Rajiv Gandhi Gharkul Yojana :- मित्रांनो, शासनामार्फत गोरगरीब वंचित गटातील नागरिकांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध व्हावा या अनुषंगाने विविध अशा घरकुल योजना राबविल्या जातात. आज आपण अशाच एका घरकुल योजने संदर्भातील माहिती पाहणार आहोत.
Rajiv Gandhi Gharkul Yojana
त्या घरकुल योजनेचे नाव आहे, राजीव गांधी घरकुल योजना. राजीव गांधी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घर बांधण्यासाठी एक लाख रुपये आर्थिक मदत (Financial) शासनामार्फत दिली जाते.
आपण या लेखाच्या माध्यमातून राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना (Scheme) बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जशाप्रकारे अर्ज कसा करावा ? अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील ? इत्यादी बद्दलची संपूर्ण व सविस्तर माहिती.
राजीव गांधी घरकुल योजनेसाठी पात्रता
1. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयापेक्षा कमी असेल अशाच कुटुंबातील नागरिकांना राजीव गांधी घरकुल योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
2. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंब बातील व्यक्तीला 45 हजार रुपये बिनव्याजी कर्ज दिला जाईल.
3. दारिद्र्य रेषेवरील परंतु वार्षिक उत्पन्न 96 हजार रुपयापेक्षा कमी असलेल्या कुटुंबाकरिता ही योजना अनुज्ञेय राहील.
4. ज्या लाभार्थ्याची निवड या घरकुल योजनेसाठी करण्यात येईल त्या लाभार्थ्याच्या कुटुंबास नव्वद हजार बिनव्याजी कर्ज व लाभार्थी दहा हजार रुपये याप्रमाणे लाभार्थ्यास लाभ रक्कम मिळेल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
- लाभार्थी आधारकार्ड (aadhaar card)
- रेशनकार्ड (ration card)
- बँक पासबुक झेरॉक्स (bank passbook)
- जागेचा 8अ उतारा
- दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला (income certificate)
कर्ज परतफेडीची प्रक्रिया
लाभार्थी म्हणून निवड करण्यात आलेल्या व्यक्तींना नव्वद हजार रुपये बिनव्याजी कर्ज (Loan) घेतल्यानंतर दरमहा 833 रु. याप्रमाणे पुढील दहा वर्षासाठी कर्जाची परतफेड करावी लागेल.
घर बांधणीसाठी नागरिकाकडे स्वतःच्या मालकीची किंवा शासकीय अथवा ग्रामपंचायतीच्या मालकीची 750 चौरस फूट भूखंड क्षेत्रफळ असलेली जागा आवश्यक असेल.
📢 कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा