Nimboli Ark Kase Banvayche :- शेतकरी बांधवांनो निंबोळी अर्क हे घरबसल्या तुम्ही बनवू शकता. निंबोळी अर्क कसे बनवावे ? त्यासाठी कोणकोणते सामग्री तुम्हाला लागते.
या निंबोळी अर्क शेतासाठी काय फायदा होतो ? कोणकोणत्या किडींवरती याचा कशाप्रकारे फायदा होतो ?. आणि निंबोळी अर्क कसे तयार करावे ?. याची सविस्तर माहिती आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Nimboli Ark Kase Banvayche
शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहीतच आहे की शेताच्या बांधवांवर मोठ्या प्रमाणात कडुनिंबाचे झाडे असतातच. तर या झाडांना भरपूर निंबोळ्या असतात, तुम्हाला माहीतच असेल या लिंबूळ्या सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत
आहेत. अर्थातच पिवळ्या होतात, आणि या मे महिन्याच्या शेवटी तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा पाऊस पडल्याच्या अगोदर निंबोळ्या गोळा करून तुम्हाला ठेवणे गरजेचे आहे.
5% निंबोळी अर्क कसा तयार करू शकता ?
निंबोळी अर्क सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ? याबद्दल माहिती पाहूया. आणि कोणकोणत्या पद्धतीने हे कोणत्या पिकांवरती चालतं याची माहिती पाहूया. कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिके,
फळ पिकांवर येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क हे पिकांवर फवारले जाते. तसेच रस शोषक किडींमध्ये मावा, फुल किडे, पांढरी माशी, तुडतुडे, पिठ्या ढेकूण,
पतंगवर्गीय किडीमध्ये गुलाबी बोंड आळी, घाटे अळी, शेंडे व फळे पोखरणारी अळी, तंबाखू वरील पाने खाणारी आळी, अशा किडींचे नियंत्रणासाठी निंबोळी अर्कचा मोठ्या प्रमाणात वापर शेतकरी बांधवांना करायला हवा. कारण यामधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळत असतो.
निंबोळी अर्कच्या किडींवरती काय परिणाम होतो ?
निंबोळी अर्क चा प्रवाह वेगवेगळ्या किडींवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. काही किडी लिंबोळ्याच्या वासामुळे दूर जातात, तर काही आळी अर्क फवारल्यानंतर पिकांना खाऊ शकत नाही.
त्यानंतर निंबोळी अर्क किडींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते. तर किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या काही न खाता मरून जातात.
कडुनिंबाचे पाणी व बियांमध्ये अँझाडीरेकटीन, निंम्बिन,व निंम्बिडिन, मेलियान ट्रीओल, सालांन्नीन हे महत्त्वाचे घटक आढळून येतात.
📋 हेही वाचा :- तुम्ही देखील चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले ?, परत कसे मिळणार ? पहा SBI बँकेने दिली माहिती वाचा डिटेल्स !
निंबोळी अर्कचा पिकांना काय फायदा होतो ?
त्यासोबतच कडुनिंबापासून तयार करण्यात आलेल्या अर्क किडीला अंडी घालण्यास प्रतिबंध करते. आणि कीड रोधक दुर्गंध किडीस खाद्य प्रतिबंधक,
कीड वाढ रोधक व कीटकनाशक या विविध मार्गाने परिणाम साधतो. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पिकांवरती मोठ्या प्रमाणात या निंबोळी अर्कचा फायदा पाहायला मिळत असतो.
5% टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची काय पद्धती आहे ?
उन्हाळ्यात निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळून साफ कराव्यात. आणि साठवून ठेवाव्यात, जेणेकरून साठवलेले निंबोळ्या फवारणीच्या 1 दिवस अगोदर कुठून बारीक तुम्हाला करावेच आहेत.
त्यानंतर 5 किलो निंबोळी चुरा 9 लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी रात्रभर भिजत ठेवाव्यात. एक लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत ठेवावा.
📋 हेही वाचा :- SC/ST/NT/OBC/SBC प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? पहा लिस्ट !
निंबोळी अर्क
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ लिटर पाण्यातील निंबोळी अर्कचा पातळ कपड्यातून गाळून घ्यावा. गाळलेल्या अर्कात 1 लिटर तयार केलेले साबणाचे द्रवण मिसळावे.
हे मिश्रण एकूण 100 लिटर होईल एवढं पाणी त्यात तुमचं टाकावेच आहे. म्हणजेच पहाटे निंबोळी अर्क फवारण्यासाठी तुमचा तयार होत असतो. फवारणीसाठी त्याच दिवशी तयार केलेला निंबोळी अर्क वापरावा.
Nimboli Ark Kasa Tayar Karaycha
उरलेल्या चौथा जमिनीमध्ये मिसळावा, त्याचा खत म्हणून चांगला उपयोग त्या ठिकाणी होतो. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून निवडकचा वापर करून रासायनिक
कीटकनाशकाच्या फवारणीच्या खर्च हा वाचतो. त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापर टाळून मित्र किडींचे संवर्धन होऊन पर्यावरणाचा समतोल राखता येतो.
अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही घरबसल्या काही दिवसातच जो काही निंबोळी अर्क 05% टक्के हा तुम्ही कमी खर्चात तयार करू शकता. ही सदर माहिती कृषी पत्रिका डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या कृषी पत्रिकेमध्ये माहिती दिलेली आहे.
📋 हेही वाचा :- आता एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असावी ? पहा काय सांगतो कायदा ? वाचा कायदा रहा बिनदास्त !
5% निंबोळी अर्क कसा तयार करू शकता ?
उन्हाळ्यात निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळून साफ कराव्यात. आणि साठवून ठेवाव्यात, जेणेकरून साठवलेले निंबोळ्या फवारणीच्या 1 दिवस अगोदर कुठून बारीक तुम्हाला करावेच आहेत.