Sheli Palan Shed Form | शरद पवार ग्रामसमृद्धी योजना | शेळी पालन शेड योजना | 18 शेळ्यांचा शेड करिता 100% अनुदान, येथे असा भरा त्वरित फॉर्म ही असेल अर्ज पद्धत

Sharad Pawar Gai Gotha Yojana
Rate this post

Sheli Palan Shed Form :– नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. शेळीपालन करत असलेल्या पालकांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे.

राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची योजनाही सुरू केलेली आहे. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या योजनेअंतर्गत आपल्याला वैयक्तिक चार बाबींकरिता अनुदान दिले जाते.

यातील महत्त्वाच्या तीन बाबी म्हणजेच शेळी पालन शेड, कुकुटपालन शेड आणि गाय म्हैस गोठा यासाठी शंभर टक्के अनुदान दिलं जातं. तर याच बाबतीत संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा या लेखामध्ये आपण शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत अर्ज त्याचबरोबर जीआर ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

  शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Sheli Palan Shed Form 

याकामाला नियोजन (रोहयो) विभागाच्या दिनांक ०२ सप्टेंबर, २०२० रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट-९ मधील अनुक्रमांक ७६ नुसार नरेगा अंतर्गत रु.४९,२८४/- इतका अंदाजित खर्च येईल. 

 • अकुशल खर्च :- रु.४,२८४/- (प्रमाण ८ टक्के)
 • कुशल खर्च :- रु.४५,०००/- (प्रमाण ९२ टक्के)
 • एकूण :- रु.४९,२८४/- (प्रमाण १०० टक्के)

हे मापदंड सध्या प्रचलित मजूरी दर व DSR प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोनपैकी कोणत्याही एक किंवा दोन्हींच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल होईल. त्या प्रकारच्या बदलास मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक / जिल्हा कार्यक्रम सह समन्वयक/आयुक्त, मग्रारोहयो यांना प्रदान करण्यात येत आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी अर्ज कुठे करयाचा

ग्रामसमृद्धी योजनेचा अर्ज खाली मिळेल त्या अर्ज बरोबर माहिती भरून खालील सर्व कागदपत्रे जोडून प्रस्ताव ग्रामपंचायत मध्ये जमा करावे लागतील. शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज नमुना

व त्याकरिता कागदपत्रे चा नमुना हा आपल्याला खाली दिलेल्या माहितीवर उपलब्ध होईल. त्या ठिकाणी वरून आपण कागदपत्रे तसेच आजचा नमुना हा पाहू शकता.

आपला अर्ज हा आपण जवळील आपल्या ग्रामपंचायत मध्ये सादर करावयाचा आहे. आणि सदर योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी आपल्याकडे आपल्या ग्रामपंचायत

मध्ये ग्रामसभा भरल्यानंतर त्या ठिकाणी नाव नोंदणी आवश्यक आहे. तरच आपल्याला या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना कागदपत्रे 

 • जनावरांचा गोठा योजना कागदपत्रे
 • ग्राम सभा ठराव 
 • प्रवर्ग 
 • नमुना न. ८ किंवा  ७/१२ उतरा
 • अंदाजपत्रक
 • अ.ज./अ.जा./BPL/भूमिहीन/ अल्पभूधारक शेतकरी/अपंग 
 • जनावरांचा गोठा/शेळ्यांचा तपशील (संख्या)
 • यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 
 • प्रस्तावित जागेचा GPS PHOTO(NOTE CAM)
 • उपलब्ध पशुधन यांचे GPS मध्ये TAGGING फोटो 
 • जॉब कार्ड
 • बँक पासबुक 
 • आधार कार्ड 
 • ग्रामपंचायत चे मागणी पत्र 

शेळी पालन शेड कसे मिळेल 

2) मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या विवीध वैयक्तिक ( उदा . कामाचा प्रकार फळबाग , वृक्षलागवड , शेततळे ) व सार्वजनिक ( उदा.कामाचा प्रकार – रस्ता, ओढा/नाला /पाझर

तलाव गाळ काढणे/ग्रा.प क्षेत्रावर वृक्ष लागवड संगोपन इ .) कामाच्या संयोजनातून अकुशल कुशल प्रमाण ६०:४० लाभार्थी पातळीवर राखण्यासाठी योजने अंतर्गत काम केलेले असावे .

हेही वाचा:- शरद पवार ग्राम समृद्धी योजना GR येथे पहा माहिती 

शेळी पालन शेड योजना पात्रता 

३ ) सदर लाभार्थी कुटुंब यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावर किमान २० ते ५० फळझाडे / वृक्षलागवड करण्यात येऊन त्याचे तीन वर्ष संगोपन करून झाडे १०० % जिवंत ठेऊन योजनेचा लाभ पुर्ण घेणारे लाभार्थी किंवा चालू वर्ष मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान १०० दिवस काम पुर्ण करणे आवश्यक आहे .

२ ) वैयक्तिक क्षेत्रावर ५० पेक्षा जास्त फळझाडे / वृक्षलागवड केल्यास :- गाय गोठा ( छतासह ) / शेळी पालन शेड / कुक्कूटपालन कामाचा लाभाकरिता पात्र असेल

हेही वाचा:- गाय/म्हैस गोठा 100% अनुदा योजना 2023 सुरु येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top