Post Office Profitable Scheme :- पोस्ट ऑफिसची ही योजना खूपच फायदेशीर आहे. आणि या योजनेत महिन्याला पैसे तुम्हाला मिळणार आहे. पोस्ट ऑफिसची ही कोणती योजना आहे ? या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ?, किती रुपये नफा यातून तुम्हाला मिळतो.
याची माहिती जाणून घेऊया, पोस्ट ऑफिसच्या योजनेत कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळू शकतो. पती-पत्नी मिळून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. या योजनेतील गुंतवणूक विषयी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊया. MIS Post Office Yojana अशा लोकांसाठी फायदेशीर आहे.
ज्यांना नेहमी उत्पन्न मिळत नाही, परंतु काही एकरकमी पैसे आहेत, त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करून उत्पन्नाची व्यवस्था ही करू शकतात. आणि या योजनेतील महत्वाची आणि कामाची गोष्ट म्हणजेच यामध्ये तुमची मूळ रक्कम तेवढीच राहते.
या योजनेत वयोमर्यादा ठेवण्यात आलेले नाही. या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणी खाते उघडू शकतात. आता तुम्हाला हे खाते उघडायचे असल्यास त्यासाठी पोस्ट ऑफिस ने वयोमर्यादा निश्चित केलेली नाही, त्यामुळे तुम्ही खाते उघडू शकता.

Post Office Profitable Scheme
योजनेत किमान 1 हजार रुपये गुंतवणूक करून याची सुरुवात करू शकता. आणि एक खात्यासाठी 9 लाख रुपये आणि जॉईंट खात्यासाठी 15 लाख रुपये तुम्ही गुंतवू शकता. तुमची एकल खाते नंतर असेल ते खाते जॉईंट मध्ये रुपांतरीत देखील करू शकतात.
या योजनेच्या मॅच्युरिटी कालावधी 05 वर्षाचा आहे. आणि कोणत्याही कारणास्तव तुम्हाला मॅच्युरिटी पूर्वी योजना बंद करायचा असल्यास तुम्ही खाते एक वर्षानंतर बंद करू शकता. आता यासाठी 1% दंड लागेल. जर ही खाते अकाउंट तीन वर्ष अगोदर बदली केले तर तुम्हाला दोन टक्के दंड भरावा लागतो.

✅ हेही वाचा :- पोस्टाच्या या योजनेत करा FD, फक्त व्याजातून महिन्याचा खर्च भागेल, दरमहा मिळेल एवढे रुपये ? पहा पटापट !
MIS Post Office Scheme
या योजनेत नॉमिनीची सुविधा देखील उपलब्ध आहे. तुम्ही MIS खात्यातील पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये फ्री ट्रान्सफर देखील करू शकता. याला कोणताही कर लागणार नाही, मिळालेल्या व्याजावर टीडीएस लागू होतो. 1 एप्रिल 2023 पासून योजनेचे व्याजदर बदल करण्यात आला आहे.
आता व्याज 7.1% वार्षिक तर होते. तो आता वाढवण्यात आला असून तो दर आता 7.4 टक्के करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीने 05 वर्षासाठी 1 लाख रुपये जमा केले, तर त्याला 7.4% व्याजदर आणि दरमहा 617 रुपये मिळतील.

MIS योजनेची खाते कशी उघडावी ?
जर एका नागरिकांना 05 वर्षासाठी 5 लाख रुपये जमा केले तर 3083 रुपये महिन्याला उत्पन्न त्यातून मिळते. आणि त्यानुसारच एखाद्या व्यक्तीने पाच वर्षासाठी 15 लाख रुपये जमा केले, तर त्याला दरमहा 9250 रुपये ही मिळतात.
अशा प्रकारची ही योजना आहे, आणि या योजनेचे अधिक माहिती तुम्हाला जवळील पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आहे. तुम्ही या योजनेच्या आधिक माहिती करिता किंवा योजनेचे खाते उघडण्यासाठी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडू शकतात.

✅ हेही वाचा :- आता या सरकारी App च्या माध्यमातून एका क्लीकवर डाउनलोड करा तुमचे PF पासबुक, सरकारने नवीन App केले लॉन्च, पहा संपूर्ण माहिती !