Sharad pawar Gramsamrudhi form pdf | शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज

Sharad pawar Gramsamrudhi form pdf | शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज

Sharad pawar Gramsamrudhi form

Sharad pawar Gramsamrudhi form pdf | शरद पवार ग्राम समृद्धि योजना अर्ज

नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबवण्याबाबत

शासनाची मान्यता मिळाली आहे, 3 फेब्रुवारी 2021 रोजी या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे शरद पवार ग्रामसमृद्धी

योजनेअंतर्गत 4 वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना व शेत मजुरांना देण्यात येणार आहे तर शरद पवार

ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत योजनेसाठी 100% टक्के अनुदान दिले जाणार आहे तसेच आपण या योजनेसाठी अर्ज कसा करू

शकतात अर्ज आपल्याला कुठे उपलब्ध होईल त्याचबरोबर योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे, पात्रता, व अटी,शर्ती सविस्तर

माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहो.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राबवली जात असून यामध्ये गाई

म्हैस पालन साठी पक्का गोठा बांधणे व शेळी पालन शेड, कुकुट पालन शेड, व भू-संजीवनी नाडेप कंपोस्ट या ४ वैयक्तिक

लाभाच्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे 100% टक्के अनुदानावर

गाय म्हैस गोठा अनुदान योजना 2021

(Sharad pawar Gramsamrudhi form ) योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम गाई म्हैस गोठा बांधण्याचे सविस्तर माहिती घेऊया

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

भूमिहीन शेतमजूर, शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड धारक, सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी या योजनेच्या निकषानुसार स्वतःची

जमीन वैयक्तिक, लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेला लाभार्थी योजनेस पात्र राहतील गोठा सोबतच

प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील

योजनेचे अनुदान खालील प्रकारे

6 गुरे करिता 26.95 चौरस मीटर जमीन पुरेशी आहे तसेच त्याची लांबी 7.7 मीटर रुंदी 3.5 मीटर असावी गव्हाण 7.7 मीटर

असावी 0.2 मी ×0.65 मी. आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्रसंचय टाकी बांधण्यात यावी जनावरांना पिण्याचे पाण्याची 200

लिटर क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात यावी (Sharad pawar Gramsamrudhi form )
सदर योजनेअंतर्गत 100% टक्के अनुदान 18 गुरे पर्यंत लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे तर सहा गुरं करिता अनुदान 70 हजार

188 रुपये एवढे अनुदान देय राहील तर अशाच प्रकारे उपरोक्त शासन परिपत्रकात 6 गुरांसाठी ची तरतूद रद्द करण्यात आली

असून 2 ते 6 गुरे करिता 1 गोठा व त्यानंतरचा अधिकच्या गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजेच 12 गुरांसाठी दुप्पट 18 पेक्षा जास्त

गुरांसाठी तीन पट अनुदान देय राहील, मात्र 3 पट्टी पेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.

शेळीपालन शेड अनुदान योजना 2021

10 शेळ्या करिता 7.50 चौरस मीटर निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लांबी 3.75 मीटर आणि रुंदी 2.0 मीटर असावी 4 ही

भिंतीची सरासरी उंची 2.20 मीटर असावी भिंती 1 : 4 प्रमाण असलेल्या सिमेंटच्या व विटांच्या असाव्यात छतास लोखंडी

तूळ्यांचा आधार देण्यात यावा छतासाठी लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे वापरावीत तळासाठी मुरूम घालावा शेळ्यांना  पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावी

लाभ घेण्यास पात्रता

सदर कामाचा मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी पात्र असेल तसेच भूमिहीन (शेती नसलेल्या) कुटुंबांना प्राधान्य देण्यात यावे

योजनेचा लाभ अनुदान

शेळीपालन शेड अनुदान योजना 2021 करिता 100% टक्के अनुदान एकूण अंदाजित रक्कम 49 हजार 284 रुपये एवढे अनुदान देय असेल
लाभार्थ्याने शेळी व्यवस्था स्वतः करणे
शेळी पालनाच्या शेड साठी प्रत्येक 10 जणांचा 1 गट समान येईल व त्याप्रमाणे परिपत्रकानुसार अनुदान अनुज्ञेय करण्यात येईल तसेच ज्या लाभार्थ्यांचे 10 पेक्षा अधिक शेळ्या असतील त्यांना शेळ्यांसाठी चे 2 गट लक्षात घेऊन 2 पट अनुदान राहील मात्र 1 कुटुंबात जास्तीत जास्त 30 शेळ्या करिता 3 पट अनुदान मंजूर करण्यात येईल

कुकुट पालन शेड अनुदान योजना 2021

लाभार्थ्यांना कुकूटपालन शेड अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक

लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेला भारतीय योजनेस पात्र राहतील तसेच भूमिहीन शेती नसलेले कुटुंबांना प्राधान्य देण्यात येईल
100 पक्षां करिता 7.50 चौरस मीटर निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लांबी 3.75 मीटर आणि रुंदी 2.0 मीटर असावी लांबी कडील बाजूस 30 सेंटिमीटर उंच व 20 सेंटिमीटर जाडीची विटांची भिंत असावी तसेच कुकुट जाळी 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटिमीटर चे खांब आणि आधार दिलेली असावी बाजूस 20 सेंटिमीटर जाडीचे सरासरी 2.20 मीटर उंचीची भिंत असावी बाजूस 20 सेंटिमीटर जाडीचे सरासरी 2.20 मीटर उंचीची असावी लोखंडी टूळ्यांच्या आधार द्यावा छतासाठी लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे वापरावीत तळ साठी  मुरमाची भर घालावी त्यावर दुय्यम दर्जाच्या बेटावर सिमेंटचा 1 : 6 प्रमाण असलेला मजबूत थर असावा पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी
सदर योजनेअंतर्गत अनुदान:- रुपये एकूण पन्नास हजार 760 रुपये 100 टक्के अनुदान अंतर्गत

पक्षांची व्यवस्था स्वतः करणे आवश्यक:-

सध्या शासन परिपत्रकानुसार 100% करिता अनुदान अनुज्ञेय आहे मात्र यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुक्कुटपालन करायचे आहे परंतु 100 पेक्षा अधिक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदार सह कुकूटपालन शेड मागणी करावी व त्यानुसार संबंधित यंत्रणेशी संबंधित शेड मंजूर करा व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर चा एक महिन्याचा कालावधी कुकुट पालन शेड मध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील जरी शेड 100 पक्षांकडे अनुज्ञेय करण्यात आले असले तरी सदर शेडमध्ये 150 पक्षी सामावू शकतात त्यामुळे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या 150 च्यावर नेल्यास सदरील लाभार्थ्यास मोठे शेड साठी २ पट्टी निधी उपलब्ध करून देण्यात येईल तरी कोणत्याही कुटुंबात 2 पेक्षा अधिक निधी अनुज्ञेय राहणार नाही.

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा पहिला GR:- येथे पहा 

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा दुसरा GR;- येथे पहा 

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज (अंदाजपत्रक) फॉर्म:- येथे पहा 

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज व सविस्तर माहिती साठी हा:- video येथे पहा 

कुसुम सोलर पंप ९५% टक्के अनुदानावर online अर्ज सुरु सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 

10 thoughts on “Sharad pawar Gramsamrudhi form pdf | शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज”

  1. Pingback: Steel Rate Today Live | घर बांधनाऱ्यासाठी आनंदाची बातमी! सिमेंट व स्टील बार दर मध्ये आज एवढी घसरण पहा आजचे दर

  2. Pingback: Pm Kisan 12th Hafta | 12 वा हफ्ता या दिवशी येणार परंतु येथे Success असेल तरच पहा कोणाला व तपासा स्टेटस ऑनलाईन

  3. Pingback: Compensation to Farmers | Nuksan Bharpai | तीन कोटी अठरा लाख रु. नुकसान भरपाई निधी मंजूर तर आजपासून जमा होणार खात्यात पण फक्

  4. Pingback: Gai Gotha Yojana Marathi | गाय/म्हैस गोठा करिता दोन लाख एकतीस हजार रु. अनुदान असा करा अर्ज संपूर्ण माहिती पहा

  5. Pingback: Agriculture Crop Insurance | या जिल्ह्यातील सत्तावन कोटी रु. पिक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात तुम्हाला का

  6. Pingback: Farmer Incentive Subsidy | loan waiver portal | पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान करिताची ही अट रद्द, हे शेतकरी पात्र तुम्हाला मि

  7. Pingback: Nuksan Bharpai List | नुकसान भरपाई वाढीव दराने पुन्हा जाहीर आता हे जिल्हे पात्र तुम्हाला मिळेल का ? मिळेल तर कि

  8. Pingback: Mahamesh Scheme Maharashtra | महामेषच्या या 6 योजना पुन्हा सुरु, 75% अनुदान, असा, भरा योजनेचा ऑनलाईन फॉर्म

  9. Pingback: Pm Kisan Samman Yojna | Pm Kisan Update | Pm किसान योजनेच्या 21 लाख शेतकऱ्यांना 13 वा हफ्ता मिळणार नाही, जिल्हानिहाय यादी आली प

  10. Pingback: Stree Shakti Yojana | महिलांसाठी मोदी सरकारची खास योजना, कमी व्याजदरात विनातारण 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !