Reshim Sheti Yojana Maharashtras | तुती लागवड योजना कागदपत्रे | रेशीम शेती अनुदान योजना आता मिळेल 3.23 लाखांचे अनुदान पहा जीआर !

Reshim Sheti Yojana Maharashtras :- शासनाकडून आता रेशीम शेतीसाठी 3 लाख 23 हजारच अनुदान मिळणार आहे. यासंदर्भात शासनाने आता नवीन बदल केलेले आहेत. आता शेतकऱ्यांना रेशीम शेती

करण्यासाठी अनुदान आणि रेशीम शेतीकडे प्रोत्साहित करण्यासाठी ही अनुदानात मोठी वाढ करण्यात आली आहे. आता नेमकी यासाठी कसे अनुदान मिळणार आहे ? कागदपत्रे, पात्रता,

त्याचबरोबर अर्ज कुठे, कसा ? व अनुदान मिळणार आहे. कोण यासाठी पात्र आहेत कागदपत्रे याचा जीआर, रेशीम शेती अर्ज नमुना pdf इत्यादी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Reshim Sheti Yojana Maharashtras

रेशीम शेती अनुदान 2023 अंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवण्यात येणार आहे.

यासाठी पंचायत समिती तसेच कृषी विभागाच्या वतीने देखील रेशीम शेती अनुदान योजना राबवली जाणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय दि. 6 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर

प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता या योजनेसाठी अर्ज कुठे कसा करावा लागतो ? कसे किती अनुदान मिळणार आहे यासाठी कागदपत्रे अर्ज नमुना यासंबंधीतील सविस्तर माहिती खाली जाणून घेऊया.

रेशीम शेती अनुदान माहिती मराठी

आता रेशीम शेती करण्यासाठी शासनाकडून कसे किती अनुदान दिले जाणार आहे हे आपण पाहूयात. तुती लागवड करू इच्छित शेतकऱ्यांना 50 फूट लांब बावीस फूट रुंदी कीटक संगोपन गृहासाठी अनुदान मिळणार आहे.

रेशीम शेती अनुदान संदर्भात महत्वपूर्ण माहिती मनरेगा अंतर्गत रेशीम उद्योग विकास अंतर्गत एक एकर तुती लागवड करण्यासाठी खालील बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहेत.

 • जमीन नर्सरी तयार करणे
 • नर्सरी रोपे तयार करून तुती लागवड
 • कीटक संगोपन
 • साहित्य कोश
 • उत्पादन
 • कीटक संगोपन गृह

📑 हे पण वाचा :- ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी आली 3 नोव्हेंबरची यादी पहा पात्र असेल तर मिळेल घरकुल

रेशीम शेती अनुदान योजना

इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश आहे, या बाबींना मान्यता देऊन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवडीसाठी 2.5 लाख

एवढा अनुदान 3 वर्षात विभागाकडून दिल जाणार आहे. 1000 चौरस फूट बांधकामासाठी 99 हजार रुपये मिळेल. म्हणजेच एकूण 3.23 लाख एवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

तुती लागवड योजना कागदपत्रे

 • जमिनीचा सातबारा
 • 8 ‘अ’ उतारा
 • आधार कार्ड
 • मनरेगा जॉब कार्ड
 • राष्ट्रीय बँक खाते पासबुक झेरॉक्स
 • पासपोर्ट फोटो
 • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)

रेशीम शेती अनुदान योजना अधिकृत माहिती पाहण्यासाठी खाली देण्यात आलेला शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय व या योजने संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर खाली देण्यात आलेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *