Rabbi Seed Subsidy 2021 | रब्बी हंगाम बियाणे वाटप अनुदान योजना

अनुदानावर बियाणे वाटप २०२१ 

नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वाना माहीतच असेल की रब्बी हंगाम हा लवकरच सुरू होणार आहे.

त्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना रब्बी हंगाम करिता अनुदानावर बियाणे वाटप करण्याची योजना सुरू केली आहे, या मध्ये राज्यातील जिल्ह्यानुसार १) अन्यधान्य पिके, २) गळीत धान्य या दोन बाबी अंतर्गत खालील दिलेल्या पैकी जिल्हानिहाय पिके, व जिल्हे देण्यात आलेले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत खालील बियाणेसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

पिकांसाठी अनुदान देण्यात येणारे जिल्हे

गहू:- १) सोलापूर २) बीड ३) नागपूर

कड धान्य:-  (हरभरा) राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी हरभरा बियाणे अनुदान दिले जाणार आहे.

Rabbi Seed Subsidy 2021

भरडधान्य:- (मका) १)नाशिक २) धुळे ३) जळगाव ४)अहमदनगर ५) सांगली ६)औरंगाबाद ७)जालना

पौष्टिक तृणधान्य:- १) नाशिक २) धुळे ३) नंदुरबार ४) जळगाव ५) अहमदनगर ६) पुणे ७) सोलापूर ८) सातारा ९) सांगली १०) कोल्हापूर ११) औरंगाबाद १२) जालना १३) बीड १४) लातूर १५) उस्मानाबाद १६) नांदेड १७) परभणी १८) हिंगोली १९) बुलढाणा २०) अकोला २१) वाशिम २२) अमरावती २३) यवतमाळ २४) वर्धा २५) गोंदिया २६) चंद्रपूर २७) गडचिरोली

Rabbi Seed Subsidy 2021 गळीतधान्य:– १) सांगली २) बीड ३) लातूर ४) उस्मानाबाद ५) नांदेड ६) परभणी ७) हिंगोली ८) वाशिम ९) चंद्रपूर

बियाणे वितरण:- वरील नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये हरभरा बियांण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. २५/ प्रति किलो १० वर्षावरील वाणास प्रति १२ ₹ किलो

संकरित मका रु. ९५/ प्रति किलो व रब्बी ज्वारी बियांण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. ३०/- प्रति किलो, १० वर्षा वरील वाणास रु. १५/- प्रति किलो

करडई बियांण्यासाठी रु. ४०/ प्रति किलो, गहू बियांण्यासाठी १० वर्षा आतील वाणास रु. २०/- प्रति किलो, १० वर्षा वरील वाणास रु. १०/- प्रति किलो 

अनुदान

अश्या वरील सर्व बियांण्यासाठी एकूण किंमतीच्या ५०% टक्के अनुदान हे दिले जाणार आहे. 

योजनेची मर्यादा 

सदर योजना 2 हेक्टर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करावा:- सदर योजनेचा अर्ज येत्या 30 ऑगस्ट २०२१ पासून १० सप्टेंबर २०२१ पर्यंत योजने मध्ये पात्र असेल व त्यांची लॉटरी मध्ये निवड केली जाणार आहे.

योजनेचा अर्ज प्रकिया

सदर योजना ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

योजनेचा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी लिंक : https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

पीक प्रात्यक्षिके-

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून
दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी
शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. २०००/- ते ४०००/-
प्रती एकर मर्यादेत DBT तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे
सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.

शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !