Petrol Diesel Price News | पेट्रोल,डीझेल दरात मोठी कपात तर गॅस सिलेंडर वर आता 200 रु. सबसिडी केंद्राकडून जाहीर

Petrol Diesel Price News | पेट्रोल,डीझेल दरात मोठी कपात तर गॅस सिलेंडर वर आता 200 रु. सबसिडी केंद्राकडून जाहीर

Petrol Diesel Price News

Petrol Diesel Price News :- केंद्राने शनिवारी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्याने पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपयांनी कमी होणार असून डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट केले की, देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्राने गरीब आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Petrol Diesel Price News

महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेला मोदी सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा कपात (Petrol Diesel Price) केली आहे. केंद्र सरकारनं पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे पेट्रोल (Petrol Price) 9.50 रुपयांनी आणि डिझेल (Diesel Price) 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर रात्री 12 वाजल्यापासून लागू झाले आहेत. 

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

अर्थमंत्र्यांच्या इतर महत्त्वाच्या घोषणा 

  • (gas cylinder subsidy) पीएम उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरवर यावर्षी 200 रुपये सबसिडी दिली जाणार आहे.
  • एका कुटुंबाला वर्षभरात 12 सिलेंडर मिळतील. 9 कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
  • ज्या उत्पादनांत आपण अनेक गोष्टींत आयातीवर अवलंबून आहोत,
  • तिथे प्लास्टिक उत्पादनांच्या कच्च्या मालावरील उत्पादन शुल्कही कमी करण्यात आलं आहे. 
  • काही स्टील उत्पादनांच्या कच्च्या मालावरील आयात शुल्कही कमी केलं जाणार आहे.
  • त्याचबरोबर काही पोलाद उत्पादनांवर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • सिमेंटची उपलब्धता वाढवण्यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत.
  • उत्तम लॉजिस्टिकमुळे सिमेंटची किंमतही कमी केली जाईल. 

Petrol Price in India

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पेट्रोलचा दर 9.50 पैसे आणि डिझेलचे दर 7 (petrol price) रुपयांनी कमी होणार आहे.

करोनाचं संकट, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध यामुळं निर्माण झालेली स्थिती. महागाईचा फटका यातून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारनं कर कमी केले आहेत. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी देखील पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा केली होती.

याशिवाय 12 सिलेंडर पर्यंत २०० रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याचं देखील निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं आहे. यामुळं केंद्र सरकारला वार्षिक १ लाख कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत. असं आवाहन सीतारमण यांनी केलं आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनी कर कमी केले नव्हते.

Petrol Diesel Price News

कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !