Rose Apple Farming in Marathi :- शेतकरी बांधवांनो शेती करत असताना, आधुनिक पद्धतीने शेती केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा हा मिळत असतो. आज अशाच शेती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्या पिकाची शेती करून तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकतात.
आज आपण गुलाब सफरचंद शेती या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. नेमकी गुलाब सफरचंद शेती काय आहे ? कोणते पीक आहे ? याची लागवड कशी करायची असते ?. उत्पादन कसं मिळतं ? आणि त्याचबरोबर 1 किलो गुलाब सफरचंदाची किंमत 200 रुपये पर्यंत आहे.
Rose Apple Farming in Marathi
आता तुम्हाला या ठिकाणी ही शेती कशी करायची आहे ? किंवा शेती करून किती उत्पादन तुम्हाला मिळवता येऊ शकते ? याची माहिती पाहूया. गुलाब सफरचंद ही जगातील प्रसिद्ध फळांपैकी एक मानला जातो. आता ही झाड 15 मीटर (50 फूट) पर्यंत उंच असतात.
गुलाब सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गुलाब सफरचंद ताजे खाल्ले जाते, जे जाम, जेली, आणि मिस्टन करण्यासाठी देखील वापरले जाते. तर काही प्रदेशांमध्ये रस काढून द्रव्य पदार्थ बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि गुलाब सफरचंदात विटामिन ए आणि सी तसेच फायबर भरपूर प्रमाणात असते.

✅ हेही वाचा :- परिवहन विभागाच्या या नवीन फेसलेस सेवामुळे घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता, कुठेही न जाता, पहा अधिकृत अपडेट !
गुलाब सफरचंद फायदे
त्यामुळे गुलाब सफरचंदामुळे आरोग्याला अनेक फायदे यातून तुम्हाला मिळत असतात. आणि रोगप्रतिकारशक्ती आणि आरोग्य सुधारण्यासाठी या गुलाब सफरचंदाचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. या भागात सफरचंदाचे झाडे दिसतात, भारतात गुलाब सफरचंद प्रामुख्याने देशाच्या दक्षिण आणि ईशान्य भागात आढळतात.
जिथे पिकासासाठी अनुकूल हवामान आहे, झाडे ही कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, केरळ यामध्ये या भागात किंवा या राज्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. गुलाब सफरचंदाची झाडे उष्णकटिबंधीय हवामानात वाढतात तर 15 ते 38 अंश सेल्सियस तापमानाचा सामना करू शकतात.
Rose Apple Farming
ही झाडे उत्तम निसरा होणारी माती पसंत करतात. गुलाब सफरचंदाची झाडे सनी ठिकाणी लावावीत. आणि झाडांमध्ये पुरेसं अंतर देखील असणे गरजेचे आहे. आणि यात लक्ष देण्यासारखे आहे, ते म्हणजे गुलाब सफरचंदाची कापणे साधारणपणे पूर्ण पिकल्यावरच केले जाते, कारण तोडल्यानंतर ते आणखीन पिकत नाहीत.
आता दरवर्षी किती उत्पादन मिळू शकतो. यात माहिती थोडक्यात जाणून घेऊया, गुलाब सफरचंद झाडाची उत्पादन रुपये विविधता आणि व्यवस्थापन यासारखे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तुम्ही त्याची निगा कशी राखतात ? त्याचं पाणी व्यवस्थापन असेल किंवा खत व्यवस्थापन असेल याची संपूर्ण आणि हवामान कसे असेल याच्यावरती अवलंबून असतं.

✅ हेही वाचा :- गावाची मतदान यादी कशी डाऊनलोड करायची, तेही वार्डनुसार pdf मध्ये पहा संपूर्ण माहिती !
Rose Apple Benefits
एक मोठं झाड दरवर्षी सुमारे 150 ते 300 किलो फळे देऊ शकते. आता ही रोपे लावल्यानंतर गुलाब सफरचंदाची झाड सुमारे एका वर्षानंतर फळ देण्यास सुरुवात करते. त्यातील प्रथम फळ म्हणून वापरले जाते, याशिवाय मिठाई असे विविध पदार्थ बनवण्यासाठी याचा वापर केला जातो.
किंवा त्याचा रस वाईन किंवा व्हिनेगर बनवण्यासाठी देखील वापरला जातो. आता यांच्या दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर सफरचंद यातून काढलेल्या रसात खूपच चांगलं सुगंध येतो, तर तो गुलाबाची आठवण करून देते, त्यामुळे हा खाण्यासाठी देखील चांगलाच आहे.
Rose Apple
या अंतर्गत अरोमाथेरपी, परफ्युम आणि सुगंधी उत्पादनामध्ये वापरले जाते. आणि शिवाय औषध बनवण्यासाठी या फळांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. गुलाब सफरचंद वृक्ष लाकूड खूपच मजबूत आहे. म्हणून त्याचे अनेक उपयोग देखील केला जातो.
बाजारात एक किलो गुलाब सफरचंदाची किंमत सुमारे जवळपास दोनशे रुपये आहे यावरून एका झाडापासून वर्षभरात किती उत्पादन होऊ शकते ?, याचा अंदाज तुम्हाला लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही या शेतीची म्हणजेच या पिकाची शेती करून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकतात.

✅ हेही वाचा :- गाडी चालवताना ही 5 कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा, अन्यथा 15,000 रुपयांचा दंड अणि होऊ शकते ही मोठी शिक्षा पहा कागदपत्रे लिस्ट !