Shabari Gharkul Yojana Form Pdf आज या लेखामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आज जाणून घेऊया. राज्य शासनाची ही घरकुल योजना ही वेगवेगळ्या प्रवर्गासाठी राज्यभरात राबविण्यात येते.
अशाच योजनेचे आज माहिती आपण पाहणार आहोत, शबरी घरकुल योजनेचा नवीन शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून शबरी घरकुल योजना काय आहे ?
शबरी घरकुल योजनेसाठी पात्रता काय ? याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. शबरी घरकुल योजना जीआर हा निर्गमित झाला असून ही योजना सन 2013 पासून राज्यांमध्ये शबरी घरकुल योजना या नावाने सुरू करण्यात आली आहेत.
Shabari Gharkul Yojana Form Pdf
यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अर्जाचा नमुना उपलब्ध होत नव्हता तसेच अर्जाचा नमुना आणि अनेकदा नाकारला जायचा, आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा अर्ज नमुना दिला जात होता.
त्यामुळे वेगवेगळ्या जिल्हा कार्यालयाचे माध्यमातून वेगवेगळी कागदपत्रे त्यावेळी मागितले जात होती. अशा सगळ्याच गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता या योजनेमध्ये सुसूत्रता येणार आहेत.
शबरी घरकुल योजना शासन निर्णय दिनांक ?
लाभार्थ्यांना विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 8 सप्टेंबर 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय करण्यात आलेला आहे.
या निर्णयानुसार एक अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला आहे. आता शबरी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी निर्णय आहे. शबरी घरकुल योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे ? हे खाली समजून घेऊया.
📝 हे पण वाचा :- तुमच्या गाई, म्हशींना, जनावरांना साप चावला तर कसे ओळखाल ? जाणून घ्या कामाची माहिती तात्काळ !
शबरी घरकुल योजना लाभार्थी पात्रता ?
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आवश्यक
- लाभार्थींचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य 15 वर्षाचे असावं
- स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक असेल
- लाभार्थ्यांकडे स्वतःचे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे
- विधवा परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राथमिकता देण्यात येते.
शबरी घरकुल योजना उत्पन्न मर्यादा ?
- अर्जदारांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा
- ग्रामीण क्षेत्र :- 1 लाख रुपये
- नगरपरिषद क्षेत्र :- दीड लाख रुपये
- महानगरपालिका क्षेत्र :- दोन लाख रुपये
अशी शबरी घरकुल योजनेसाठी उत्पन्न लाभार्थी पात्रता आहेत. शबरी घरकुल योजनेची लाभार्थी पात्रता आपण जाणून घेतली आहे.
📝 हे पण वाचा :- काय सांगता ? फक्त 115 महिन्यांत पोस्टाची ही योजना करते पैसे दुप्पट फक्त असा घ्या लाभ त्वरित !
शबरी घरकुल योजना अर्ज pdf
शबरी घरकुल बांधकामासाठी क्षेत्रनिहाय खर्चाची मर्यादा ही किती असेल म्हणजेच कोणत्या भागात किती रुपये तुम्हाला हे मिळतील किंवा अनुदान मिळते हे खालील प्रमाणे आपण पाहूया.
- ग्रामीण साधरण क्षेत्र :- 1 लाख 32 हजार रुपये
- नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी :- 1 लाख 42 हजार रुपये
- नगर परिषद क्षेत्र :- 1 लाख 50 हजार रुपये
- महानगरपालिका क्षेत्र :- 2 लाख रुपये
शबरी घरकुल योजना आवश्यक कागदपत्रे ? / Shabari Gharkul Yojana Documents List 2023
- शबरी घरकुल आवास योजना कागदपत्रे
- अर्जदाराचे दोन पासपोर्ट फोटो रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- सातबारा उतारा आणि 8 अ उतारा
- उत्पन्न दाखला (तहसीलदार) ग्रामसभेचा ठराव
- शिधापत्रिका
- आधार कार्ड
- एक रद्द केलेला धनादेश (कॅन्सल चेक)
शबरी घरकुल योजना आवश्यक कागदपत्रे ? या ठिकाणी अशा पद्धती महाराष्ट्र शासनाची शबरी घरकुल योजना आहे. या योजनेला राज्यात शबरी घरकुल योजना असं नाव देण्यात आलेला आहे.
ही योजना अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राज्यभरात राबवण्यात येते. आधिक माहितीसाठी खालील येथे क्लीक करून व्हिडीओ पहा त्यावर क्लीक करून योजनेचा व्हिडीओ पहा धन्यवाद…..
✍️ येथे क्लिक करून शासन निर्णय व अर्ज नमुना PDF डाउनलोड करा