One Nation One Fertilizer | एक राष्ट्र एक खत योजना सुरु पहा खत कोणते व कसे मिळेल खरी अपडेट लाईव्ह

One Nation One Fertilizer :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्वाची अशी माहिती आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून एक दिलासा देणारा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय म्हणजेच एक देश एक खत त्यालाच आपण वन नेशन वन फर्टीलायझर योजना असे देखील म्हणतो. तर याचविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत.

One Nation One Fertilizer

ऑक्टोबर महिन्यापासून युरिया आणि डीएपी देशभरात एकच ब्रँड ‘भारत’ म्हणून हा विक्री केला जाणार आहे. तर याबाबतीत अधिक माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वन नेशन वन फर्टीलायझर काय आहेत. आणि ऑक्टोबर महिन्यापासून कोणते खत हे या ठिकाणी वाटप केले जाणार आहे. ही संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.

एक राष्ट्र एक खत

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी यावेळेस ही माहिती दिलेली आहे. तर पंतप्रधान भारतीय सार्वजनिक खत प्रकल्प (PMBJP) अंतर्गत वन नेशन वन फर्टीलायझर उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर आता युरिया आणि डीएपी भारत ब्रँड नावाने या ठिकाणी देशभरात सुरू होणार आहे.

One Nation One Fertilizer Scheme

खत कंपन्यांना एकत्र गोणीवर त्यांचे नाव ब्रँड लोगो आणि इतर आवश्यक माहिती देता येणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितलेले आहे. परंतु खताच्या दोन तृतीयांश गोणीवर ‘भारत’ ब्रँड त्यालाच (पीएमबीजेपी) चा लोगो या ठिकाणी असणार आहे. ऑक्टोबर पासून ही व्यवस्था सुरू होणार आहे. परंतु खत कंपन्यांना त्यांचा सध्याचा जो साठा उपलब्ध आहे, तो विकण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

One Nation One Fertilizer twitter 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 100% अनुदानावर नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment