Sheli Palan Prashikshan Kendra | शेळी पालन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र | शेळी पालन प्रशिक्षण कसे घ्यावे | शेळी पालन प्रशिक्षण सरकारी केंद्र ठिकाणीची संपूर्ण माहिती !

Sheli Palan Prashikshan Kendra :- नमस्कार सर्वांना राज्यातील शेळी पालन करत असलेली बेरोजगार. व व्यवसाय करत असलेले शेतकरी यांच्या साठी मोठी आनंदाची बातमी आहे.

शेळी पालन विषयी प्रशिक्षण असणं गरजेच आहे. शेळीपालन प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण आपला व्यवसाय हा दीर्घ काळापर्यंत चालू शकता आणि त्यामध्ये मोठा नफा कमवू शकता.

शेळीपालन कसे करायचे आहे यासाठी आपल्याला प्रशिक्षण कुठे घ्यायचे आहेत. संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी प्रशिक्षण केंद्र यादी 2023

अ.क्र.स्थळ (पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र)दूरध्वनी क्रमांकवेळापत्रकशुल्क  कालावधी
1प्रक्षेत्र, बिलाखेड, जिल्हा: जळगांव02589/222457 मो. : 9527589928प्रत्येक महिन्याच्या २३, २४, २५ तारखेसरु. ५००/-३ दिवस
2प्रक्षेत्र, पडेगांव, जिल्हा:.औरंगाबाद0240/2370449 मो. :८८३०३२०३९९प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातरु. ५००/-३ दिवस
3प्रक्षेत्र, अंबेजोबाई, जिल्हा:.बीड02446/247239 मो. :9763749783प्रत्येक महिन्याच्या २५, २६, २७ तारखेसरु. ५००/-३ दिवस
4प्रक्षेत्र, मुखेड, जिल्हा:.नांदेड02461/202022 मो. : 945494770प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातरु. ५००/-३ दिवस
5प्रक्षेत्र, महुद, जिल्हा:.सोलापूर02187/202300 मो. 9545467589प्रत्येक महिन्याच्या दूसरा व चौथा सोमवार ते बुधवाररु. ५००/-३ दिवस
6प्रक्षेत्र, तुळजापूर, जिल्हा: .उस्मानाबाद02471/259066 मो. :945494770प्रत्येक महिन्याच्या २५, २६, २७ तारखेसरु. ५००/-३ दिवस
7प्रक्षेत्र, दहिवडी, जिल्हा: .सातारा02165/204480 मो. :9404296508प्रत्येक महिन्यात दूसरा सोमवार ते बुधवाररु. ५००/-३ दिवस
8प्रक्षेत्र, रांजणी, जिल्हा: .सांगली02341/244222 मो. : 9764634319प्रत्येक महिन्यात दूसरा सोमवार ते बुधवाररु. ५००/-३ दिवस
9प्रक्षेत्र, पोहरा, जिल्हा: .अमरावती0721/2020523 मो. : 9890031756प्रत्येक महिन्यात २५, २६, २७ तारखेसरु. ५००/-३ दिवस
10प्रक्षेत्र, बोंद्री, जिल्हा: नागपूर9890031756प्रत्येक महिन्यात दूसरा शनिवार रविवार व सोमवाररु. ५००/-३ दिवस
11मेंढी फार्म, गोखले नगर, पुणे020/25657112 8888890270दर महिन्यालारु. २०००/-३ दिवस

Sheli Palan Prashikshan Kendra

शेळी पालन प्रशिक्षण महाराष्ट्र 

महाराष्ट्रातील शेळी व मेंढी पालन व्यवसायमहाराष्ट्रातील शेळया व मेंढयांची संख्या, मांसाचे उत्पादन, महाराष्ट्र राज्यातील वधगृहे, मांसाची निर्यात, लोकर उत्पादन, दुध उत्पादन, मेंढपाळांच्या समस्या.
शेळया व मेंढयांच्या जातीशेळया मेंढयांच्या विभागनिहाय जाती, गुणवैशिष्टये, महाराष्ट्रातील उस्मानाबादी व संगमने री शेळया तसेच दख्खनी व माडग्याळ मेंढयांची गुणवैशिष्टये.
शेळीपालनाच्या पध्दतीमुक्त व्यवस्थापन, मिश्र व्यवस्थापन, ठाणबंद पध्दतीने शेळी पालन या विषयी विस्तृत माहिती
शेळयांसाठी निवाराशेळयांच्या वाडे बांधकामासाठी जागेची निवड करणे, गोठयांचे प्रकार, वाडेबांधकामासाठी दिशा व वायु विजन
शेळयांचा आहारशेळयांच्या आहारात अन्न द्रव्याची गरज (प्रथिने , कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, पाणी, क्षार व जीवनसत्वे) शेळयांच्या आहारातील चारा व पशुखाद्य, करडांचा आहार, प्रजननासाठी वापरण्यात येणा-या बोकडांचा आहार, गाभण शेळीचा आहार, मुरघास तयार करण्यांच्या पध्दती व फायदे
प्रजननशेळया मेंढयामधील प्रजनन पध्दती (बाह्य प्रजनन, अंर्तगत प्रजनन, उत्तरोत्तर प्रगती पध्दती, संकरीत प्रजनन), प्रजननाची मुक्त पध्दत, मर्यादित मुक्त पध्दत, नियंत्रित प्रजनन पध्दत, प्रजनन हंगामातील पुर्व तयारी, पैदासीसाठी शेळयांची व बोकडाची निवड, ऋतुकालावधी, कृत्रीम रेतनाद्वारे शेळी सुधारणा, एकाच वेळी शेळया माजावर आणावयाच्या पध्दती, प्रजनन हंगाम
करडे व कोकरांचे संगोपननवजात करडांचे संगोपन, चिकाचे महत्व, अनाथ करडांचे संगोपन, करडांचे दुध तोडणे, करडांमधील मरतुक, वाढत्या करडांचा आहार.
शेळया मेंढयांचे आजारअजारी शेळयांची लक्षणे, विषाणुमुळे होणारे रोग, जिवांणुमुळे होणारे रोग, बाह्य किटक तसेच परजिवी पासून होणारे आजार.
प्रतिबंधक उपायजंतनाशके, किटकनाशके यांचा वापर, लसीकरण, प्रथमोपचार.
शेळया-मेंढयाचा विमाविम्याची वयोमर्यादा, विमा हमी रक्कम, विमा दर नुकसान भरपाई, विमादावा पध्दती
शेळया-मेंढयांची वाहतुक व विक्रीशेळयां- मेंढयांची विक्री किंमत ठरविणे, वाहतुकीमध्ये घ्यावयाची काळजी.
शेळी पालन प्रकल्प अहवालप्रकल्प अहवालासोबत करावयाच्या कागद प्रत्राची पुर्तता, करडांचे उत्पादन, मृत्युचे प्रमाण, लेंडी खताचे उत्पादन, दुध उत्पादन, विमा, शेळयांचे औषधउपचार, अनावर्ती खर्च, आवर्ती खर्च, वार्षिक नफा.
प्रक्षेत्रांवर ठेवावयाच्या नोंदीवंशावळ नोंदी, वजन वाढी संबंधी नोंदी, प्रजनन व जनन नोंदी ई.
शेळ्या मेंढया करिता उपयुक्त चारा पिकेया व्यवसायामध्ये अधिक उत्पादन मिळणेसाठी शेळ्या मेंढ्यांना हिरव्या चार्यांसचा सतत पुरवठा होणे आवश्यक आहे. बहुवार्षिक चारा पिकांची माहिती. त्याकरिता मशागत, लागवडीची पद्धत, खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, आंतरमशागत, चारा उत्पादन ई.

शेळी पालन प्रशिक्षण कसे घ्यावे 

राज्यामध्ये शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा प्रामुख्याने ग्रामिणh भागामध्ये केला जातो. शेळयामेंढयांच्या मांसाचे वाढते भाव, त्यामुळे खात्रीची बाजारपेठ, एकापेक्षां अधिक करडे देण्याची क्षमता, इतर रवंथ करण्या-या जनावरांपेक्षा

तुलनात्मक दृष्टया वयांत आणि वजनांस येण्याची क्षमता इ. बाबींमुळे, सुशिक्षीत बेरोजगार शेतकरी ह्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.

📑 हे पण वाचा :- मुख्यमंत्री सौर कृषी योजनाअंतर्गत या शेतकऱ्यांना वर्षाला 75 हजार रु. पहा हा जीआर व करा ऑनलाईन अर्ज

शेळी-मेंढीपालन प्रशिक्षण

शासन, बँका, विविध समाज विकास महामंडळ व शासकीय विभाग यांच्या विविध योजनाअंतर्गत कर्ज आणि अर्थ सहाय्य देत असतात. ह्या सर्व बाबींचा विचार करुन तसेच कौशल्य विकासाच्या दृष्टीने शेळी मेंढी

पालनाचे नवीन तंत्रज्ञान शेतकर्यावपर्यंत पोहचून या व्यवसायाकरिता उद्युक्त करणेकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवर व मुख्य

कार्यालय, गोखलेनगर येथे शेळी- मेंढीपालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात येते तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यांत येते.

  • प्रवेश प्रक्रिया : सर्वांकरिता प्रशिक्षण उपलब्ध आहे.
  • निवास व भोजन : प्रशिक्षणार्थीने स्वत: सोय करवायची आहे.

वरील प्रक्षेत्रावर प्रशिक्षण घेणे साठी प्रवेशाकरिता प्रथम संपर्क करून वेळ व तारीख निश्चित करावी.

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !