Namo Shetkari Yojana 1st Installment Date :– नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समजून घेऊया. नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना ही योजना राज्य सरकार अर्थात महाराष्ट्र शासनाकडून सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये ही दिले जाणार आहे.
अर्थात केंद्र सरकारची पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना त्याचबरोबर राज्य शासनाची नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही योजना आहे. आता या योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागून आहे.
Namo Shetkari Yojana 1st Installment Date
याचीच माहिती आज जाणून घेऊया. केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीसाठी प्रति वर्षी 6 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नमो किसान योजना राबवण्यात येणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचं अपडेट म्हणजे शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा हप्ता का मिळाला नाही ?
यात अपडेट देण्यात आलेला आहे की सॉफ्टवेअर चाचणीला विलंब झाल्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा पहिला हप्ता राज्यातील 86 लाख 60 हजार शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नाही. अर्थात राज्यातील तब्बल 86 लाख 60 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मा निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे.
नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना
याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सॉफ्टवेअर चाचणीला विलंब झाल्या कारणाने शेतकऱ्यांना अद्यापही नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही. आता नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेतून दरवर्षी 6 हजार रुपयांचे मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे.
जसे की पीएम किसान सम्मान निधी योजना आहे. त्याच पद्धतीने ही योजना त्याच नियम अटी शर्ती या ठिकाणी लागू आहेत. या योजनेचा कार्यानसाठी महा आयटी सॉफ्टवेअर तयार केला आहेत. मात्र अंतिम चाचणी न झाल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपयाचा पहिला हप्त जमा झालेला नाही.
📑 हे पण वाचा :- 15 दिवस उजेड, 15 दिवस अंधार… चंद्रयान-3चे लँडर जिथे उतरले चंद्रावरील ती जागा कशी आहे?; जाणून घ्या एका क्लिकवर
शेतकरी महा सम्मान निधी योजना
या कारणामुळे अद्यापही नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही. केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीसाठी प्रति वर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. याच धर्तीवर राज्य सरकारकडून देखील नमो शेतकरी महा सम्मान योजना राबविण्यात येत आहे. यासाठी पीएम किसानचे निकष संगणकीय माहिती नमो किसान साठी वापरता याव्या.
अशा सूचना किंवा वापरावे असे सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे महाआयटीकडून संगणकीय प्रणाली तयार झाली आहे. लवकरच आता हा नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळेल, या कारणामुळे हप्ता अजून थकीत आहे. जशी ही चाचणी पूर्णपणे यशस्वी होईल त्यावेळेस शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता तत्काळच मिळेल असे अपडेट आहे.