Nuksan Bharpai Yojana | अखेर नुकसान भरपाई जीआर आला ! हेक्टरी 36 हजार रु. पर्यंत लाभ पहा आजचा जीआर व खरी अपडेट

Nuksan Bharpai Yojana

Nuksan Bharpai Yojana :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे महत्त्वाचा जीआर आज रोजी निर्गमित केलेला आहे. तर राज्यातील जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत शेतीच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने जीआर निर्गमित केलेला आहे. हा जीआर आजच्या या लेखामध्ये सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टरी 36 हजार रुपये पर्यंत मदत या ठिकाणी दिली जाणार आहे. याबाबत हे अपडेट आहे, हा शासन निर्णय तर या लेखांमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत, लेख संपूर्ण वाचा.

 
 शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Nuksan Bharpai Yojana

जून ते ऑक्टोबर 2022 च्या कालावधीत अतिवृष्टी पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे. राज्य झालेल्या नुकसानी पोटी शासनाने बाधित शेतकऱ्यांना खालील प्रमाणे पिकनिक मदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे. ती मदत आपण खालील प्रमाणे पाहू शकतात. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत 13,600 प्रति हेक्टर 3 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत 27 हजार प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये असणार आहे. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत 36 हजार प्रति हेक्टर 3 हेक्टर च्या मर्यादेमध्ये ही मदत असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, शासनाने यामध्ये नवीन बदल करत तीन हेक्टर पर्यंत वाढ केली आहे.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई जीआर 

शासन निर्णय :- जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे. राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने. निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. २. तसेच, जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीकरिता शेतीपिकांच्या नुकसानीव्यतिरिक्त इतर बाबीकरीता संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार मदतीचे वाढीव दर लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. ३. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यक्तीरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात यावी.

नुकसान भरपाई महाराष्ट्र 2022

मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेतीपिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे. ५. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच यासाठी निधी वितरीत केल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करावी. सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. 

येथे पहा शासन निर्णय pdf क्लिक करा 


📢 शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन करिता 4700 कोटी रु. मंजूर येथे पहा हे अपडेट :- येथे क्लिक करा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

1 thought on “Nuksan Bharpai Yojana | अखेर नुकसान भरपाई जीआर आला ! हेक्टरी 36 हजार रु. पर्यंत लाभ पहा आजचा जीआर व खरी अपडेट”

  1. Pingback: 50 Thousand Incentive Grant | 50 हजार प्रोत्साहन अनुदान हवंय का ? 30 ऑगष्ट शेवटची मुदत हे काम करणे सर्वांना अनिवार्य पह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !