Niyamit Partfed Karjmafi Yojana | या बँकेकडून कर्ज घेतले असेल तरच 50 हजार प्रोत्साहन अनुदान पहा बँक कोणत्या ?

Niyamit Partfed Karjmafi Yojana

Niyamit Partfed Karjmafi Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये नियमित परतफेड केलेले शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा दिलासा देत आनंदाची बातमी दिली आहे. या अंतर्गत म्हणजेच आपण या बँकेकडून कर्ज घेतले असल्या तरच आपल्याला 50000 प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. तरी या बँक कोणती आहेत. कोणाला याचा लाभ मिळेल, याबाबत संपूर्ण माहिती जाणून येणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाबद्दल यामध्ये माहिती जाणून घेऊया.

Niyamit Partfed Karjmafi Yojana

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येईल.

कोणाला मिळणार 50 हजार प्रोत्साहन ? 

2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास. आणि 2018-19 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले. असल्यास त्याचप्रमाणे 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले. असल्यास 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल.

50 हजार प्रोत्साहन योजना 

2019-20 या वर्षातील घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड. केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.

हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा. अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50 हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्चित करण्यात येईल.

या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !