आज या लेखाच्या माध्यमातून Sant Tukaram Maharaj Information in Marathi मध्ये जाणून घेऊया. संत तुकारामांचं संपूर्ण जीवन चरित्र, संत तुकारामांचे शिष्य कोण होते ?. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील कथा,
तुकाराम महाराजांचा आयुष्याचा शेवट, आणि संत तुकारामांचे चमत्कारी जीवन, संत तुकाराम यांचे आयुष्याची शेवटची वेळ. संत तुकाराम यांची संपूर्ण माहिती मराठीमध्ये, संत तुकाराम कोणाचे अवतार होते.
संत तुकाराम महाराज माहिती. वंशावळी, तुकाराम महाराजांचा परिवार आणि शिष्यगण माहिती. संत तुकाराम महाराज वैकुंठ गगन. सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? | पहिली पत्नी रखमाई, अवलाई नावाच्या मुलीशी त्यांचा दुसरा विवाह झाला, हीच जिजाई |
संत तुकाराम महाराज यांचा जन्म कधी झाला? संत तुकाराम महाराजांचा जन्म कधी झाला? | संत तुकारामांचा जन्म 1608 या साली देहू या ठिकाणी झाला. |
संत तुकाराम यांनी किती अभंग लिहिले? | संत तुकारामांनी तुकाराम गाथा लिहली, तिच्यामध्ये पाच हजारांवर अभंग आहेत. पंढरपूरचे विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्यांनी विठ्ठलावर तसेच समाजावर अनेक उपदेशपर अभंग, कीर्तने रचली |
संत तुकारामांनी लोकांना काय उपदेश केला? | त्यांनी समता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. संत तुकाराम आणि त्यांचे कार्य महाराष्ट्रभर पसरलेल्या वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. |
तुकाराम गाथा म्हणजे काय? | तुकाराम गाथा हे 1632 ते 1650 च्या दरम्यान रचलेले त्यांच्या कृतींचे मराठी भाषेतील संकलन आहे. [२२] अभंग गाथा देखील म्हटले जाते, भारतीय परंपरा मानते की त्यात सुमारे 4,500 अभंग समाविष्ट आहेत. |
संत तुकाराम महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? | वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला; परंतु त्यांची पहिली पत्नी रखमाई, अवलाई नावाच्या मुलीशी त्यांचा दुसरा विवाह झाला. हीच जिजाई. |
तुकाराम महाराज किती वर्षे जगले? | मराठी विश्वकोशात संत तुकारामांच्या मृत्यूची तारीख 9 मार्च 1650 दिली आहे. आणि जन्म साल 1608 आहे. म्हणजे तुकाराम अवघं 42 वर्षांचं आयुष्य जगले. |
संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव काय? | संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव तुकाराम वोल्होबा आंबिले (मोरे). तुकोबा मूळचे देहू गावचे स्थायिक होते. कुटुंबात आई कणकाई, वडील वोल्होबा मोरे, थोरला भाऊ सावजी आणि धाकला भाऊ कान्होबा असा परिवार होता. |
तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे? | देहू म्हणजे संत तुकारामांची समाधी |
तुकारामाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? | अवलाई नावाच्या मुलीशी त्यांचा दुसरा विवाह झाला. हीच जिजाई |
संत तुकाराम महाराज बीज म्हणजे काय? | तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते |
Sant Tukaram Maharaj Information in Marathi
संत तुकाराम उर्फ तुकोबा इसवी सन 17 व्या शतक्यातील एक वारकरी संत-कवी होते. संत तुकाराम महाराजांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकाराम यांचे आराध्य दैवत होय. तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखत जाते.
वारकरी संप्रदायातला प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय” असा जयघोष हा केला जातो.
जगद्गुरु तुकाराम महाराज लोककवी होते, ‘जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुली तोच साधू ओळखावा !. देव तेथेची जाणवा!’ अशा प्रकारचा अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला आहे.
वारकरी संप्रदायाचा अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. 17 व्या शतकांमध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. अशा अनेक त्यांच्या जीवनातील माहिती आहेत.
संत तुकाराम महाराजांचा जन्म कधी झाला ?
तुकारामांचा जन्म वर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहे. त्यातली चार संभाव्य वर्ष जसे की पुढील प्रमाणे इसवी सन 1568, इसवीसन 1577, इसवी सन 1608, आणि इसवी सन 1598 ही आहेत. इसवीसन 1650 मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव विठ्ठल आणि सदेह
वैकुंठ घेऊन गेले असे मानले जाते. मंबा भटणे यांचा फोन केल्याचा अगदी त्यांच्या देहांता पासून आहे. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव आंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभर बुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठल भक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती.
संत तुकाराम महाराज जीवन चरित्र pdf
तुकारामाचे वडील Boloba व आई कनकाई होती. त्यांना सावजी हा मोठा भाऊ आणि कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबावरच होती. पुण्याची आप्पाची गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) यांच्याशी त्यांचा प्रथम विवाह
झाला. तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागले. सतरा अठरा वर्षाच्या असताना त्यांचे आई-वडील दोघीही मरण पावले. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटणाला निघून गेला.
असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात घडले, आणि संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुसराच गेला, गुरे ढोरेही गेली. महाजनकी बुडाली म्हणून उदास झाले. संसारात विरक्ती आली, आणि या परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठल वरची आपली परमभक्ती कायम ठेवत देऊ गाव जवळील भंडारा डोंगरावर
उपासना चालू केली. चिरंतनाचा शश्वाताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तिथेच परब्रम्हस्वरूप ‘श्री विठ्ठल’ त्यांना भेटले असे मानले जाते. तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता, परंतु दुष्काळ पडला असता,
त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीचा पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवाटीचे कागदपत्रे इंद्रायणी नदी मध्ये टाकून दिले. पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगाची रचना स्फुरू लागली.
📋 हेही वाचा :- श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय ?, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र pdf संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी !
संत तुकाराम महाराजांना किती मुले होती आणि त्यांची माहिती
संत तुकारामांना 4 होती त्यात कन्या भागीरथी व काशी तर मुले नारायण आणि महादेव यापैकी दोन आजाराने मरण पावली. तर पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई व उर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांचे दुसरे विवाह झाला होता.
त्या सती सावित्री सारखी पतीवर्ता होत्या. संत तुकारामांचा संसाराचा नीट सांभाळाला आणि संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली. संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली.
संत तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले
लौकिकार्थाने मायाजाळात गुंतले नाहीत. देऊला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले. त्या स्थानावर नांदूरकीचे एक झाड आहेत. तुकाराम महाराज बिजेला बरोबर दुपारी 12:02 वाजता तुकाराम वैकुंठाला गेले, त्यावेळी हा नांदूरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते. महान संत तुकाराम महाराज हे देऊ गावी जन्मले होते.
संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु अशा संबोधले जाते. जगद्गुरु तुकाराम महाराज हे सर्व हरिनामात गडलेले असायचे. होळी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी ‘तुकाराम बीज दिवस’ येतो.
याच दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज हे नांदूरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानात बसून सदेह वैकुंठा गेले होते. म्हणजे साक्षात श्रीहरी भगवान विष्णू यांचे धाम. छत्रपती शिवाजी महाराज एक युगप्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराज यांच्या आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. त्यामुळे तुकाराम महाराजांना जगद्गुरु असे देखील संबोधले जाते.
📋 हेही वाचा :- हरिपाठ मराठी डाउनलोड, लिहिलेला संपूर्ण हरिपाठ, हरिपाठ pdf डाउनलोड
संत तुकाराम महाराज यांची वंशावळ माहिती मराठी
विश्वंभर आणि अमाई आंबिले यांना दोन मुले होती. तर हरी व मुकुंद यातील एकाचा मुलगा विठ्ठल. दुसऱ्यांची मुले :- पदाजी अंबिले, शंकर अंबिले, कान्हया आंबिले, Boloba आणि कनकाई आंबिले यांना तीन मुले, सावजी (थोरला) तीर्थयाला जाण्यासाठी घर सोडले, मधला तुकाराम व धाकट्या का कानोबा होता.
संत तुकाराम यांनी लिहिलेली पुस्तके कोणती आहेत ?
संत तुकाराम गाथा म्हणजेच हिंदूची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावनभूमीत गेली चारशे वर्ष मुक्तीचे ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहेत. ज्ञानोबा तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे अध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अभंग आणि ओवी तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत.
संत तुकाराम यांच्या जीवनावरील चित्रपट
तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ? :- इसवी सन 1936 मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णुपंत दामले, आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत ‘संत तुकाराम’ या नावाने चित्रपट बनवला. आणि या चित्रपटाला अपूर्व यश प्राप्त झाले, तर 12 डिसेंबर 1936 रोजी मुंबईच्या सेंट्रल मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विष्णुपंत पागनिस यांनी संत तुकाराम यांचे काम केले होते.
1936 चा सालचा जो मराठी चित्रपट आहे हा घेण्याआधी तुकाराम महाराजांवर तीन चित्रपट बनले होते. पहिला मूक पटाच्या जमान्यात कोहिनूर फिल्म कंपनीने निर्माण केलेला संत तुकाराम. त्यानंतर दोन तुकारामालेतील बोलपटच्या जमान्यात 1932 मध्येच यापैकी एक तुकाराम निर्माण केला होता.
शारदा फिल्म कंपनीने आणि दुसरा मास्टर अँड कंपनीने संत तुकाराम अर्थात जय विठ्ठल या नावाने अशा प्रकारचे काही मोठे चित्रपट या महान संत तुकाराम महाराजांवरती झाले. त्यानंतर 1974 मध्ये महाभक्त तुकाराम आला हा मूळ तामिळ चित्रपट होता. आणि मराठीत याला डब करण्यात आला होतं. यानंतर 2002 मध्ये आणखी एक तुकाराम महाराजांवर चित्रपटाला कृष्णकला फिल्मचा श्री जगद्गुरु तुकाराम.
त्यानंतर इसवी सन 2012 सालचा ‘तुकाराम’ चित्रपट सर्व संत पंटापेक्षा वेगळा आहे. आधुनिक विचारसरणी मांडलेला चित्रपट आहे. अशा प्रकारचे अनेक चित्रपट देखील Sant Tukaram Maharaj Information यांच्या वरती केलेले आहेत.
संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात आलेले ठिकाणे कोणती ?
- तुकाराम उद्यान (निगडी-पुणे) तुकाराम नगर (खराडी-पुणे)
- तुकारामनगर (तळेगाव दाभाडे-पुणे)
- तुकारामनगर (पिंपरी पुणे) तुकारामवाडी (जळगाव)
- तुकारामवाडी (डोंबिवली-पूर्व) तुकारामवाडी (पेण कोकण)
- संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल (संत तुकाराम चौक अकोला)