Savkari Kayda in Marathi :- आज या लेखात महत्त्वाच्या कायदा आणि नियमाविषयी माहिती जाणून घेऊया. तुम्ही देखील व्याजाने पैसे कोणाला दिले असेल किंवा पैसे तुम्ही वाटत असाल तर तुमच्यासाठी सावकार कायद्याचे नियम आणि कायदा माहिती असणं किंवा जाणून घेणे गरजेचे आहे.
तुम्ही कोणत्या सावकाराकडून पैसे घेतले असेल तर त्यासाठी देखील ही माहिती वाचणे गरजेच आहे. देशामध्ये व्याजाने पैसे वाटण्यासाठी लायसन्स असणं गरजेचं असतं हे तुम्हाला माहीतच असेल. एखादा व्यक्ती ठरलेल्या दरापेक्षा जास्त व्याज वसूल करत असेल, तर त्याच्यावर कारवाई देखील करता येते.
Savkari Kayda in Marathi
काय आहे हा सावकारी कायदा आणि या कायद्याची नियम ही संपूर्ण माहिती पाहूया. अनेक वेळा तुमच्या महत्वाच्या कामांसाठी तुम्हाला लोन हवं असतं. अशावेळी बँक ही तुम्हाला लवकर लोन देत नाही, मग तुम्ही सावकार कडून लोन घेतात. व्याजावर पैसे वाटण्याचे काम करतात,
अशा लोकांकडून तुम्ही लोन घेतात, तर आता गरीब आणि गरजू लोक बँकेपर्यंत पोहोचू शकत नाही. किंवा बँकेने ज्या अटी, शर्ती, लावल्या आहेत, त्या तुम्ही पूर्ण शकत नाही, किंवा बँकेची किचकट प्रोसेस असल्यामुळे गावात किंवा शहरात असलेल्या सावकाराकडून व्याजावर पैसे घेतात.

Money Lending Act
व्याजाशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी लायसन्स देखील गरजेचं असतं. तरी ही देशात असे अनेक लोक आहेत जे लायसन नसतानाही काम करतात. तर याचविषयी माहिती पाहूया, सावकार कायद्याचे पालन करणं गरजेचं आहे, लाईव्ह Law रिपोर्टनुसार व्याजाचा व्यवसाय
करण्यासाठी Money Lending अंतर्गत सरकारी संस्थेकडून लायसन्स घ्याव लागतं. आणि त्यामुळे राज्यात सावकारी कायदे ही आहे. अधिकृत संस्था व्याजदराने पैसे देण्याचा काम करणाऱ्या लोकांना लायसन्स देते. पैसे वाटण्याचा काम तुम्ही करत
असाल किंवा याचा विचार करत असेल तर तुमच्यासाठी लायसन्स असणे देखील गरजेचे आहे. त्याशिवाय व्याजावर पैसे वाटण्याचा जो काही व्यवसाय किंवा धंदा आहे हा बेकायदेशीर मानला जात असतो. त्यामुळे तुमच्या तुम्हाला खास करून याचा देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

सावकारी लायसन्स कसं मिळतं
लायसन्स मिळवण्यासाठी व्याजदराने पैसे देण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी तुम्हाला संबंधित संस्थेची संपर्क करावा लागतो. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्यवस्था ही वेगवेगळी आहे, महाराष्ट्र सावकारी नियमन अध्यादेश 2014 नुसार परवानाधारक सावकारांना काही अटी आणि नियम निश्चित केलेले आहेत. त्यासोबत परवाना मिळण्याची पद्धती निश्चित केलेली आहे.
आता सावकारी व्यवसाय करण्यासाठी रीतसर अर्ज साहाय्यक निबंधकांकडे करणे बंधनकारक असतं. आणि सावकारी परावण्याचा कालावधी आता 1 एप्रिल ते 31 मार्च असा राहील. आणि या कायद्यानुसार आता निबंधकांना दिवाणी न्यायालयास असलेले न्यायिक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. (सावकारी लायसन्स)


📋 हेही वाचा :- फक्त रजिस्ट्री केल्याने घर-जमिनीचे मालक होत नाही, ‘हे’ डॉक्यूमेंट देतात मालकी हक्क !, तुम्ही तर ही चूक नाही ना केली ?
सावकारी कर्ज घेण्याचे नियम मराठी
सावकारांच्या जाचापासून बचावासाठी एग्रीमेंट देखील तुम्हाला तयार करावे लागेल. व्याजमाफीया कडून कोणतेही प्रकारची कर्ज घेण्याचे टाळा. पण तुम्ही पैसे घेत असाल तर कोऱ्या स्टॅम्प पेपरवर किंवा कोऱ्या चेकवर सही करून देऊ नका. कर्जदारांनी एक एग्रीमेंट केलं पाहिजे,
ज्यामध्ये रक्कम आणि व्याजदर स्पष्टपणे नमूद करायला हवे. व यामध्ये हे देखील लिहिले पाहिजे की चेक सिक्युरिटी साठी देत आहोत. एग्रीमेंट करून ही एखाद्या व्यक्तीने मनमानी पद्धतीने वसूल केली तर त्याचे विरोधात FIR दाखल केला जाऊ शकतो. अशा प्रकारचे नियम/कायदा आहे.
तुमचे देखील फसवणूक होऊ नये, त्यामुळे तुम्ही ऍग्रीमेंट नक्कीच तयार करा, आणि तरच कर्ज घ्या. जेणेकरून तुमची फसवणूक किंवा नंतर तुम्हाला त्याचा जास्त व्याज द्यावा लागणार नाहीत. अशाप्रकारे हे एक महत्त्वाचा कायदा आहे, तुम्ही या संबंधित माहिती पाहिलेली आहे. (सावकारी कर्ज घेण्याचे नियम मराठी)


📋 हेही वाचा :- महाराष्ट्र सावकारी कायदा pdf डाउनलोड करा :- येथे क्लिक करा
सावकारी कर्ज घेण्याचे नियम ?
सावकारांच्या जाचापासून बचावासाठी एग्रीमेंट देखील तुम्हाला तयार करावे लागेल. व्याजमाफीया कडून कोणतेही प्रकारची कर्ज घेण्याचे टाळा. पण तुम्ही पैसे घेत असाल तर कोऱ्या स्टॅम्प पेपरवर किंवा कोऱ्या चेकवर सही करून देऊ नका.
Money Lending Act Maharashtra ?
द महाराष्ट्र मनी-लेंडिंग (रेग्युलेशन) कायदा, 2014.] (या कायद्याला 2 एप्रिल 2014 रोजी राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाली; 4 एप्रिल 2014 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग 4 मध्ये प्रथम प्रकाशित झालेली संमती.) यासाठी एक कायदा महाराष्ट्र राज्यातील सावकारी व्यवहारांचे नियमन करणे.
महाराष्ट्र सावकारी कायदा pdf ?
येथे तुम्हाला नवीन कायदा, नियम pdf डाउनलोड करा :- येथे क्लिक करा