Property Act in Marathi | तुम्हाला हा कायदा माहिती का ? सासऱ्याच्या आणि वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलींना व सुनेला मिळतो एवढा हक्क, जाणून घ्या हा कायदा !

Property Act in Marathi :- आज महत्त्वाच्या प्रॉपर्टी कायद्याविषयी माहिती पाहणार आहोत. प्रॉपर्टीवर मुली आणि सुनेचा हक्क असतो का आल्यास हा हक्क किती असतो? कोणत्या कायद्यांतर्गत असतो किंवा किती मिळतो ? या हक्काविषयी कायदा नेमकी काय आहे ?, याची माहिती पाहणार आहोत.

त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. स्त्रियांना प्रतीक बाबीवर पुरुषांसारखा समान अधिकार असतो. स्त्री जरी तिच्या आयुष्यात कधी मुलगी कधी पत्नी कधी सून अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत घर सांभाळत असली. तरी आजची स्त्री घर सांभाळून आपल्या पायावर उभे राहते.

Property Act in Marathi

आता नेमकी यासंबंधीतील कायदा काय सांगतो ?, मुलगी आणि सुनेचाचा वडील आणि सासऱ्यांच्या प्रॉपर्टीवर किती हक्क असतो ? हे तुम्हाला माहिती आहेत का ? हे देखील जाणून घेणं खूपच महत्वाचं ठरतं. आता यामध्ये हिंदू उतरधिकार (संशोधन) अधिनियम 2005 च्या नियमानुसार मुलींना संपत्तीचा समान अधिकार देण्यात आला आहे.

सुनेला बहु प्रॉपर्टी मध्ये आपल्या नवऱ्याच्या शेअर द्वारा प्रॉपर्टी वर हक्क मिळतो. तर मुलींना आता या संपत्तीमध्ये समान अधिकार दिला जातो. सुनेला मात्र ठराविकच अधिकार यामध्ये आहेत. मुलींचा वडिलांच्या संपत्तीत अधिकार किती आहे ?, प्रत्येक मुलीला आई-वडिलांच्या प्रॉपर्टीवर समान हक्क हा दिला जातो.

Hindu Succession

आता मुलगी ही विवाहित असो किंवा विधवा किंवा घटस्फोटित तरीसुद्धा ती आई-वडिलांचे घरी राहण्याचा हक्क मागू शकते. एवढेच नाही तर प्रॉपर्टी मधील संपत्तीवर मुलीचा पूर्ण अधिकारी असू शकतो. जर वडिलांनी वारस पत्रात मुलींचे नाव लिहिले नसेल तर, तिला संपत्तीचा अधिकार मिळत नाही. परंतु वडिलांचा वारसपत्र न लिहिताच मृत्यू झाला असेल, तर ती तिच्या भावंडासारखा संपत्तीत समान म्हणजेच 50/50% असा अधिकार मिळतो.

Property Act in Marathi

📋 हेही वाचा :- तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टी अवैध तर नाही ना ? लगेच हे कागदपत्रे तपासा पहा कोणते कागदपत्रे ?

सुनेचा सासऱ्याच्या संपत्तीत किती अधिकार असतो ?

हिंदू उत्तराधिकर (संशोधन) अधिनियम 2005 नुसार सुनेला संपत्तीमध्ये खूप कमी अधिकार मिळालेला आहे. सासू सासऱ्याच्या संपत्तीत सुनेला कोणताही अधिकार नसतो. ती फक्त नवऱ्याच्या संपत्तीवर अधिकार मिळवण्याचा दावा करू शकते.

सासू सासऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवर सुनेचा अधिकार नसतो, तो हक्क तिच्या नवऱ्याचा असतो, सासू-सासर्‍यांच्या वारसपतत्रात जर कोणाचेही नाव नसेल, आणि मुलाचा मृत्यू झाला असेल तर त्या संपत्तीवर मुलाची बायको म्हणून हक्क असतो. मुलाच्या मृत्यूनंतर सासू सासर्‍यांच्या प्रॉपर्टीवर सुनेचा अधिकार असतो.

नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुनेला समान अधिकार मिळतो, नवऱ्याचे निधनानंतर सासू सासरे सुनेला घर किंवा संपत्ती पासून दूर करू शकत नाही. आज आपण अशा प्रकारचे प्रॉपर्टी नॉलेज संदर्भात माहिती जाणून घेतली. (Property Knowledge)

Property Act in Marathi

📋 हेही वाचा :- कुसुम सोलर पंप योजना मोबाईल मधून ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? पहा कागदपत्रे, कोटा, ऑनलाईन फॉर्म संपूर्ण प्रोसेस 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *