PM Jeevan Jyoti Bima Yojana in Marathi | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कागदपत्रे | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ऑनलाईन खाते कसे उघडावे ?

PM Jeevan Jyoti Bima Yojana in Marathi :- आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. मोदी सरकारची ही खास योजना असून मोदी सरकारने ही योजना देशभरातील सर्वसामान्य

नागरिकांसाठी तसेच सर्व नागरिकांसाठी सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही 436 रुपये भरून कुटुंब हे संपूर्ण सुरक्षित करू शकता. अशी ही केंद्र शासनाची योजना आहे या योजनेची अधिक माहिती आपण जाणून घेऊया.

योजनेचे नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना
योजना केंद्र सरकार
कधी सुरू झाली ? 09 मे 2015 
लाभार्थी भारताचे नागरिक
पात्रता वय 18-50 वर्षे 
अधिकृत संकेतस्थळhttps://www.jansuraksha.gov.in/

PM Jeevan Jyoti Bima Yojana in Marathi

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची माहिती मराठीत संपूर्ण जाणून घेणार आहोत काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ? यांतर्गत कसा लाभ दिला जातो.

याची सविस्तर माहिती या योजनेच्या माध्यमातून केवळ चार्जेस 436 रुपये आता 2 लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स दिला जातो. योजनेची सुरुवात केंद्र शासनाने 2015 स*** केली होती.

📋 हे पण वाचा :- श्रावणबाळ योजना महाराष्ट्र श्रावणबाळ योजना कागदपत्रे श्रावण बाळ योजना माहिती श्रावण बाळ योजना श्रावण बाळ योजना फॉर्म pdf

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

या योजनेचा हप्ता मापक असल्यामुळे तसेच मिळणारे फायदे तुलनेने जास्त असल्यामुळे ही योजना संपूर्ण देशातील लोकप्रिय ठरली आहे. आणि गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये अनेक लोकांनी योजनेचा फायदा घेतला आहे.

या योजनेत नियम अटी काय आहेत ? कशा पद्धतीने लाभ दिला जातो ही माहिती पाहूया. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाचा लाभ भारतातील कोणताही नागरिक घेऊ शकतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अर्ज आणि अर्ज फॉर्म कसा डाउनलोड

📝 पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना योजनेचा अर्ज फॉर्म pdf डाउनलोड येथे क्लिक करा

जीवन ज्योती विमा योजना लाभ/नियम अट

फक्त त्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी असाव लागतं. प्रधानमंत्री जीवन विमा योजनेच्या पॉलिसी चा लाभ 55 वर्षापर्यंत घेता येतो.

प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा असा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी दरवर्षीच्या 436 रुपये भरावे लागतात. एकदाच पैशाचा भरणा करावा लागतो.

तुम्ही विम्याचा हप्ता भरला की तुम्हाला 1 जून पासून पुढच्या 31 मे पर्यंत जीवन विमा मिळत असतो. या योजनेचा पुढील हफ्ता तुम्ही भरला नाही तर तुमची पॉलिसी रद्द केली जाते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर

इत्यादी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ऑनलाईन खाते कसे उघडावे ?

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यासाठी तुम्ही बँकेत जाऊन देखील खाते उघडू शकता. किंवा ऑनलाईन पद्दतीने या योजनेचे खाते उघडता येतात. याचा संबंधित सविस्तरपणे व्हिडिओ तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता.

येथे क्लीक करून अधिकृत वेबसाईटवर जा !

Video by :- Mahiti Medium

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !