Pocra Anudan Scheme List | पोकरा योजना अंतर्गत 50% ते 100% अनुदान देणाऱ्या योजनांची यादी आली पहा लगेच

Pocra Anudan Scheme List :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी या लेखात जाणून घेणार आहोत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोकरा योजना या पोकरा योजना अंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत. ज्या शेतकऱ्यांना मिळू शकतात, व त्यासाठी शासनाकडून अनुदान किती आहेत.

त्यासाठी अर्ज कसे करावे लागतात, कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये तसेच गावांमध्ये ही योजना राबवली जाते. त्यालाच आपण पोखरा योजना असे म्हणतो. तर याच योजनेविषयी सविस्तर माहिती कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळतं ?, त्यासाठी अर्ज कसा करावा लागतो. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे.

Pocra Anudan Scheme List

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अनुदान योजना. यामध्ये शेतकरी बांधवांसाठी विविध कृषी यांत्रिकीकरण योजना नवीन विहीर अनुदान योजना. त्याचबरोबर इत्यादी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन तसेच शेडनेट वेअर हाऊस किती प्रकारचे योजना. यामध्ये राबविल्या जातात परंतु राज्यातील काही जिल्ह्यातील गावांचा या मध्ये समाविष्ट आहे.

जसे या ठिकाणी पाच हजार पेक्षा जास्त गावांची या मध्ये नोंद करण्यात आलेली आहे. त्याच गावातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी खालील दिलेले अनुदान पद्धती आपण बघू शकतात. आणि त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

पोकरा अनुदान योजना लिस्ट 

 • कोणत्या योजनेसाठी किती अनुदान आहे खाली पहा
 • तुषार सिंचन Sprinkler (19355 रू अनुदान 80%)
 • ठिंबक सिंचन Drip Irrigation ( अंतर 1.8×06mt.1 हेक्टर अनुदान 73248रू 80 %)
 • बिज उत्पादन (100%अनुदान)
 • गांडुळ खत युनिट एक हाऊथ(लांबी 10 फुट, 3 रूंदी, 2.5 उंची. 7500 रु अनुदान ,75%)
 • नांडेप खत युनिट एक हाऊथ(लांबी 10 फुट, 6 रूंदी, 3उंची. 7500 रु अनुदान ,75%)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनांची यादी 

 • सेंद्रिय खत युनिट (4500 रु अनुदान ,75%)
 • शेततळे ( अनुदान 50%)
 • गोड्या पाण्यातील मत्स्य पालन व शेततळे (अनुदान 75%)
 • शेडनेट हाऊस (अनुदान 75%)
 • पॉलिहाऊस (अनुदान 75 %)
 • विहिर पुनर्भरण (अनुदान 100%)
Pocra Anudan Scheme List
 • रेशीम उद्योग(अनुदान 75% एससी एसटी 90%)
 • फळबाग लागवड ( आंबा डाळिंब चिकू पेरू संत्रा मोसंबी आवळा कागदी लिंबू सिताफळ इत्यादी फळझाडे) 
 • फळबाग लागवड अनुदान 100%.पहिले वर्ष 50%,दुसरे वर्ष 30%, तिसरे वर्ष 20%)
 • बांबु लागवड (अनुदान 75%. पहिले वर्ष 38%,दुसरे वर्ष, 22%, तिसरे वर्ष 15%)
पोकरा योजनांना किती अनुदान मिळते ? 
 • मधु मक्षिका पालन(अनुदान 75%)
 • शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन(अनुदान 100% ,1 हेक्टर 10000रू)
 • रुंद वाफा सरी तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन (अनुदान 100%,1 हेक्टर 2000रु).
 • गोडाऊन (अनुदान 60%)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोकरा या योजनेमध्ये कोण कोणते जिल्हे आहेत. तसेच कोणता तालुका कोणता गाव आहे. हे पाहण्यासाठी आपण पुढे दिलेले जिल्हे आणि त्या शेवटी गावांची यादी आहे पीडीएफ फाईल हे आपण दिलेले आहे. त्यानुसार आपण त्या गावातील लाभार्थी असेल तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता.

Pocra Anudan Scheme List

Pocra Village List/ पोकरा मध्ये असलेले गावाची यादी येथे पहा

कृषी संजीवनी प्रकल्प अनुदान योजना

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अनुदान योजना. यामध्ये विविध योजना राबविल्या जातात. आणि यासाठी अनुदान सुद्धा मोठ्या प्रमाणात दिल्या जाते.  तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा. व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ नक्की पहा. त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.


📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !