Saur Krushi Pump Price | सोलर पंप योजनाअंतर्गत 3,5,7.5 एचपी पंपाची किंमत किती ?, आणि शेतकऱ्यांना किती भरावा लागतात पहा

Saur Krushi Pump Price :-  सौर कृषी पंप योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या 3hp, 5hp, आणि 7.5hp च्या पंपांची किंमत किती असते. आणि त्यात शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतात, हे आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

सौर कृषी पंप योजना यामध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाते. आणि या अंतर्गत शेतकरी बांधव आहेत, यांना शेतजमिनीच्या नुसार हे पंप दिले जातात. कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते.

Saur Krushi Pump Price

यासाठी अर्ज नेमका कसा करावा लागतो. ही संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. आणि कोणत्या सोलर पंपासाठी म्हणजे तीन एचपी, पाच एचपी, आणि साडेसात एचपी पंपासाठी शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतात.

हे या लेखा मध्ये आपण पाहणार आहोत, शेतकरी बांधवांना या सौर कृषी पंपाचे काय फायदे आहेत. बरेचदा पीक जोमात असते आणि हातात तोंडाशी आलेला घास अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचदा विजेचा लपंडामुळे पिकांना पाणी देता येत नाही.

सोलर कृषी पंप योजना किंमती

अशामुळे या योजनेचा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव लाभ घेत आहे. अशा मध्ये आता शेतकऱ्यांना कोणत्या एचपीसाठी किती भरणा येतो ?, हे आपण या ठिकाणी पाहूया. सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सोलर पंप घेणे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरत चाललेले आहे.

यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के आणि सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% इतका स्वतः पैसे भरणे गरजेचे असते. या योजनेमध्ये सौर कृषी पंप हे एचपी निहाय किंमत काय आहे ?, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

Saur Krushi Pump Price
Saur Krushi Pump Price

सौर कृषी पंप हे एचपी निहाय किंमत काय आहे

तीन एचपी डीसी पंपाची किंमत यामध्ये एक लाख 93 हजार 803 रुपये आहे. 5 एचपी पंपाची किंमत ही दोन लाख 69,746 रुपये आहेत. साडेसात एचपी किंमत 374,402 रुपये आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांना किती लाभार्थी हिस्सा हा भरावा लागतो ?, हे या ठिकाणी पाहूया.

शेतकऱ्यांना तीन एचपी सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्याला १९३८० रु. तर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांना 9690 रुपये इतका भरणा करावा लागतो.

Kusum Solar Pump Scheme

यामध्ये 5 एचपीच्या सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्याला २६९७५ तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्याला 13,488 रुपये इतका भरणा करावा लागतो. 7.5 एचपी च्या सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 37 हजार 440 रुपये.

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 18 हजार 720 रुपये भरणा करावा लागतो. तर अशा प्रकारची ही कुसुम सोलर योजना. या अंतर्गतील सौर कृषी पंपाची किंमत आणि शेतकऱ्यांना किती रक्कम भरावी लागते. ही माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहिलेले आहे.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन कुसुम सोलर पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !