Pocra Tractor Yojana 2022 | पोखरा योजनेत ट्रॅक्टर लॉटरी लागली फक्त हा जिल्हा

Pocra Tractor Yojana 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. आजच्या यालेखा मध्ये राज्यात राबविण्यात येणारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोखरा योजना या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरची सोडत लॉटरी लागली आहे. तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

कोणत्या जिल्ह्यासाठी निवड झाली आहे तसेच किती लोकांना ट्रॅक्टर सोडत लॉटरी लागली आहे. याबाबत संपूर्ण माहिती तसेच पोखरा योजनेत ट्रॅक्टर साठी किती अनुदान मिळते याबाबत संपूर्ण माहिती.

Pocra Tractor Anudan 2022

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50% टक्के अनुदान मिळते. यामध्ये जास्तीत जास्त अनुदान मर्यादा 1 लाख 25 हजार रुपये असते.

नानाजी देशमुख ट्रॅक्टर योजना

ट्रॅक्टर सोडत जिल्हा जालना या जिल्ह्यात ट्रॅक्टरच्या लाभासाठी लाभार्थी सोडत जाहीर करण्यात आली आहे. घनसांगी (जालना) तालुक्यातील अंतरवाली राठी येथे पोखराच्या योजनांतर्गत ट्रॅक्टर व अवजारांसाठी इच्छुक लाभार्थ्यांची कृषी विभागाच्या वतीने गुरुवारी सोडत जाहीर करण्यात आली. गावातील 3 शेतकरी ट्रॅक्टरसाठी पात्र ठरले आहेत.

घनसावंगी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांच्या सूचनेनुसार गुरुवारी अंतरवाली राठी येथे कृषी संजीवनी समितीची बैठक पार पडली. (Pocra Tractor Yojana 2022) अंतरवाली राठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, यांत्रिकीकरण, कृषी अवजारे, यासाठी अर्ज केले होते.

त्या अर्जाची सोडत काढण्यात आली होती. ट्रॅक्टर साठी 37 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी योजनेतून 3 ट्रॅक्‍टर द्यायचे होते तर पोखराच्या निकषानुसार सोडत काढून 3 शेतकरी पात्र ठरवण्यात आले होते. यांत्रिकीकरणासाठी आलेल्या अर्जांपैकी 6 शेतकरी पात्र ठरले आहे.


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना ऑनलाइन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड केंद्राची योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment