Pik Vima Manjur 2022 | खरीप पिक विमा मंजूर एकूण 310 कोटी रु. बँक खाते मध्ये

Pik Vima Manjur 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवासाठी महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजना 2021 मधील खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती. या बाबी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आणखीन 38 कोटी 51 लाख 7 हजार रुपये असे एकूण 310 कोटी 51 लाख 7 हजार रुपयाची विमा रक्कम मंजूर झालेले आहे.

आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया कोणता जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यासाठी खरीप पीक विम्यासाठी एकूण 3 लाख 82 हजार 958 शेतकरी यादी पात्र झालेले आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हा संपुर्ण लेख वाचा.

परभणी पिक विमा 2021

दिनांक 20 जानेवारी 2022 पर्यंत दोन टप्प्यातील विमा रक्कम मिळून एकूण 3 लाख 78 हजार 715 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 310 कोटी 19 लाख 80 हजार रु. जमा करण्यात आली आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

पिक विमा न मिळालेले शेतकरी 

ज्या लाभार्थ्यांना 72 तासाच्या आत अर्थातच विहित मुदतीत नुकसानीची पूर्वसूचना देऊनही ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. असे शेतकरी व पिक विमा प्रस्ताव भरताना शेतकऱ्यांची नाव, बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड, चुकले असतील अशा शेतकऱ्यांनी पुढे दिलेल्या [email protected], [email protected], [email protected], [email protected]. ईमेल आयडी वरती पिक विमा पावती, नुकसानीच्या तक्रारीचा पुरावा, बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स. हे कागदपत्रे आपल्याला ईमेल करायचा आहे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे साहेब यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

पिक विमा मंजूर यादी 2021 

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी एकूण 4 लाख 10 हजार 449 पूर्वसूचना. विविध माध्यमातून विमा कंपनीस रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला सादर केल्या होत्या. तर त्याचे सर्वेक्षण चे काम पूर्ण झाले आहे. अन त्यात एकूण 27 हजार 464 पूर्वसूचना आहेत ह्या पूर्वसूचना विमा भरपाई साठी अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यात 885 पूर्वसूचना (Pik Vima Manjur 2022) पिक विमा प्रस्ताव सादर न केलेल्या शेतकऱ्यांनी केलेले आहेत. तर 25 हजार 587 पूर्वसूचना या दोन वेळा सादर केलेल्या आहेत.

Kharip Pik Vima Parbhani 

पीक कापणी सुरू झालेल्या 666 आणि इतर 326 पूर्वसूचना पुन्हा समावेश करण्यात आला आहे. तर डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात 3 लाख 51 हजार 160 शेतकऱ्यांना 272 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 3 लाख 80 हजार 958 शेतकऱ्यांना 310 कोटी 51 लाख सात हजार रुपये चा विमा मंजूर झाला आहे. अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी यावेळेस दिली आहे.


📢 ट्रक्टर ५०% अनुदान योजना :- येथे पहा 

📢 शेतीचा बांध कोरला तर होणार फौजदारी कारवाई :- येथे पहा 

 

Leave a Comment