Pot Kharab Jamin mhanje kaay || Pot Kharab Land || पोट खराब जमीन म्हणजे

Pot Kharab Jamin mhanje kay

Table of Contents

 पोट खराब जमीन लागवड योग्य जमीन कशी करावी || पोट खराब जमीनचे किती प्रकार असतात ? 

 

पोटखराब क्षेत्र म्हणजे नेमक काय ? पोट खराब क्षेत्राचे प्रकार किती असतात ? पोटखराब क्षेत्र याची लागवडी योग्य क्षेत्र रूपांतरित करण्याची प्रक्रिया काय असते ?  सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या 7/12 उतारा यावर पोटखराब क्षेत्र अशी नोंद आपल्याला पाहायला मिळत असते,

तर पोटखराब क्षेत्र म्हणजे नक्की काय कुठल्या प्रकारच्या पोटखराब क्षेत्राला शेतकरी लागवड योग्य शेतीमध्ये आणू शकतो,

व कुठल्या प्रकारच्या पोटखराब क्षेत्रला लागवड योग्य क्षेत्रामध्ये आणू शकत नाही, हे आपण पाहणार आहोत.

2018 मध्ये पोट खराब संदर्भात चा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयामुळे पोटखराब क्षेत्र ही लागवडी योग्य

क्षेत्र खाली आणले.  असेल तर सातबारा उतारा मध्ये पोटखराब लागवडी योग्य अशी नोंद करता येणार आहे

तर पोटखराब क्षेत्र हे लागवडीखाली आणले असून देखील सातबारा उतारा ची त्याची नोंद पोटखराब क्षेत्र अशीच असेल तर

शेतकऱ्याला याचं काय नुकसान होऊ शकते. तसेच पोटखराब क्षेत्र ची लागवड योग्य क्षेत्र करण्यासंदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत.

इंग्रजांनी 1919 ते 20 मध्ये 

जमिनीची मोजणी केली त्यावेळेस जमिनीचा कशासाठी वापर करण्यात येत होता त्याप्रमाणे त्याची सातबारावर नोंद करण्यात येत होती. 

ज्या क्षेत्रावर लागवड केली आहे, अशा क्षेत्र लागवडीखाली असे सातबारा यावर नोंदवण्यात आले.  तर पोटखराब क्षेत्र म्हणजे ज्या जमिनीच्या क्षेत्रात लागवड करणे शक्य होत नाही असे.

लागवडीसाठी योग्य नसलेले व पडीक ठेवलेली क्षेत्र म्हणजेच पोटखराब क्षेत्र असे क्षेत्राची नोंदणी पोटखराब क्षेत्र म्हणून सातबारा यावर नोंदवण्यात आली.

पोटखराब क्षेत्र याचे 2 प्रकार पडतात:- 

Pot Kharab Jamin mhanje

१) पोटखराब वर्ग अ:  पोट खराब वर्ग अ म्हणजे खडकाळ, नाली, खंदक, आणि इत्यादींनी व्याप्त असलेले क्षेत्र पोट खराब वर्ग खाली येणाऱ्या क्षेत्रावर महसुलाची आकारणी करण्यात आलेली नसते.

पोट खराब वर्ग खाली येणारी जमीन शेतकऱ्यास कोणतेही लागवडीखाली आणता येऊ शकते. जरी अशी जमीन शेतकऱ्यांनी कोणतेही लागवडीखाली आणली तरी अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही.

या प्रकारा खाली येणाऱ्या क्षेत्राची आकारणी करायचे असेल तेव्हा त्याबाबतचा प्रस्ताव तहसीलदार मार्फत माननीय जमाबंदी आयुक्तांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो.

अशा आदेशानंतरच या प्रकारा खाली येणाऱ्या क्षेत्रावर आकारणी करता येते,  अशा जमीन शेतकऱ्यांनी काही पिके घेतली असतील तर तलाठी यांना अशा पिकांची नोंद घेता येते.

२) पोटखराब वर्ग ब :-  सार्वजनिक प्रयोजनार्थ राखून ठेवलेली जमीन, रस्ता, मान्यपथ इत्यादीसाठी ची जमीन. तसेच  पिण्यासाठी किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरण्यात येणारे तलाव किंवा ओढा यांनी व्यापलेली जमीन कोणतेही जाती-जमाती कडून स्मशानभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरण्यात येणारी जमीन.

तसेच गावातील कुंभार कामासाठी अभिहस्तांतरण केलेली जमीन पोट वर्ग व या क्षेत्रात मोडते. या जमिनीवर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी करण्यात येत नाही.

पोटखराब महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 कलम 43  नुसार लागवडीखाली आणता येत नाही. नोंद सातबारा उताऱ्यावर लागवड क्षेत्र अशी होत नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.

याबाबत शेतकऱ्यांचे पोटखराब क्षेत्र लागवडीखाली वर्ग करून जिल्हाधिकारी व जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे अर्ज प्राप्त होत असतात.

याबाबत शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव प्रमाणे शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1968 मधील नियम 2 नियमांमध्ये बदल करून पोटखराब क्षेत्र लागवडीलायक क्षेत्रामध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिलेली आहे.   

त्यानंतर सर्वात महत्त्वाचे पोटखराब क्षेत्र लागवडीलायक क्षेत्रामध्ये रूपांतरित केल्यानंतर त्याचे काय फायदे होतात, ही पोटखराब क्षेत्र याची किंमत ही लागवडीला क्षेत्राच्या तुलनेत खूपच कमी असते असे क्षेत्र लागवडीखाली क्षेत्र मध्ये रुपांतरीत केल्यास त्याची किंमत वाढते.

तर असा फायदा पोट खराब जमीन लागवडीलायक केल्यास यामध्ये फायदा मिळतो.

 

जी जमीन आपण पोट खराब वरून लागवड योग्य जमीन केल्यानंतर आपण त्या जमिनीचा विमा काढण्यात येऊ शकतो.

पिक कर्ज मिळते नैसर्गिक आपत्ती लोकांच्या होणाऱ्या नुकसानीचा मोबदला मिळतो अशा जमिनीचे शासकीय कामासाठी शासनाद्वारे भूसंपादन केले गेल्यास मोबदला चांगला मिळू शकतो.

खरेदी विक्रीतील मोबदला सुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगला मिळतो.

 

पोट खराब क्षेत्राची लागवड क्षेत्रात रूपांतरित करण्याची प्रक्रिया :- 

एक सुटसुटीत अशी प्रक्रिया त्यासाठी शेतकऱ्यांनी याकडे एका साधा अर्ज करायचा असतो.

तलाठी खातेदारांसक्षम व पंचांसमक्ष  क्षेत्राची पाहणी करेल व एक नकाशा तयार करेल त्यामध्ये हे पोर खराब क्षेत्र दाखवेल  आणि त्याच बरोबर रूपांतरित केल्या चा पंचनामा देखील करेल.

त्याचा एक रिपोर्ट मंडळ अधिकाऱ्यामार्फत तहसीलदारांना पाठवण्यात येईल तहसीलदार या प्रस्तावावर भुमिअभिलेख अधिकाऱ्याकडून एक अभिप्राय की ही जमीन रूपांतरित करणे जोगी आहे का ?.

त्या जमिनीत ला किती आकार हा बसावा यातील तांत्रिक सल्ला भूमि अभिलेख विभाग यांना देईल जर काही ठिकाणी या

पोटखराब क्षेत्र विभागणी जी गरज असेल,

म्हणजेच पोटखराब क्षेत्र खातेदारांना मध्ये विभागले गेले नसेल सर्व खातेदारांनी संमती दिली तर त्यांच्या समान हिश्यने किंवा,

जर गरज भासली यांची मोजणी देखील केली जाऊ शकते. 

हा प्रस्ताव परत तहसीलदारांकडे येऊन त्याला प्रांताधिकारी मान्यता देतील आणि अशा जमिनीला सर्वसाधारण जमीन महसूल जो आहे तो आकारला जाईल.

अशी जमीन लागवडीयोग्य जमिनीतील सामाविष्ट करण्यात येतील. 

 

पोट खराब जमीन आहे ती आपल्याला नावावर कशी होणार ? 

Pot Kharab Jamin mhanje                                                                                                                                      पोटखराब जमीन आपल्या नावावर कशी होणार याचं सविस्तर माहिती आपल्याला मामलेदार कचेरी या मध्ये मिळणार आहे. माझ्या माहिती प्रमाणे :-  बहुतांश गाव नमुना सातबारा सदरी येथे जमिनीच्या क्षेत्राचा उल्लेख असतो तिथे पोटखराब क्षेत्राचा उल्लेख होत.

असतो पोटखराब क्षेत्राबाबत फारच कमी माहिती आपल्याला पाहायला मिळते,

त्यामुळे या लेखात पोटखराब क्षेत्र विषयी योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न माझ्या माहितीप्रमाणे त्यात आहे.

पोटखराब क्षेत्र म्हणजे शेत जमिनीच्या क्षेत्रात लागवड करता येणे शक्य नाही असे. लागवडीयोग्य नसलेले व त्यामुळे पडेल ठेवलेले शेत्र पोटखराब क्षेत्राबाबत कायदेशीर तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या वापरावरील निर्बंध नियम 1968 मधील यातील कलम 21 अन्वये करण्यात  आलेली आहे.

 


पोट खराब जमीन

शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता पाहिजे आहे

 

 

 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !