Old Ferfar Maharashtra | Old Ferafar | 1 जानेवारी पासून जुने फेरफार,सातबारा, 8 अ उतारा बंद होणार राज्यशासनाचा शासन निर्णय जाहीर

Old Ferfar Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती भूमी अभिलेख कार्यालयाचा महत्वाचा हा निर्णय आहे. जुन्या फेरफार बद्दल अपडेट आहे. Old Land Record आणि त्यावरून जमिनीचे मूळ मालक व जमीन हस्तांतरित झाली माहिती मिळत असते.

आपल्या सर्वांना माहीतच असेल, आणि Old Ferafar शेतकऱ्यांना या माहितीची गरज पडत असते. बँक कर्ज प्रकरणातील इतर जे कामे आहेत यामध्ये जुने फेरफार मागितले जातात. जसे बँक कर्ज असेल किंवा इतरही जे काही शासकीय काम आहे.

Old Ferfar Maharashtra

त्यांच्यासाठी जुनी फेरफार ही लागत असतात. आणि यासाठी तहसील कार्यालयात फेरफार काढण्यासाठी शेतकऱ्यांना जो वेळ हा लागतो. किंवा त्यासाठी वारंवारच्या फेऱ्या मारव्या लागतात, यासाठी शासनाने आता New Ferfar सुरू केलेला आहे.

नेमका हा फेरफार काय आहे ? हे महत्त्वाचं जाणून घेऊया. कोणता फेरफार बंद होणार आहे, हे महत्त्वाच आहे. महसूल विभागाकडून 06 डिसेंबर 2022 रोजी शासनाचा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे.

जुने फेरफार, सातबारा, 8 अ उतारा बंद होणार 

या शासन निर्णय अंतर्गत जुने हस्तलिखित फेरफार जे होते हे बंद करून नवीन स्वरूपात डिजिटल सातबारे, फेरफार, 8A उतारा ह्या ज्या काही सर्विसेस आहेत प्रॉपर्टी कार्ड असेल हे ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना सेवा देण्याकरिता शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

नेमकं आता कसे मिळतील हे नवीन फेरफार, सातबारा, 8अ उतारा हे देखील महत्त्वाचं आहे. पाहुयात भूमी-अभिलेख विभागाकडून सातबारा असे प्रॉपर्टी कार्ड त्याचबरोबर 8अ उतारा फेरफार असे क्यूआर कोड व 11 अंकी यु एल पिन देण्यात येणार आहे.

Old Ferfar Maharashtra

ड्रोन खरेदीसाठी शासनाकडून 4 लाख रु. अनुदान, पहा सविस्तर पात्रता

जुने फेरफार कसे काढावे

तसेच जुने फेरफार बंद करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेले आहे. 1 जानेवारी 2023 पासून डिजिटल स्वरूपामध्ये फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, नवीन स्वरूपातील सातबारे यूएन पिन व क्यूआर कोड उपलब्ध असणार आहे.

कोणकोणत्या गोष्टी त्यात बदलणार आहे, जे की शेतकऱ्यांना आता त्याचा फायदा होणार आहे. प्रॉपर्टी कार्ड फेरफार सातबारा शासकीय अथवा व्यावसायिक कामकाजांसाठी वापरता येणार आहे हे महत्त्वाचं आहे.

भूमि अभिलेख फेरफार

याप्रमाणे मूळ कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहणे देखील आता यामध्ये सोपं होणार आहे. जे यात घोटाळे होत होते किंवा फसवणूक होत होती. या आता या ठिकाणी पडताळून पाहता येणार आहे. जमिनीवर प्रॉपर्टीवर वेगवेगळ्या बँकेकडून कर्ज घेण्यास बंदी निर्माण होणार आहे.

जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या गैरवावर बसणार आहे. आणि त्याचबरोबर जमीन दोन ते तीन व्यक्तीने एकाच वेळेस खरेदी करण्याचा प्रकारचा याला आळा हा बसणार आहे. अशाप्रकारे शासनाकडून यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

Old Ferfar Maharashtra

शासन निर्णय येथे पहा pdf


📢 वडिलोपार्जित संपत्तीत किंवा शेत जमिनीवर मुलींचा अधिकार किती असतो :- येथे पहा 

📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !