Putrada Ekadashi Mahatva in Marathi :- नमस्कार सर्वांना, पुत्रादा एकादशी या एकादशीचं महत्त्व व्रत, विधी, आणि त्याचबरोबर वृत्त कथा मराठी ही संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सविस्तरपणे तुमच्यासाठी दिली आहे. हा आर्टिकल संपूर्ण वाचायचा आहे.
यंदा या शुभ योगात पुत्रदा एकादशी यामध्ये तिथी, मुहूर्त, पूजा, विधी, आणि महत्त्व याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. पुत्रदा एकादशी 2023 Putrada Ekadashi 2023 Muhurta And Puja Vidhi In Marathi मध्ये सविस्तर माहिती आपण पाहूयात. पुत्रदा या एकादशीचे व्रत श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथेला साजरा केली जाते.
यावेळी शुभ तारीख रविवार 27 ऑगस्ट 2023 आहे. यामध्ये पुत्रदा एकादशीला पुत्रा एकादशी असं देखील म्हटलं जात. या एकादशीच्या दिवशी तिथी, मुहूर्त, महत्व, नियम आणि पूजा विधि याची माहिती पाहणार आहोत. पुराणात सांगितल्या प्रमाणे हजारो वर्ष तपश्चर्या केल्याने जितके पुण्य मिळतं तितकच पुण्य, फळ केवळ पुत्रदा एकादशीच्या उपवासाने प्राप्त होत.
Putrada Ekadashi Mahatva in Marathi
अपत्यहीन दांपत्याने एकादशीच्या वृत्त केले आणि भगवान विष्णूचे ध्यान केले, तर चांगले गुण असलेले मुले प्राप्त होतात. एकादशी हा भगवान विष्णूचा सर्वात आवडता उपवास आहे. आता यात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर पुत्रदा एकादशी उपवास करून दान आणि विधीवत, पूजा केल्यास भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात.
जीवनांच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्यास लाभ मिळतो. आणि तसेच पुत्रदा एकादशी बाबत पुराणात सांगितलेत की जो भक्त प्रामाणिक भक्ती आणि नियमांनी एकादशीचे पालन करतो. त्याला जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते, आणि वैकुंठ धाम त्याला प्राप्त होते. सोबतच व्यक्तीला संतती आणि संपत्तीचा आनंद मिळतो.
पुत्रदा एकादशी तिथी, तारीख, माहिती मराठी
पंचागानुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी 26 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजून 09 मिनिटांनी सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 09 वाजून 33 मिनिटापर्यंत सुरू राहणार आहे. तिथीनुसार एकादशी 27 ऑगस्टला राहणार आहे,
म्हणजे 27 ऑगस्ट रोजी एक अतिशय शुभ सर्वार्थ सिद्धी योग्य राहणार आहे, जो सर्वार्थ सिद्धी योग पहाटे 05 वाजून 56 मिनिटं वाजता सुरू होणार आणि सकाळी 7:16 पर्यंत राहणार आहे. म्हणूनच या शुभ मुहूर्तावर पूजा करणे अत्यंत फलदायी होणार आहे.
पुत्रदा एकादशी पूजा विधी माहिती मराठी / Putrada Ekadashi Vrat Vidhi
Putrada Ekadashi Vrat Katha in Marathi शास्त्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे जो उपवास करतो त्याने ब्रह्म मुहूर्तामध्ये उठावे, स्नान (अंघोळ), ध्यान, इत्यादी झाल्यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करावे. आणि उपवासाचे वृत्त घ्यावे, त्यानंतर भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी,
त्यानंतर गंगाजल सर्वत्र शिंपडा त्यानंतर मूर्ती किंवा प्रतिमेला पंचामृताने अंघोळ घालून शुद्ध गावरान तुपाचा देवा लावा. आणि यावेळी परमेश्वराला म्हणजेच देवाला फुले अर्पण करा, आणि वृत्तकथा पठण करा आणि नंतर आरती करा.
पुत्रदा एकादशी महत्त्व माहिती मराठी
मान्यता नुसार पुत्रता एकादशीच्या व्रत केल्यास उत्तम फळ मिळते. जर एखाद्याला मुलांच्या सुखात अडथळ येत असतील तर तो वृत्त करू शकतो. यासोबतच हे व्रत केल्याने मुलांचे सर्व त्रास दूर होतात. सोबतच बाळाला आरोग्याच्या वरदान आणि चांगले वय ही मिळते. असं पुत्रता एकादशीचे महत्त्व आहे.
या पुत्रता एकादशीच्या वृत्त नक्की तुम्ही करा, आणि याचे अनेक लाभदायक लाभ मिळतात. अशा प्रकारे पुत्रता एकादशीच संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेतली आहे. यामध्ये काही चुकी असेल किंवा काही दुरुस्ती असेल तर नक्की कळवा धन्यवाद……..
📑 हे पण वाचा :- श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय ?, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र pdf संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी !