National Livestock Mission | राष्ट्रीय पशुधन अभियान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? कागदपत्रे, अनुदान थेट 50 लाख रु. पर्यंत पहा जीआर !

National Livestock Mission :– नमस्कार सर्वांना, सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाच्या नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी मिळाले आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2021

रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसारीत करण्यात आला आहे. या शासन निर्णय नुसार शेळी, मेंढी, कुक्कुट, व वराह म्हणजे डुक्कर पालनसाठी 50% टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर पशुखाद्य वैरण विकास अभियानांतर्गत मुरघास निर्मिती टीएमआर व फॉंडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्‍पादनासाठी 50% टक्के पर्यंत केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे.

National Livestock Mission

शेळी मेंढी पालन साठी अधिकतम मर्यादा 50 लाख रुपये. तसेच कुक्कुटपालनासाठी 25 लाख रुपये व डुक्कर अर्थातच पालनासाठी 30 लाख रुपये. आणि पशुखाद्य वैरण विकासासाठी 50 लाख रुपये असे अनुदान या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे.

मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणाला अर्ज करता येणार आहे. अर्थातच वैयक्तिक अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू झाले तर या योजनेसाठी अर्ज कसे करावेत या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहूयात.

राष्ट्रीय पशुधन अभियान ऑनलाईन फॉर्म 

अर्ज ऑनलाईन सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल. पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, बँकेचा रद्द केलेला चेक, छायाचित्र हे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अनुभवचे प्रमाणपत्र आयकर रिटर्न, वार्षिक लेख, प्रशिक्षण प्रमाणपत्र,

जमिनीचे कागदपत्र. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, उपलब्ध असल्यास सादर करावे. या अभियानाचे सर्व मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग संकेतस्थळावरती देण्यात आलेले आहे.

तसेच केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा.

📑 हे पण वाचा :- महामेषच्या या 6 योजना पुन्हा सुरु, 75% अनुदान, असा, भरा योजनेचा ऑनलाईन फॉर्म

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 

  • कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती :- येथे पहा 
  • शेळी,मेंढी 50 लाख रु. अनुदान मार्यदा योजनेची संपूर्ण माहिती व ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 
  • वराह (डुक्कर) पालन 30 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म संपूर्ण माहिती :- येथे पहा 
  • पशुखाद्य व वैरण 50 लाख रु. अनुदान :- येथे पहा 

NLM योजना पात्रता 

वैयक्तिक, FPOs, FCOs JLGs, SHGs, कलम 8 कंपन्यांना उद्योजकता विकासासाठी प्रोत्साहन देऊन कुक्कुट, मेंढ्या, शेळी आणि डुक्करपालनात उद्योजकता विकास आणि जाती सुधारण्यावर तीव्र लक्ष केंद्रित करण्याचा प्रस्ताव आणि जातीच्या संरचना सुधारणेसाठी राज्य सरकारला देखील .

NLM योजना उद्दिष्टे 

  • लहान रुमिनंट, कुक्कुटपालन आणि डुक्कर पालन क्षेत्र आणि चारा क्षेत्रात उद्योजकता विकासाद्वारे रोजगार निर्मिती.
  • जातीच्या सुधारणेद्वारे प्रति पशु उत्पादकता वाढवणे.
  • मांस, अंडी, शेळीचे दूध, लोकर आणि चारा यांच्या उत्पादनात वाढ.
  • मागणी कमी करण्यासाठी चारा आणि खाद्याची उपलब्धता वाढवणे
  • चारा बियाणे पुरवठा साखळी मजबूत करणे आणि प्रमाणित चारा बियाणांची उपलब्धता.
  • मागणी पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी चारा प्रक्रिया युनिट्सच्या स्थापनेला प्रोत्साहन देणे.
  • शेतकऱ्यांसाठी पशुधन विम्यासह जोखीम व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देणे.
  • कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळी, चारा आणि चारा या प्राधान्यक्रमित क्षेत्रात उपयोजित संशोधनाला प्रोत्साहन देणे.
  • शेतकऱ्यांना दर्जेदार विस्तार सेवा देण्यासाठी बळकट विस्तार यंत्राद्वारे राज्य कार्यकर्ते आणि पशुधन मालकांची क्षमता निर्माण करणे.
  • उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि पशुधन क्षेत्राचे उत्पादन सुधारण्यासाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.

सादर वरील योजनेचा शासन निर्णय येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !