Ration Card Online Apply Documents | रेशन कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ? | राशन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

Ration Card Online Apply Documents :- नमस्कार सर्वांना, आता नवीन रेशन कार्ड हे ऑनलाइन मोबाईलच्या साह्याने किंवा मोबाईल लॅपटॉप करून तुम्ही ऑनलाईन अर्ज यासाठी करू शकता. परंतु ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी रेशन कार्ड काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात ?

ही संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती असणे गरजेच आहे. त्यासाठी हा आर्टिकल तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे, त्यामुळे Article संपूर्ण वाचा. आतापर्यंत रेशन कार्ड काढण्यासाठी नागरिकांना खूपच हेलपाटे माराव्या लागत होत्या. आता अनेक सुविधा यामध्ये शासनाने दिलेल्या आहेत.

Ration Card Online Apply Documents

अर्थात आता ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड हे काढता येणार आहे. आता रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा लागतो ? हे आपण थोडक्यात पाहूया. नागरि पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील नागरिकांसाठी रेशन कार्ड काढण्यासाठी होणारी फसवणूक पाहता रेशन कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून दिलेले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांना नवीन रेशन कार्ड ऑनलाइन काढता येणार आहे. रेशन कार्ड काढण्यासोबत दुबार आणि किंवा विभक्त रेशन कार्ड त्यातील नावे कमी करणे किंवा नावे वाढवणे यासारख्या रेशन कार्ड संबंधित सुविधा देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

रेशन कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला जवळील ऑनलाइन सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र वर जाऊन या www.rcms.mahafood.gov.in संकेतस्थळावरून अर्ज करावे लागणार आहेत. या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.

रेशन कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?

नवीन राशन कार्ड काढण्यासाठी हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 50 ते 100 रुपये अर्ज भरण्यासाठी खर्च देखील येऊ शकतो किती दिवसात मिळणार तुम्हाला रेशन कार्ड ? ऑनलाइन अर्ज केल्यानंतर नवीन रेशन कार्ड फक्त 30 दिवसात संबंधित अर्जदाराला मिळणार आहे. रेशन कार्ड संबंधीत इतर दुरुस्त्या करण्यासही फक्त 30 दिवसाचा वेळ लागणार आहे. यासंबंधीतील महत्त्वपूर्ण शासनाने निर्णय घेतलेला आहे.

📝 हे पण वाचा :- मोबाइल नंबर की सही लोकेशन App | गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !

राशन कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे कोणती ?

प्राप्त झालेल्या माहितीनुसार नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तसेच विभक्त रेशन कार्ड काढण्यासाठी उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, (सातबारा उतारा, लाईट बिल) आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे) शेजारचे रेशन कार्ड

झेरॉक्स स्वाक्षरी 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन यासारखे काही महत्त्वाचे कागदपत्रे ही द्यावी लागणार आहेत. रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी खालील व्हिडीओ पहा बटन वर क्लीक करून जाणून घ्या सविस्तर माहिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *