Savings Account Rules in Marathi :- सध्याच्या काळात प्रत्येकाकडे बँक अकाउंट असते. आणि मुख्यतः सेव्हिंग अकाउंट अर्थातच बचत खाते हे प्रत्येकांकडे जवळपास आहेत. यामध्ये शासनाकडून काही नियम हे लावण्यात येत असतात. सेव्हिंग अकाउंट मध्ये किती पैसे तुम्हाला ठेवावेत ?
त्या लिमिट पेक्षा जर तुम्ही पैसे जास्त ठेवले तर काय होते ? याचीच माहिती आज जाणून घेऊया. सेव्हिंग अकाउंट मध्ये ट्रांजेक्शनची कोणतीही लिमिट नसते, पण आर्थिक वर्षात एक निश्चित रक्कमेपेक्षा जास्त जमा असल्यास इन्कम टॅक्स ला याची सूचना मिळते.
Savings Account Rules in Marathi
खातेधारकांना याची माहिती आयटी डिपार्टमेंटला द्यावी लागते. याशिवाय बचत खात्यावरून मिळणारे उत्पन्नही करपात्र असते. अशावेळी या युगात श्रीमंत असो की गरीब प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते हे असतेस. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी खास लक्ष देणे गरजेचे आहे,
तसेच इतर सरकारी योजनेचे पैसे देखील थेट अकाउंट मध्ये जमा होतात. बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी सेव्हिंग, करंट, आणि सॅलरी हे 3 अकाउंट पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र देशात बहुतांश लोकांकडे सेव्हिंग अकाउंटच हे उपलब्ध आहेत. आता देशातील बहुतांश ट्रांजेक्शन हे बजेट खातेतूनच केले जाते.
सेव्हिंग अकाउंट नियम
एका सेव्हिंग अकाउंट मध्ये किती पैसे ठेवायला पाहिजेत ? हे तुम्हाला माहिती आहेत का ?. तसेच सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवलेल्या रकमेची लिमिट नाही, पण सेविंग्स अकाउंट मध्ये जमा केलेली पैसे एका कक्षेत येत असतील तर तुम्हाला त्याची माहिती देणे गरजेचे आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनुसार कोणतेही बँक अकाउंट मध्ये 1 वर्षात 10 लाख रुपये पेक्षा जास्त रकमेची माहिती देणे ही बंधनकारक आहे. ही मर्यादा एफडी, मॅच्युअल फंड, बॉंड, आणि शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना देखील लागू होते. त्यामुळे हे तुमच्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.

✅ हेही वाचा :- आता या सरकारी App च्या माध्यमातून एका क्लीकवर डाउनलोड करा तुमचे PF पासबुक, सरकारने नवीन App केले लॉन्च, पहा संपूर्ण माहिती !
सेविंग अकाउंट व्याज
यासोबतच सेविंग अकाउंट वर मिळणाऱ्या व्याजावरही टॅक्स भरावा लागतो. परंतु त्याच्याशी संबंधित काही नियम आहेत, Income टॅक्स सेक्शन 80TTA अंतर्गत सामान्य लोकांच्या बचत खात्यावर आर्थिक वर्षात मिळणाऱ्या 10 हजार पर्यंतच्या व्याजावर कोणतीही टॅक्स आकारले जात नाही.
व्याजाची रक्कम यापेक्षा जास्त असेल तर टॅक्स तुम्हाला भरावा लागू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादा 50 हजार रुपये पर्यंत इतकी आहे. आणि यासोबत एवढेच नाही तर सेविंग अकाउंट वरून मिळणारे व्याज तुमच्या इतर स्त्रोता मधून मिळणाऱ्या इन्कमशी जोडले जाते.

✅ हेही वाचा :- परिवहन विभागाच्या या नवीन फेसलेस सेवामुळे घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता, कुठेही न जाता, पहा अधिकृत अपडेट !
Savings Account
त्यानंतर तुम्हाला संबंधित टॅक्स ब्रॅकेटनुसार एकूण उत्पन्नावर टॅक्स देखील द्यावा लागतो. आता देशाच्या आघाडी आणि सरकारी खाजगी बँक सेविंग अकाउंट वर 2.50% ते 4 टक्के व्याज देते. 10 कोटी पर्यंत बॅलन्स असलेल्या सेव्हिंग अकाउंट वर व्याजदर म्हणजे जो काही व्याजदर हा 2.70% आहेत.
10 कोटी पेक्षा जास्त रकमेसाठी हा दर 3% टक्के एवढा आहे. आणि अनेक स्मॉल फायनान्स बँक अटीसह सेव्हिंग अकाउंट वर 7% पर्यंत देत असतात. अशा प्रकारचे हे नियम आहे. या सर्व बाबींचे लक्षात घ्यायच आहे,
अशा प्रकारे या ठिकाणी जे आहेत माहिती जाणून घेतली आहे. सेव्हिंग अकाउंट मध्ये किती पैसे ठेवावेत ? आणि लिमिटपेक्षा जास्त असले तर त्यावर ती काय होते ?. यासाठीच जो काही नियम आहे जो काही कायदा आहे हा या ठिकाणी जाणून घेतला आहे.

✅ हेही वाचा :- बाप रे बाप ! आता सिबील स्कोर कमी असल्यास लोन तर दूरच बँकेत नोकरी सुद्धा मिळणार नाही, RBI नवीन नियम लागू, वाचा डिटेल्स !