Navinya Purna Yojana Mahiti in Marathi :- नमस्कार सर्वांना, राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादनात चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना ही राबवण्यात येत आहे.
या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आजच्या या दिवशी घेण्यात आला आहे. राज्यामध्ये ग्रामीण भागात दूध उत्पादनात चालना मिळण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण,
अनुसूचित, जमाती, जाती उपाययोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपायोजना या योजनेअंतर्गत न लाभ देण्यात येतो.
Navinya Purna Yojana Mahiti in Marathi
2 दुधाळ देशी, 2 संकरित, 02 म्हशी यांचा 1 गट वाटप करणे या योजनेचे लाभार्थी निवड निकषांमध्ये आता दारिद्र रेषेखाली लाभार्थी व अत्यल्प भूधारक शेतकरी यांचा देखील समावेश करण्याबाबत
शासन निर्णय काढण्यात आला आहेत. कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

नाविन्यपूर्ण योजना माहिती मराठी
आता यामध्ये शासनाकडून या शेतकऱ्यांना देखील नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ मिळणार आहे. या संदर्भातील शासनाने 11 सप्टेंबर 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण
शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. यामध्ये शासनाचे पूरकपत्र हे या पुढील प्रमाणे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचा शासन निर्णय दिनांक 27/04/2023 च्या शासन निर्णय मधील पुष्ठ क्रमांक 3 मध्ये लाभार्थी निवडीचे निकष जे आहेत ते आता खालील प्रमाणे करण्यात येणार आहे.
📑 हे पण वाचा :- Mahadbt सर्व योजनांची यादी आली pdf डाउनलोड करा व यादीत नाव अनुदान पहा खरी माहिती लाईव्ह
AH Mahabms Yojana Mahiti Marathi
अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील प्राधान्य क्रमांकावर करण्यात येणार आहे. ते उतरत्या क्रमाने खालील प्रमाणे आहे.
- दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी
- अत्यल्पभूधारक शेतकरी (एक हेक्टर पर्यंतचे भूधारक)
- अल्पभूधारक शेतकरी (एक ते दोन हेक्टरचे भूधारक)
- सुरक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
- महिला बचत गटातील लाभार्थी (क्रमांक एक ते चार यामधील)
अशा पद्धतीने आता हा लाभ मिळणार आहेत. या संदर्भातील शासनाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. याचा शासन निर्णय तुम्हाला खाली दिलेला आहे तो जीआर तुम्ही डाऊनलोड करू शकतात.