Namo Shetkari Yojana KYC | अरे वा ! नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता जारी होणार, त्यापूर्वी फक्त शेतकऱ्यांना हे काम अनिवार्य शेवटचे 2 दिसव शिल्लक !

Namo Shetkari Yojana KYC :- नमस्कार सर्वांना, भुमिअभिलेख नोंदी, आधार जोडणीसाठी 15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम रावले जात आहे. याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अपडेट दिले आहे. आता तुम्हाला माहीतच असेल की संपूर्ण देशांमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही राबवली जाते.

या योजनेचा नुकताच 14वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा झाला आहे. राज्यातील 97 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 85 लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्षात हा लाभ मिळाला आहे. 12 लाख शेतकरी पात्र असून ही भूमि अभिलेख नोंदी किंवा ई-केवायसी नसणे, किंवा त्यांचे बँक खाते आधार लिंक नसणे.

Namo Shetkari Yojana KYC

या तीन कारणांनी वंचित राहिलेले किंवा त्यांना 14 वा हप्ता मिळालेला नाही अशा सर्वांना 15 ऑगस्ट 2023 च्या अगोदर ह्या विशेष मोहीम मध्ये ही बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे, किंवा भूमी अभिलेख नोंदी अद्यावत नसणे ही माहिती तुम्ही किंवा जे काही लाभ हा मिळणार आहे.

यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत ही मोहीम आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. या मोहिमेमध्ये तालुकास्तरावर तहसीलदार, भूमी अभिलेख अधिकारी, आणि कृषी अधिकारी, यांचे सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहेत.

काय विशेष मोहीम ?

त्याचबरोबर देखरेखीखाली गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, व कृषी सेवक यांनी वरील तीन अटी मुळे वंचित राहिलेले शेतकरी शोधून त्यांनी त्याची पूर्तता करायची आहे. असे त्यांना यावेळी सांगण्यात आलेले आहे. तुमच्या गावातील तलाठी, कृषी सेवक, ग्रामसेवक यांना आता काम सोपवण्यात आला आहे.

गावातील असे कोणते वंचित राहिलेले शेतकरी आहे हे शोधून काढायचं काम यावेळी त्यांना दिलेला आहे. अशाप्रकारे आता या शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजेच 12 लाख वरील शेतकऱ्यांना तर हा लाभ मिळणार आहे.

📑 हे पण वाचा :- अरे वा ! आता नॅनो ट्रॅक्टर झाला लॉन्च, शेतीतील सर्व कामे करणार, दिवसाला फक्त 3 लिटर डिझेल, किंमत फक्त 61 हजार रुपये, पहा व्हिडीओ व खरेदी करा !

नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना

राज्य शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेली नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यापूर्वी केंद्राच्या योजनेतून वंचित राहिलेल्या 12 लाख शेतकऱ्यांच्या सर्व पूर्तता करण्याचे काम केले जाणार आणि याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे कृषी विभागाच्या सचिवांना एक पत्र देऊन आवश्यक सूचना दिलेल्या आहेत.

सदर मोहीम यशस्वी झाल्यास राज्यातील 12 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या Pm किसान सन्मान निधी योजना आणि नमो किसान योजनेचाही लाभ मिळणार आहे. जे पात्र शेतकरी योजनेचा लाभांपासून वंचित आहे तसेच या समितीची संपर्क करून अटीची पूर्तता करावी असे देखील आव्हान कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

अधिकृत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *