Rastriya Ann Surksha Abhiyan | नवीन योजना 50% अनुदानावर पिक संरक्षण औषध, तणनाशक,जिप्सम,जैविक खते, जैविक कीड नियंत्रण

Rastriya Ann Surksha Abhiyan :– शेतकऱ्यांना पिक संरक्षण औषध, तणनाशक, कीड व्यवस्थापनाची आवश्यकता जिप्सम, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण अशा विविध बाबींच्या खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या संदर्भातील एका अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी बियाणे निविष्ठ अनुदान देण्यासाठी राबवली जाणारी महत्त्वाचे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना.

Rastriya Ann Surksha Abhiyan

याच अभियाना बरोबर देशांमध्ये आता एकात्मिक कीड व्यवस्थापन देखील आणि या दोन्ही अभियानाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना खालील याप्रमाणे खरीप, रब्बी हंगामासाठी तणनाशकातील पीक संरक्षण औषध असतील व्यवस्थापनासाठी वापरली जाणारी औषध असतील जैविक खता असतील जिप्सम असतील .अशा विविध बाबींच्या खरेदी करता 50% पर्यंत अनुदान दिले जात आहे. यासाठी आता खरीप हंगाम 2022 करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

पिक संरक्षण औषध, तणनाशक, कीड,जिप्सम, जैविक खते,

सध्या खरीप हंगामातील पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार निविष्ठा खरेदी केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान सन 2022-23 उत्पादन वाढीसाठी निविष्ठा पुरवठा घटक-प्रकल्पा बाहेरील या बाबीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालीलप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.

Rastriya Ann Surksha Abhiyan
Rastriya Ann Surksha Abhiyan

सूक्ष्म मुलद्रव्ये, जिप्सम, जैविक खताच्या एकूण किमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपयाच्या मर्यादेत 2 हेक्टर क्षेत्रासाठी देय आहे. तसेच पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जैविक कीड नियंत्रण इत्यादी किंमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 500 रुपये हेक्टर देय आहे. एका शेतकऱ्याला कमाल 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

50 anudanavr khate vatap 

शेतकऱ्यांनी वरील निकषानुसार निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती , सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे. संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे खरीप हंगामासाठी दि. 15 सप्टेंबर 2022 पूर्वी व रब्बी हंगामासाठी दि. 30 डिसेंबर 2022 पूर्वी सादर करावेत.

त्यानुसार त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !