Post Office 396 Yojana in Marathi | पोस्ट ऑफिसची नवी भन्नाट योजना सुरू, केवळ 396 रुपयांत मिळवा 10 लाखांचा लाभ, पण कोणाला कसा जाणून घ्या !

Post Office 396 Yojana in Marathi
Rate this post

Post Office 396 Yojana in Marathi :- देशातील सर्व नागरिकांना केवळ 396 रुपयांमध्ये 10 लाख रुपयाचे विमा मिळणार आहे. परंतु हा विमा मिळणार, पण हा कसा मिळणार आहे ? कोणाला मिळणार ? हा 396 रुपयेचा विमा कसा काढायचा आहे ? यासाठी काय पात्रता आहे? कागदपत्रे कोणती लागतात ऑनलाईन पद्धत आहे

की ऑफलाइन पद्धत आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहूयात. भारतीय डाक विभाग अंतर्गत मागील तीन वर्षापासून राबवले जाणारे अपघाती विमा सुरक्षा योजनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे टपाल खात्याने बजाज व टाटा एआयजी सोबत करार करून देशातील गरिब आणि मध्यमवर्गी कुटुंबासाठी अपघात संरक्षण विमा योजना ही सुरू केली आहे.

Post Office 396 Yojana in Marathi

या माध्यमातून 396 व 399 दोन वेगवेगळ्या विमा पॉलिसी आहेत. आज आपण या पॉलिसी बद्दलच माहिती जाणून घेऊया. कशा पद्धतीने याचा लाभ तुम्हाला घेता येतो ? याची थोडक्यात माहिती पाहूया. भारतीय टपाल विभागाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी विमा सुरक्षा योजना सुरू करण्यात केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मध्यमवर्गीय

कुटुंबीयांना याचा लाभ थेट मिळणार आहे. आता विमा पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी केवळ पोस्टाच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत आयपीबी खाते उघडणे बंधनकारक आहे. यामध्ये लाभार्थीला वर्षासाठी 10 लाख रुपये अपघाती विमा फक्त 396 आणि 399 मध्ये काढता येतो. दोन्ही ही पॉलिसी या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया.

पोस्ट ऑफिस अपघाती विमा 396 रुपये

टपाल खात्याने बजाज सोबत करार असलेल्या विमा पॉलिसीचा प्लॅन घेता येतो यामध्ये दहा लाखाचा सुरक्षा कवच तुम्हाला मिळतो. तसेच अपंगत्व किंवा अंशतः अपघात झाल्यास दहा लाखाच्या अर्थसहाय्य देखील दिले जाते. तर रुग्णालयात दाखल झाल्यास 60000 हजार रुपये दवाखाना खर्च कॅशलेस या ठिकाणी केला जातो.

आणि त्याचबरोबर एडमिट न होता उपचार घेतल्यास 30 हजार रुपये पर्यंत खर्च रक्कम ही तुम्हाला मिळते. दुर्दैवी मृत्यू झाल्यास वारसाला 10 लाख रुपये मदत दिली जाते. कुटुंबातील एका मुलाचे शिक्षणासाठी 1 लाख रुपयाचे अर्थसहाय्य देखील दिल्या जाते.

✍️ हे पण वाचा :- पिकांचे नुकसान झाले ? पीक विमा हवा ? मग तात्काळ मोबाईल मधून करा पिकांची नुकसानभरपाई नोंदणी !

पोस्ट ऑफिस 399 पॉलिसी मराठी

हा पॉलिसी प्लॅन टाटा सोबत टाईप करण्यात आलेला आहे. यामध्ये कॅशलेस सुविधा तुम्हाला मिळत नाहीत, दिला जातो. अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व झालेल्या 10 लाख रुपये यामध्ये तुम्हाला मिळते.

या पोस्ट ऑफिस पॉलिसी कुठे कशा काढाव्यात यासाठी कुठल्याही जवळच्या टपाल ऑफिस मध्ये जाऊन किंवा उपकार्यालय जाऊन पोस्टमास्टर अथवा काउंटर वर भेट देत आयटीबीपीचे बॅग खाते उघडता येतात.

बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, सोबत असणं आवश्यक आहे. ऑनलाइन विमा पॉलिसी काढल्यानंतर ई-मेलवर पॉलिसी कागदपत्रे प्राप्त होतात. यावर अशा पद्धतीने तुम्ही या पॉलिसीचा लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीची ही पॉलिसी आहे, अधिक माहितीसाठी पोस्ट ऑफिसची संपर्क करावा धन्यवाद….

✍️ हे पण वाचा :-  मनी व्ह्यू कर्ज घेण्यासाठी पात्रता ? | मनी व्ह्यू कर्ज घेण्यासाठी कागदपत्रे कोणती ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top