Shadi Shagun Yojana 2022 | या मुलींना मिळणार 51 हजार रु. केंद्र सरकारची नवीन योजना सुरु घ्या लाभ

Shadi Shagun Yojana 2022 :- केंद्र सरकार विविध प्रकारच्या योजना राबवित असते. योजनेचा लाभ होताना देखील दिसत आहे. केंद्र सरकार मुलींसाठी एक खास योजना राबवित आहे. या योजनेचे नाव ‘प्रधानमंत्री शादी शगुन योजना (Shadi Shagun Scheme) असं आहे.

विद्यार्थी, वृद्ध, शेतकरी तसेच समाजातील प्रत्येक घटकांसाठी केंद्र सरकार कोणती ना कोणती योजना राबवित आहे. तर आता देशातील मुलींसाठी देखील केंद्र सरकार योजना राबवित आहे. 

Shadi Shagun Yojana 2022

देशातील अल्पसंख्याक मध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त आहे. अल्पसंख्याक मध्ये विशेषतः मुस्लिम समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणा ची सोय नाही. या मुलींची सुरक्षा, पोषण व उच्च शिक्षणासाठी ही योजना मोदी सरकारने सुरू केली. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

शादी शगून योजना 

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन’. ने मुस्लिम समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ‘शादी शगुन योजना’ मांडली होती. अल्पसंख्याक मंत्रालयाकडून ठराव मंजूर झाल्यानंतर 8 ऑगस्ट 2017 रोजी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना सुरू केली. लग्न करण्यापूर्वी उच्च शिक्षण म्हणजेच पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील मुलींना या योजनेतंर्गत केंद्र सरकार 51 हजार रुपये देते. या योजनेमुळे अल्पसंख्याक मुलींची शिक्षणात गैरसोय होणार नाही.

Pradhanmantri Shadi Shagun Yojna

शादी शगून योजने’चा लाभ अल्पसंख्याक समाजातील मुलींना मिळतो. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व पारसी या अल्पसंख्यांक समाजातील मुलींना शालेय स्तरावर ‘बेगम हजरत महल’ ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ ज्या मुलींना त्यांनाच ‘शादी शगून योजनेचा लाभ मिळतो.

हेही वाचा; चंदन कन्या योजना सुरु पहा लाभ,पात्रता,संपूर्ण माहिती

Shadi Shagun Yojana Official Website

या योजनेची माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘शादी शगून’ योजनेची अधिक माहिती दिलेली आहे. त्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.india.gov.in/schemes-maulana-azad-education-foundation

Shadi Shagun Yojana Online Apply

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशनच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in/ वर जावे लागेल.

यानंतर तुम्हाला ‘स्कॉलरशिप’ हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर नवीन पेज ओपन होईल,  जिथे तुम्हाला ‘शगुन योजना फॉर्म’ ऑप्शन्स क्लिक करायचे. सर्व फॉर्म व्यवस्थित भरून, आवश्यक कागदपत्रे करून शेवटी फॉर्म सबमिट करा.

Shadi Shagun Yojana 2022

हेही वाचा; फळबाग लागवड करिता 100% अनुदान करा ऑनलाईन अर्ज पहा येथे 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !