शेतकरी बांधवांनो तुम्हाला देखील Sheli Mendhi Palan Yojana करायचे आहे का ? परंतु तुमच्याकडे पैसा कमी पडत आहे ?. किंवा पैशाची अडचण असेल तुम्हाला शासनाकडून अशावेळी योजना
राबवून अनुदान देण्यात येते. अशा प्रकारे एका योजनेची माहिती आज जाणून घेणार आहोत. शेळी मेंढी पालन योजना महाराष्ट्र करण्यासाठी 75% सबसिडी या अर्थातच 75 टक्के अनुदान हे मिळणार आहे. आता या योजनेचा लाभ कोणत्या
प्रवर्गातील कोणत्या लाभार्थ्यांनाही मिळणार आहे ?. ही योजना नेमकी कोणती आहे या योजनेचा लाभ कसा घेता येणार आहे ?. कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ? याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती आपण पाहणार आहोत.
Sheli Mendhi Palan Yojana
शेळी मेंढी पालन करा आणि 75% सबसिडी मिळवा. शेती सोबत जोडधंदा म्हणून तुम्ही दुग्ध व्यवसाय किंवा शेळी/मेंढी पालन योजना ही करू शकता. परंतु या अंतर्गत पशुसंवर्धन विभागा अंतर्गत ठाणबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी
लाभार्थ्यांना खालील प्रकारे शेळी मेंढी मिळणार आहेत.10 शेळ्या किंवा 10 मेंढ्या व 1 बोकड किंवा 1 नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
शेळी पालन योजना ➡️ | राज्य स्तरीय शेळी पालन योजना, जिल्हास्तरीय शेळी पालन योजणा |
शेळी मेंढी पालन अनुदान किती मिळते ? ➡️ | राज्य सरकार कडून open 50% व इतर लाभार्थ्यांना 75% अनुदान देते |
पशुसंवर्धन विभाग योजना ➡️ | गाय/म्हैस, शेळी मेंढी व कुकुट पालन योजना व पशुखाद्य वैरण योजना राबवते |
AH-Mahabms ➡️ | राज्य सरकार योजना |
10 शेळ्या 1 बोकड योजना ➡️ | 50% ते 75% अनुदान मिळते (राज्य सरकार) |
शेळी मेंढी पालन योजना ➡️ | राज्य सरकार |

शेळी मेंढी पालन योजना
या योजनेत जवळपास 75% सबसिडी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करून व्यवसाय वाढ या योजनेअंतर्गत करता येणार आहे. काय आहे शेळी मेंढी पालन योजना याची माहिती पाहूया.
शेती सोबत इतर जोड धंदा म्हणून तुम्ही Sheli Mendhi Palan योजनेतून आर्थिक प्राप्त करू शकतात. या उद्देशाने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योजना राबवण्यात येत आहेत. आणि सोबतच शासनाकडून आता 75% अनुदान हे देण्यात येणार आहे.
या योजनेत निवड झाल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना जवळपास 50% टक्के तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदानाचा लाभ या योजनेतून दिले जाणार आहे. म्हणजे 10 शेळ्या 1 बोकड किंवा 10 मेंढ्या 1 नर मेंढा या पद्धतीने ही योजना ठेवली जाणार आहे.


📋 हेही वाचा :- मोदी सरकारची नवीन योजना; आता 100 शेळ्यांसाठी 10 लाखापर्यंत अनुदान पहा हा जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म
शेळी मेंढी पालन योजना लाभार्थी पात्रता ?
- शेळी मेंढी पालनासाठी योजनाचा लाभ कोणाला घेता येणार कोण यासाठी पात्र
- दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी
- अत्यल्प भूधारक शेतकरी
- अल्पभूधारक शेतकरी
- सुशिक्षित बेरोजगार
- महिला बचत गटातील लाभार्थी
या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी ऑनलाईन अर्ज देखील करता येतो.


📋 हेही वाचा :- 100% अनुदान योजना शेळी पालन,कुकुटपालन,गाय/म्हैस गोठा योजना सुरु करा असा अर्ज
शेळी मेंढी पालन योजना कागदपत्रे यादी

- कोण कोणती कागदपत्रे लागणार
- अर्जासोबत फोटो ओळखपत्राची
- सत्यप्रत सातबारा
- 8 अ उतारा
- अपत्य दाखला
- स्वयंघोषणा पत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँकेचे पासबुक झेरॉक्स
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- कुटुंब प्रमाणपत्र
- अनुसूचित जाती जमाती असल्याचा जातीचा प्रमाणपत्र झेरॉक्स
इत्यादी कागदपत्रे शेळी मेंढी पालन योजना साठी आवश्यक आहेत. सदर माहिती धुळे जिल्ह्यातील लोकमत ई-पेपर मध्ये आलेली बातमी आहे. याची माहिती ही लेखात तुम्हाला देण्यात आलेली आहे. 14 जुलै 2023 रोजी ही बातमी लोकमत ई वृत्तपत्रात देण्यात आले आहे.
Frequently Asked Questions (FAQ)
शेळी पालन योजना ?
राज्य सरकारच्या योजनेतून 10 शेळ्या व 1 बोकड हे 50 आणि 75% अनुदान लाभार्थ्यांना मिळते.
शेळी मेंढी पालन योजना कागदपत्रे ?
अर्जासोबत फोटो ओळखपत्राची, सत्यप्रत सातबारा, 8 अ उतारा, अपत्य दाखला, स्वयंघोषणा पत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड, रेशन कार्ड, कुटुंब प्रमाणपत्र, अनुसूचित जात-जमाती असल्याचा जातीचा प्रमाणपत्र
शेळी मेंढी पालन योजना लाभार्थी पात्रता काय ?
दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थी
Comments are closed.