Nimboli Ark Tayar Kase Karayche | निंबोळी अर्क चे फायदे | निंबोळी अर्क कसे बनवायचे ? | निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत कृषी विभाग

Nimboli Ark Tayar Kase Karayche :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये निंबोळी अर्क हे आपण घरबसल्या सोप्या पद्धती मध्ये 5% टक्के निंबोळी

अर्क कसे तयार करू शकता. निंबोळी अर्क तयार करण्याचे फायदे ? त्याचबरोबर निंबोळी अर्क कसे तयार करावे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

महाराष्ट्र शासन मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी गंगापूर आणि लासुर स्टेशन यांच्या माहितीनुसार 5% टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत

आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचत रहा. आपण 5%  निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.

Nimboli Ark Tayar Kase Karayche

सर्वप्रथम सामग्री आपल्याला जाणून घ्यायची आहेत. की निंबोळी अर्क तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणते सामग्री लागणार आहे. तर सर्वप्रथम कडुनिंबाच्या निंबोळ्या पूर्णपणे सुकवलेल्या 5 किलो लागणार आहेत.

तसेच पाणी 100 लिटर असणे गरजेच आहे. साबणाचा चुरा 200 ग्राम तसेच गाळण्यासाठी कापड आवश्यक आहेत. तर उन्हाळ्यात निंबोळ्या उपलब्ध असताना गोळा करून ठेवावे लागणार आहे, त्या चांगल्या वाळून साफ करावे व साठवून ठेवावे लागणार आहेत.

📝 हे पण वाचा :- केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; या गॅस सिलेंडर धारकांना मिळणार सबसिडी पहा तुम्हाला मिळेल का ?

निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत

फवारणीच्या अगोदरच्या दिवशी आवश्यक तितक्या निंबोळ्या घेऊन बारीक कुटून त्याचे पावडर करावी लागणार आहेत. तर पाच किलो निंबोळी पावडर नऊ लिटर पाण्यात भिजत ठेवावी लागणार आहे.

दोनशे ग्रॅम साबणाचा चुरा एक लिटर पाण्यात वेगळा भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळी अर्क कापडातून गाळून घ्यावे लागणार, त्यात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे लागतील.

नऊ लिटर एक लिटर साबणाचा चुरा एकत्रित मिसळून ढवळावे लागेल त्यानंतर मिश्रण शंभर लिटर बनेल इतके पाणी त्यात टाकावे. आपला निंबोळी अर्क तयार झाला आहे. तर निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीचा तयार करून वापरावा.

निंबोळी अर्क चे फायदे

निंबोळी अर्काची फवारणी संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दुपारी चार वाजल्यानंतर करावी, तरी याबाबत काही टिप्स आहेत. तरी आपण देखील जाणून घ्यावी निंबोळी अर्क चा उपयोग रस शोषक किडी जसे मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी.

तसेच कपाशीवर बोंड अळी, सोयाबीन वरील पाणे खाणारी अळी आणि किडीवर प्रभावीरीत्या तयार करता येते. तर अशाप्रकारे आपण घर बसल्या पाच टक्के निंबोळी अर्क तयार

करून आपल्या पिकांचे संरक्षण करू शकता. आणि चांगले उत्पादन घेऊ शकता. तर अशीच माहिती पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटला परत विजिट करत राहा.

📝 हे पण वाचा :- या सरकारी योजनेतून आता वार्षिक 6 लाख रु. व्याज मिळेल, पहा ही खास पोस्ट ऑफिसची योजना वाचा डिटेल्स

Leave a Comment