्जाचा प्रकार | मुदत कर्ज, वर्किंग कॅपिटल लोन आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा |
मुद्रा योजनेचे प्रकार | मुले, आणि तरुण, प्रौढ |
कर्जाची रक्कम | शिशू योजनेअंतर्गत: ₹50,000 पर्यंत, किशोर योजनेअंतर्गत: ₹50,001 – ₹5,00,000तरुण योजनेअंतर्गत: ₹5,00,001 – ₹10,00,000 |
व्याज दर | अर्जदाराच्या प्रोफाइल आणि व्यवसायाच्या गरजांवर अवलंबून |
सुरक्षा | गरज नाही |
देयक कालावधी | 12 महिने ते 5 वर्षे |
प्रक्रिया शुल्क | बँक/कर्ज संस्थेवर अवलंबून, मंजूर कर्जाच्या रकमेच्या शून्य किंवा 0.50% |
Mudra Loan Mahiti in Marathi
मुद्रा लोन योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? :- तुम्ही व्यापारी आहात आणि तुमचा व्यवसाय तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला
या ठिकाणी व्यावसायिक कर्ज मिळत असतं. तुमचे भांडवला अभावी स्वप्न पूर्ण करू शकत नसाल तर अशावेळी तुम्हाला मुद्रा योजनेसाठी अर्ज करून तुम्हाला कर्ज मिळवता येते.
📑 हे पण वाचा :- घरकुल योजना नवीन यादी आली येथे पहा यादीत तुमच नाव डाउनलोड करा मोबाईलमध्ये पहा संपूर्ण प्रोसेस
मुद्रा लोन योजना किती कर्ज मिळते ?
या मुद्रा लोन योजना अंतर्गत हमीशिवाय 10 लाख रुपये पर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकते. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही भारत सरकारची लहान व्यवसायिकांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देणारी मुद्रा लोन योजना
माहिती मराठी ही लोकप्रिय योजना आहे. या योजनेत आतापर्यंत म्हणजे 2019-20 या आर्थिक वर्षात 6 कोटी 22 लाखून अधिक व्यवसायिकांना या योजनेत अंतर्गत कर्ज किंवा लाभ घेतला गेला आहे.

मुद्रा लोन बँक यादी महाराष्ट्र
अशा पद्धतीने ही लोकप्रिय योजना होत चाललेली आहे. नवीन व्यवसायिक किंवा लहान व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना या ठिकाणी बँकेकडून कर्ज दिला जाते. मुद्रा योजनेत महिलांना प्राधान्य दिल जात असतं.
या योजनेत महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बिगर बँकिंग फायनान्स कंपन्या अर्थात (NBFCs) आणि मायक्रो फायनान्स संस्थाना (MFIs) 25 bps कमी व्याजदराने कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारची ही प्रधानमंत्री Mudra Loan योजना आहे.
Mudra Loan Bank List Maharashtra 2023
अॅक्सिस बँक | इंडियन बँक |
बजाज फिनसर्व्ह | कर्नाटक बँक |
बँक ऑफ बडोदा | कोटक महिंद्रा बँक |
बँक ऑफ इंडिया | लेंडिंगकार्ट फायनान्स |
बँक ऑफ महाराष्ट्र | पंजाब नॅशनल बँक |
कॅनरा बँक | सारस्वत बँक |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया | स्टेट बँक ऑफ इंडिया |
एचडीएफसी बँक | सिंडिकेट बँक |
आयसीआयसीआय बँक | टाटा कॅपिटल |
IDFC फर्स्ट बँक | युनियन बँक ऑफ इंडिया |
IDBI बँक | होय बँक |
मुद्रा लोन योजना किती व कोणाला लोन देते ? त्याचे प्रकार ?
या योजनेत 3 प्रकारे कर्ज दिले जातं. हे तीन प्रकार यामध्ये कोणते आहेत हे थोडक्यात पाहूया. मुद्रा लोन योजना अंतर्गत कर्ज हे 3 श्रेणीमध्ये दिल जात असतं.
- शिशू मुद्रा लोन योजना माहिती मराठी
- या अंतर्गत 50 हजार रुपये पर्यंत कर्ज दिले जाते.
- किशोर मुद्रा लोन योजना माहिती मराठी
- या योजनेत 50 हजार ते 05 लाख रुपये पर्यंत कर्ज दिलं जाते.
- तरुण मुद्रा लोन योजना माहिती मराठी
- या योजनेअंतर्गत 05 लाख ते 10 लाख रुपये कर्ज दिलं जातं. व्यवसायिकांसाठी या 3 श्रेणी अंतर्गत कर्ज दिल्या जाते.
➡️ किशोर व तरुण मुद्रा लोन योजना कर्ज घेण्यासाठी अर्ज नमुना pdf डाउनलोड करा येथे
➡️ शिशू मुद्रा लोन योजना कर्ज घेण्यासाठी अर्ज नमुना pdf डाउनलोड करा येथे
मुद्रा लोन व्याजदर व अटी माहिती मराठी
मुद्रा योजनेच्या कर्जावरील व्याजदर आणि अटी प्रत्येक बँकेत नुसार बदलू शकतात. एसबीआयचा व्याजदर किमान 9.75 टक्के इतका आहे. पंजाब नॅशनल बँकेचा दर हा 9.60% पेक्षा जास्त आहे.
हे दर कमी जास्त होऊ शकतात. मुद्रा लोन कर्ज 03 ते 05 वर्षात ईएमआय स्वरूपात बँकांना परत करावे लागते. व्याजदर किंवा ईएमआय कालावधी व्यवसायिकाच्या मागील क्रेडिट उलाढालीनुसार ठरवला जातो.

मुद्रा लोन योजना कर्जासाठी अर्ज कसा करावा ?
मुद्रा लोन अर्ज कसा करावा ?याची माहिती पाहूया. अर्ज सरकारी, खाजगी, परदेशी, सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या जवळच्या शाखेत. तसंच NBFC किंवा MFIs मध्ये अर्ज केल्या जाऊ शकते.
मुद्रा लोन ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
- मुद्रा लोन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- प्रथम तुमचे ज्या बँकेत आधीच खाते त्याच बँकेत तुम्हाला कर्जासाठी अर्ज करावा लागतो.
- यातून तुमचं महत्त्वाचं म्हणजे सिबिल स्कोर देखील महत्त्वाचा ठरत असतो.
- आता मुद्रा लोन वेबसाईटला भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकता.
- अर्ज व योजनेची सविस्तर अधिक माहिती करिता अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- किंवा तुमच्या जवळील बँक शाखेची संपर्क करू शकता.
मुद्रा लोन योजना अर्ज आवश्यक कागदपत्रे ?
मुद्रा लोन योजना कागदपत्रे ? मुद्रा लोन योजनेसाठी विविध कागदपत्रे लागतात. त्यात वेगवेगळ्या बँकांना अर्जासाठी वेगवेगळे कागदपत्रांची आवश्यकता आहे.
बँक अधिकारी तुमच्याकडून विविध कागदपत्रांची (मुद्रा लोन कागदपत्रे) मागणी करू शकतात. त्याची लिस्ट तुम्हाला खाली देण्यात आली आहे.
- मुद्रा लोन योजना चे आवश्यक कागदपत्रे
- व्यवसायासाठी भरलेला योजनाचा पूर्णपणे भरलेला अर्ज अर्जदारांचा फोटो
- ओळखीचा पुरावा :- आधार कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत
- रहिवासी पुरावा :- आधार कार्ड, मतदान कार्ड, टेलिफोन बिल, बँक पासबुक इत्यादी.
- उत्पन्नाचा पुरावा :- आयटीआर / विक्रीकर रिटर्न यासारखे कागदपत्रे आणि इतर केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे इत्यादी लागणार आहेत.
मुद्रा लोन योजना हेल्पलाइन/कस्टमर केअर नंबर
अनुक्रमांक | राष्ट्रीय टोल-फ्री क्रमांक |
1 | 1800-180-1111 |
2 | 1800-11-0001 |
मुद्रा लोन योजना मराठी
अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी मुद्रा लोन योजना माहिती मराठी संदर्भात माहिती जाणून घेतली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळील बँक शाखेचे संपर्क करू शकता.
अशा पद्धतीची ही मुद्रा लोन योजना माहिती योजनेअंतर्गत 10 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळते. या मुद्रा योजनेतून 3 श्रेणींमध्ये लाभार्थ्यांना किंवा व्यवसायिकांना कर्ज (Loan) दिलं जाते.
त्यात शिशु मुद्रा लोन योजना माहिती मराठी, तसेच किशोर मुद्रा लोन योजना माहिती मराठी, किशोर तरुण मुद्रा लोन योजना माहिती मराठी अशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला लाभ दिला जातो. योजनेची अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.