Sharad Pawar Gramsamrudhi Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी तसेच पशु पालकांसाठी राज्य सरकारने मोठी योजना सुरु केले आहे. या लेखामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत ची संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत लाभ कसा घ्यायचा आहे. त्यासाठी अर्ज नेमकं कुठे करायचा आहे, या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आणि गाय म्हैस गोठा योजना तसेच शेळी पालन शेड योजना व कुकुट पालन शेड योजना या विषयीची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. यासाठी अनुदान कसे दिले जाणार आहे, व या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घ्या हा लेख संपूर्ण वाचा.
शेळी पालन शेड अनुदान योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार या योजनांतर्गत शेळी पालन साठी शंभर टक्के अनुदान दिलं जातं. आणि यासाठी जास्तीत जास्त अनुदान आपण 30 शेळ्या करिताच्या गोठ्यासाठी अनुदान घेऊ शकता. किती अनुदान कोणत्या मर्यादेमध्ये राहणार आहे आणि याची सविस्तर माहिती आपण खाली दिली आहे ते आपण नक्की पहा.
गाय म्हैस गोठा अनुदान योजना 2022
शेतकरी योजना सदर योजनेअंतर्गत गोठे चा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे जनावरे असणे आवश्यक आहे. यामध्ये दोन ते सहा गुरांसाठी गोठ्यासाठी मान्यता देण्यात येणार आहे.
आणि जास्तीत जास्त 18 गुरापर्यंत आपण अनुदान करिता देऊ शकता. किती अनुदान दिले जात गोट्याची जमीन किती असावी याविषयीची सविस्तर संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे नक्की पहा.
कुकुट पालन शेड अनुदान योजना
100 पक्षी करिता शेड बांधायचे असेल तर एकूण 49 हजार 760 रुपये अनुदान लाभार्थ्याना दिले जाते. आणि 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुप्पट निधी हा दिला जाणार आहे. जर आपल्याकडे पक्षी नसतील
आपल्याला शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जमीनदारांचासह शेडची मागणी करता येणार आहे. आणि त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावी. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये शंभर पक्षी आणणे बंधनकारक राहील.

500 शेळ्या 25 बोकड प्रकल्प करिता 50 लाख रु. अनुदान योजना 2022 करिता सुरु
शरद पवार ग्राम समृद्धी योजना कागदपत्रे
- प्रत्येक योजना स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.
- तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडा.
- लाभार्थींच्या नावे जमीन आहे का, असल्यास “हो’ म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.
- रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, तेही भरा.
- अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा.
- शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करा.
- यासोबत मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडा.
- यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगितले जाईल.
- त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केले जाईल.
- तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल
- तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

फक्त या प्रवर्गातील लाभर्थ्याना 100% अनुदानावर सोलर पंप अनुदान योजना सुरु
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना GR
राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी या योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेचे नाव शरद पवार ग्रामसमृद्धी योजना हे ठेवण्यात आलेला आहे. सदर योजनेअंतर्गत शेळी, कुकुट पालन, गाय, म्हैस पालन,
याकरिता गोठा आणि शेड यासाठी 100 टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिलं जातं. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत या योजनेच्या नाव शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही योजना राज्य योजना म्हणून राबविण्यात येणार आहे.

📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ योजना 2022 सुरु :- येथे पहा
2 thoughts on “Sharad Pawar Gramsamrudhi Yojana | शेळी पालन, कुकुटपालन शेड, गाय म्हैस गोठा 100% अनुदानावर अर्ज सुरु, त्वरित लाभ घेण्यासाठी”