Post Office Best Return Scheme :- नमस्कार सर्वांना, आज या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील तसेच देशातील सर्वसामान्य व गोरगरिबांची योजना म्हणजे पोस्ट ऑफिस होय. पोस्ट ऑफिस हे आपल्या नागरिकांसाठी विविध
प्रकारच्या विविध योजना या राबवत असते. या योजना राबवत असताना विविध योजनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्याजदर आणि गुंतवणूक कालावधी आहे. आज अशा योजनेची माहिती जाणून घेणार आहोत जे सर्वाधिक व्याज देणाऱ्या योजना आहेत.
Post Office Best Return Scheme
अर्थातच पोस्ट ऑफिस योजना अंतर्गत कोणकोणत्या योजनांसाठी अधिक व्याज दिले जाते ? याची माहिती आज आपण जाणून घेऊया. पोस्ट ऑफिसची सर्वाधिक चांगली योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना याला सामान्यतः
पोस्ट ऑफिस MIS योजना असे म्हटले जाते. या योजनेत 7.4% व्याज दिले जाते, तर MIS 05 वर्षाची ठेव योजना असून त्यावर दरमहा व्याज दिले जाते. जास्तीत जास्त 9 लाख रुपये एकाच नावाने आणि 15 लाख रुपये संयुक्त नावाने जमा करता येतात.
किसान विकास पत्र योजना माहिती मराठी
ही योजना रक्कम दुप्पट करणारी असून या योजनेत 115 महिन्यांमध्ये पैसे दुप्पट होतात. किसान विकास पत्र अंतर्गत सध्या 7.5% व्याज दिले जाते, या पैशावर जमा केलेले पैसे रायकर सवलत मिळत नाही. आणि नियमानुसार मिळणाऱ्या व्याजावर आयकर देखील भरावा लागतो.
PPF योजनांवर देखील खूप चांगली व्याज तुम्हाला मिळते. योजनेत 7.1 टक्के व्याज दिला जातो. ही योजना पंधरा वर्षाची आहे, ज्यामध्ये दरवर्षी पैसे जमा करावे लागतात. योजनेतदरवर्षी जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात.
📑 हे पण वाचा :- पर्सनल आणि गोल्ड लोन सोडा, येथे मिळतंय सर्वात स्वस्त लोन; पाहा किती आहे व्याजदर, किती व्याजदर ? वाचा डिटेल्स !
सुकन्या समृद्धी योजना
आयकर 80C कलम अंतर्गत ठेवीवर आहे कर्ज मिळू शकते. याशिवाय पीपीएफ मध्ये पैसे जमा केल्यावर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. दुसरीकडे जर योजना पाहिली तर ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही सर्वाधिक लोकप्रिय योजना आहेत. आणि या योजनेंवर आयकर सूट दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजना माहिती व व्याजदर ? मुलीच्या नावाने खाते उघडता येतात. या योजनेत सध्या 21 वर्षाची ही ठेव योजना आहे. आणि मुलगी मोठी झाल्यावर संपूर्ण पैसे तिला मिळतो.
राष्ट्रीय बचत योजना माहिती मराठी
पोस्ट ऑफिस एनएससी वर सध्या 7.00 दिले जाते. या योजनेत पाच वर्षासाठी पैसे जमा केले जातात. पोस्टाची ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही योजना पाच वर्षासाठी आहे. सध्या इथे ठेवलेले पैशावर 8.2% व्याज दिले जाते.
आणि या योजनेत आयकर सवलती उपलब्ध असून येथे जमा केलेला पैशांवर प्राप्त करा सूट मिळते. संपूर्ण अशा प्रकारच्या पोस्ट ऑफिस योजना चालू आहेत. अशाच माहितीसाठी आपल्या वेबसाईटला पुन्हा भेट देत रहा धन्यवाद…