शेत, प्लॉट, जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन मोबाइलवर : Online Land Record Maharashtra

Online Land Record Maharashtra : मित्रांनो, नकाशा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशाप्रकारे महत्त्वाची भूमिका बजावतो आपल्या सर्वांनाच माहित आहे. कारण आपण शेतीचा नकाशा असेल, एखाद्या शहराचा नकाशा असेल किंवा सामान्य नका शा असेल नकाशावरती पाहूनच इतर बाबीचा अंदाज लावू शकतो.

Online Land Record Maharashtra

शेती किंवा प्लॉट अथवा जमिनीच्या नकाशाचा विचार केला, तर असे नकाशा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने संबंधित कार्यालयात जाऊन मिळवावी लागत असत. यामुळे शेतकरी व जनसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर नुकतीच ऑनलाईन नकाशे पाहण्याची सुविधा शासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

📣 ही माहिती सुध्दा पहा : या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप ; पहा संपूर्ण माहिती

या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, घरबसल्या पण एकदम सोप्या पद्धतीने कशाप्रकारे आपल्या मोबाईलवरती आपल्या शेतीचा किंवा जमिनीचा अथवा प्लॉटचा नकाशा कशाप्रकारे पाहू शकतो.

प्लॉट, जमीन, शेतीचा ऑनलाईन नकाशा कसा पहावा ?

सर्वप्रथम आपल्याला नकाशा पाहण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच महा-भू-नकाशा.कॉम  या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे माहिती दिसेल.

online Land Record Maharashtra

खालीलप्रमाणे जमिनीचा नकाशा पहा

  • वरीलप्रमाणे माहिती तुमच्यासमोर दिसल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडून घ्यायचा आहे, Rural-Urban असे दोन पर्याय तुमच्यासमोर दिसतील; त्यापैकी तुम्ही जर खेड्या गावातील असाल तर, Rural हा पर्याय निवडा अन्यथा जर तुम्ही शहरी भागातील असाल तर, Urban हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमचा संबंधित जिल्हा निवडून तालुका निवडा व शेवटच्या लिस्टमधून तुमच्या गावाचे नाव निवडा.
  • त्यानंतर Search By Plot No. या बॉक्समध्ये तुमच्या शेतजमिनीचा किंवा प्लॉटचा क्रमांक टाकून सर्च या पर्यायावर किंवा बटणावर क्लिक करा. सर्वे क्रमांक किंवा प्लॉट क्रमांक टाकल्यानंतर नकाशामध्ये तो क्षेत्र निळ्या रंगाने हायलाईट केला जाईल.
  • आता सर्वात शेवटी तुम्हाला एक पर्याय दिसेल; मॅप रिपोर्ट (Map Report) या पर्यायावरती क्लिक करा.
  • Map Report वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल त्या ठिकाणी तुम्हाला Show Report in PDF या पर्यायावर क्लिक करून तुमच्या शेतजमिनीचा किंवा प्लॉटचा नकाशा PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे.
  • तुमच्यामार्फत डाऊनलोड करण्यात आलेल्या पीडीएफ मॅप रिपोर्टमध्ये (Land Map Record PDF ) तुम्ही टाकलेला प्लॉट क्रमांक किंवा शेतजमिनीचा क्रमांक संबंधित संपूर्ण जमीनधारकांची माहिती क्षेत्र व इतर आवश्यक माहिती दाखविण्यात येईल.

निष्कर्ष : शेतकरी वर्ग किंवा सामान्य नागरिकांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेता; शासनाकडून आता प्लॉट व शेतजमिनीचे नकाशेसुद्धा ऑनलाईन पद्धतीने चालू करण्यात आलेले असून नागरिक याचा फायदा घर बसल्या घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला वरील प्रकारे प्रक्रिया करून तुमच्या जमीन (Land Record) किंवा प्लॉटचा नकाशा डाऊनलोड करता येतो.

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !