Pm Kisan Samman Nidhi Yojana :- नमस्कार सर्वांना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि अद्याप ई केवायसी केली नसेल, तर तुम्हाला पीएम किसान
योजनेचा इथून पुढे लागू मिळणार नाही. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शनिवार पर्यंत ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
Pm Kisan Samman Nidhi Yojana
अन्यथा पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ई केवायसी प्रामाणिकरण बँक खाते आधार कार्डशी संलग्न करणे
भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केले आहेत. शासनाने दिलेल्या सुचनेनुसार जे लाभार्थी येत्या शनिवार दिनांक 9 सप्टेंबर 2023 पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत.
PM किसान सम्मान योजना ई-केवयासी लास्ट डेट
तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही त्यांची नावे ही Pm किसान योजनेतून वगळण्यात येणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती,
यात महत्त्वाचं जर तुम्ही अद्यापही ई केवायसी केली नसेल, तर ई KYC तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. अन्यथा त्या ठिकाणी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
📑 हे पण वाचा :- बालसंगोपन योजना फॉर्म pdf | बाल संगोपन योजना काय ? अर्ज नमुना, पात्रता, शासन निर्णय
Pm Kisan Samman Nidhi Yojana
मागील मे महिन्यापासून ते आज पर्यंत या संदर्भात गाव स्तरावर लाभार्थी शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करून केवायसी अपडेट होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर सुद्धा 9 सप्टेंबर
ही केवायसीची व आधार अपडेट करण्याची शेवटची मुदत शेतकरी बांधवांना देण्यात आली आहे. 10 सप्टेंबर 2023 पासून प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलवरून लाभार्थी सुचितून अशा लाभार्थींची नावे वगळले जातील.
योजनेचे लाभापासून वंचित राहण्यास संबंधित खातेदार शेतकरी स्वतः जबाबदारातील असे श्री नाटे यांनी माहिती दिलेले आहेत.
ई केवायसी Last Date 2023
आता ई केवायसी करण्याकरिता मोबाईल फोनवरून ओटीपी, वे सामायिक सुविधा केंद्र अर्थात सीएससी केंद्र मार्फत किंवा मोबाईल फोनवरून पीएम किसान google ॲप द्वारे चेहरा
पडताळणी आणि प्रामाणिकरण ही 3 पर्याय आता उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ई ही केवायसी करण गरजेचं आहे. अन्यथा ई केवायसी न केल्यास पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीतून तुमचे नाव वगळण्यात येतील.
Pm Kisan E-KYC Last Date
10 तारखेपासून म्हणजे 10 सप्टेंबर 2023 पासून ई-केवायसी आधार प्रमाणीकरण केली नाही तर त्यांची नावे हे रद्द करण्याचे कारवाई शासन स्तरावरून केली जाणार आहेत.
याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी अशी माहिती ज्ञानेश्वर नाठे (तालुका कृषी अधिकारी, सिन्नर) नाशिक यांनी माहिती दिलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही देखील ई केवायसी पासून अजून वंचित
असाल, तर जवळील सीएससी सेंटर किंवा आधार तुमचा मोबाईल नंबर शी लिंक असेल तर लवकर मोबाईलमधून KYC करू शकता. अधिक माहितीसाठी जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा माहितीसाठी भेट देऊ शकता धन्यवाद…..