Pikavar Daru Favarani in Marathi :- शेतकरी बांधव आता सध्या वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा देशी जुगाड पद्धतीनं शेती करत आहे. आणि यातच आता विविध जे काही शिकलेले लोक आहेत हे सुद्धा शेतीकडे वळत आहे. कारण शेतीमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येत आहे.
आधुनिक पद्धतीने शेती करून कष्ट कमी आणि उत्पन्न जास्त घेता येते. अशाच पद्धतीने आता शेतकरी एक आगळा आणि वेगळा प्रयोग करत आहे. तो म्हणजे पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी दारूची फवारणी करत आहेत. आणि याचा फायदा नेमकी होतो का ? किंवा पिकांवर फवारणी करणे योग्य आहेत का ? कृषी तज्ञांचे मत यावर काय आहे ?
Pikavar Daru Favarani in Marathi
अलीकडे काही शेतकरी पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी दारूची फवारणी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नर्मदापूरम जिल्ह्यातील चंदौन, संखेडा आणि जामणी या गावात शेतकऱ्यांनी पिकावर दारू फवारणी केली आहे.
देशी दारूची फवारणी केल्यास पिकाचे उत्पादन वाढेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र या प्रकारचा प्रयोगाचा पिकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे कृषी तज्ञांचे देखील म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी पिकांवर अल्कोहोल फवारणी करून उत्पादन वाढवायचे आहे.

पिकांवर अल्कोहोल फवारणी
शेतकऱ्यांना अशाप्रकारे पिकातून जास्तीत जास्त उत्पादन मिळण्याची आशा आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. कृषी शास्त्रज्ञाच्या मते अशा प्रयत्नांमुळे पिकाला काही फरक पडत नाही, तर शेतकऱ्यांचा हा दावा पूर्णपणे खोटा ठरत आहे.
कृषी तज्ञ अभिषेक चॅटर्जी यांनी बाबत माहिती दिलेली आहे. पिकांची वाढ वाढवण्यासाठी बाजारात अनेक कीटकनाशके उपलब्ध आहेत, त्याचा उपयोग शेतकरी करू शकतात. दारूची फवारणीचा पिकांवर आतापर्यंत कोणताही परिणाम झाला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
📑 हे पण वाचा :- अरे वा ! आता नॅनो ट्रॅक्टर झाला लॉन्च, शेतीतील सर्व कामे करणार, दिवसाला फक्त 3 लिटर डिझेल, किंमत फक्त 61 हजार रुपये, पहा व्हिडीओ व खरेदी करा !
पिकांवर दारू फवारणी करावी का ?
त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. हा प्रयोग प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाकडे टाकणारा आहे. कारण वैज्ञानिक तथ्यविरुद्ध अशा प्रयोगामुळे कदाचित नुकसान होऊ शकते. नर्मदापुरम जिल्ह्यात मुगाची उत्पादन वाढण्यासाठी अल्कोहोल फवारणीचा वापर वाढू लागला आहे.
परंतु यावरती अजून कोणताही रिझल्ट आला नसल्याचं अपडेट आहे, तर अशा प्रकारे कृषी तज्ञांचं मत आहे. तुम्ही देखील फवारणी करत असाल तर याचा विचार करून फवारणी करावी. जर रिझल्ट मिळत असेल तर काही प्रमाणात फवारणी करून रिझल्ट घ्या. आणि त्यानंतर तुम्ही फवारणी करू शकता. अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जे तुमच्या नक्की कामात येणार आहे धन्यवाद…
📑 हे पण वाचा :- तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या योजनेतून मिळेल 5 हजार रुपये, फक्त असा घ्या तात्काळ घ्या लाभ वाचा योजनेची डिटेल्स !