Sheli Palan Anudan Yojana | शेळी पालन अनुदान योजना | 20 शेळ्या 2 बोकड अनुदान योजना

Sheli Palan Anudan Yojana
Rate this post

Sheli Palan Anudan Yojana :- महाराष्ट्र शासनाने नुकताचे नवीन अपडेट जाहीर केले आहे त्या नुसार शेतकर्‍यांना 20 शेळ्या आणि 2 बोकड यांच्यासाठी सरकार

कडून अनुदान मिळणार आहे. हे अनुदान कसे मिळवायचे त्यासाठी कोण-कोणती कागदपत्र लागतात आणि Sheli Palan साठी नोंदणी कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती पोस्ट मध्ये सांगणार आहोत.

Sheli Palan Anudan Yojana

शेळी पालन अनुदान योजना 2021 अंतर्गत 20 शेळ्या आणि 2 बोकड साठी राज्य सरकार कडून अनुदान मिळवायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचावा. 9 जुलै 2021 रोजी 2 नवीन शासन निर्णय घेऊन

या योजनेला पुन्हा मंजुरी देण्यात आली आहे.आपण या योजने विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया कि योजनेचे स्वरूप अनुदान कागदपत्रे,अर्ज कसा करायचा लाभ कसा मिळेल तर सुरु करू या.

सदर योजना या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार कोणते जिल्ह्रे पहा:- १)  जालना  2) उस्मानाबाद  3) यवतमाळ 4)  गोंदिया ५) सातारा ६) बीड  7) भंडारा           

शेळी पालन अनुदान योजना 

योजनेचा अनुदान :- या  7  जिल्यातील सर्व प्रवर्गातील लाभार्थींना  ५०% टक्के अनुदानावर योजना राबवण्यात येणार आहे.  20 शेळ्या 2 बोकड  एकूण किंमत १ लाख ३६ हजार रु. व शेळ्यांचा वाडा (४५०.चौ.फुट ) प्रती शेळी २१२ रु.

प्रती फुट एकूण ९५,४००/- असे दोन्ही मिळून एकूण किंमत २,३१,४००/-  ५०% टक्के अनुदान प्रमाणे = एकूण अनुदान १ लाख १५ हजार ७०० रु. पशुसवर्धन विभागामार्फत शेळी गट वाटपाच्या

राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण तसेच, जिल्हा वार्षिक योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची / गेल्या आणि नग आधारभूत किंमत वाढविण्यास दि.१२.०५.२०२१ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.

शेळी पालन योजना महाराष्ट्र

योजनेंतर्गत देय अनुदाननिवड झालेल्या प्रत्येक लाभार्थीला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च (शेळी गट व शेळ्यांसाठीचा वाडा) रू. २,३१,४००/- इतका आहे. गटाची स्थापना करताना

सुरुवातीला लाभार्थ्यास 100% निधी स्वहिस्सा / वित्तीय संस्थांचे कर्ज याद्वारे उभा करावयाचा आहे. सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के तथापि, प्रति गट कमाल मर्यादा रू. १,१५,७००/- या प्रमाणे अनुदान देय राहील.

२० शेळ्या २ बोकड योजना 

या योजनचे अर्ज अद्याप सुरु नाही सुरु झाले कि कळवण्यात येईल.

अर्ज लिंक:- अर्ज सध्या उपलब्ध नाही लवकरच उपलब्ध होईल.

शासन निर्णय लिंक:- 1 👉 येथे पहा 

शासन निर्णय लिंक:- 2 👉 येथे पहा  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top