Poultry Farming Project :- नमस्कार सर्वांना. कुकूटपालन करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. तब्बल 5 लाख 13 हजार रुपये अनुदान देणारी योजना सुरू झालेले आहे. याच विषयी संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.
तर कोणत्या जिल्ह्यासाठी हे अर्ज सुरू झालेले आहेत. त्याच बरोबर कोणते लाभार्थी या योजनेस पात्र असतील अर्ज सादर कुठे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत काय आहे. याबाबत संपूर्ण माहिती लेखात जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Poultry Farming Project
राज्यातील एकूण 302 तालुक्यामध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे. योजनेसाठी जिल्हा-स्तरीय समितीने मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्यक्रमाने सन 2022-23 करीता या जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू झालेले आहे. आणि या योजने-अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहेत. तर जिल्हा त्याचा अर्ज कसा करायचे पात्रता जाणून घेणार आहोत.
परसातील कुक्कुट चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गट याची स्थापना. या अंतर्गत खंडाळा, महाबळेश्वर, कराड, या तालुक्यांमध्ये प्रति तालुका एक याप्रमाणे तीन लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
कुकुट पालन योजना पात्र जिल्हे ?
खंडाळा, महाबळेश्वर, आणि कराड, तालुक्यातील असेल तर आपण योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर या योजनेचे अर्ज करण्या-साठीचा कालावधी म्हणजे शेवटची मुदत दिनांक 16 ते 27 जून म्हणजेच आपल्याजवळ जवळपास 16 ते 27 जून पर्यंत मुदत असणार आहे.
तरी इच्छुक लाभार्थी आहेत, त्यांनी संपूर्ण अर्ज भरुन संबंधित पंचायत समिती किंवा पशुसंवर्धन विभागाकडे दिनांक 27 जून 2022 अखेर सादर करण्याची नोंद घ्यावी असे माहिती देण्यात आली आहे. तर याचा लाभ घेऊ शकता यासाठी लाभार्थी पात्रता जाणून घेण्यासाठी निकष, अटी, शर्ती, जाणून घ्या खाली दिलेल्या माहितीनुसार आहे.
Kukut Palan Yojana Maharashtra
सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना जनजाति क्षेत्रे योजनेतील लाभार्थी या योजनेस जे कुकूटपालन व्यवसाय करीत आहेत. ज्याला अंडी उबुणूक यंत्र आहेत. अशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.
कुकुट व्यवसायात रोजगार निर्मितीची आवड असणारे अर्ज करू शकतात. प्रकल्प कार्यान्वित करणे करीता आवश्यक असणारी साधने सुविधा व्यवहार्यता आणि पडताळणी करून लाभार्थी निवडण्यात येणार आहेत याची नोंद घ्यावी.
हेही वाचा; 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना सुरु करा ऑनलाईन अर्ज
कुकुट पालन योजना अनुदान किती ?
कुक्कुट विकास स्थापना योजनेंतर्गत एकूण प्रकल्पाची किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये आहे. तर सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाच्या अनुदान 50% असणार आहेत. म्हणजेच सर्व अनुदान एकदाच आहे.
ते म्हणजे 50% टक्के तरी कुणाला किती मिळेल किती रक्कम मिळेल ?. तर ते पहा 5 लाख 13 हजार 750 रुपये एवढे अनुदान आपल्याला दिले जाणार आहे. उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थीच्या स्वतः किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभा करावा लागणार आहे.
हेही वाचा; शेत जमीन नावावर करण्यासाठी 100 रु. लागणार पहा GR पहा येथे
सधन कुकुट पालन योजना वयोमर्यादा
या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो. या योजनेसाठी वयोमर्यादा काय आहेत कोणते लाभार्थी पात्र आहेत प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे. याबाबत माहिती लाभारती अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष राहील.
लाभार्थी निवडतांना 30 टक्के महिलांना तर योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे. सन 2018-19 पासून टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणाऱ्या तरतुदीचे अधिन राहून योजना राबवण्यात येणार आहे. तर जिल्ह्यातील तीन तालुक्यासाठी प्रति तालुका एक प्रमाणे निवड करण्यात येणार आहे.
तर 2500 चौरस फूट जागा स्वतःच्या मालकीची आणि दळणवळणाची पाण्याची सुविधा उपलब्ध असावी. विद्युतीकरण म्हणजे आपल्याकडे लाईट कनेक्शन असावे लागणार आहे.
हेही वाचा; नवीन कुसुम सोलर पंपाचे 50 हजार कोटा उपलब्ध पहा लगेच
📢 नवीन सिंचन विहीर योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
1 thought on “Poultry Farming Project | कुकुट पालन 5 लाख 13 हजार रु. अनुदान असा करा अर्ज”